' ‘या’ महाठगाने चक्क २ वेळा आयफेल टॉवर विकला! – InMarathi

‘या’ महाठगाने चक्क २ वेळा आयफेल टॉवर विकला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रॉबरी चित्रपट अर्थात जे चित्रपट चोऱ्या आणि दरोड्यांवर आधारित असतात असे चित्रपट बघायाला खरंच खूप धमाल येते. कारण चित्रपटाच्या गतीसोबत वाढत जाणारा तो थरार आपल्याला स्क्रीनसमोरून क्षणभरासाठी देखील हलु देत नाही.

हॉलीवूड आणि बॉलीवूड मध्ये असे असंख्य अनेक चित्रपट आहेत जे कधीही पहा तुम्हाला कंटाळा येणार नाही.

 

heist movies inmarathui
filmfare.com

 

यापैकी बहुतेक चित्रपट हे सत्य घटनांवर आधारित आहेत. म्हणजे तश्या चोऱ्या, तसे दरोडे पूर्वी काही हुशार महाठगांनी घातलेले आहेत.

भारतात ताजमहाल विकणाऱ्या मिथिलेश श्रीवास्तव उर्फ नटवरलाल याला आपण सर्वच जाणतो.

असाच एक ठग २०व्या शतकात देखील होऊन गेला ज्याने संपूर्ण जगामध्ये असे असे कारनामे केले, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही, तो म्हणजे विक्टर ल्युस्टीज.

 

victir lustig inmarathi

 

विक्टर याला अनेक भाषांचे ज्ञान होते, तशीच त्याची पर्सनालिटी देखील खूप आकर्षक होती. त्याच्या याच प्रतिभेमुळे त्याने अनेक पर्यटक आणि व्यावसायिकांना चुना लावला होता.

विक्टरने एक नाही तर दोन वेळा आयफेल टॉवर  विकून जगाला आश्चर्यचकित करून सोडले.

विक्टर ल्युस्टीज हा लहानपणीपासूनच स्मार्ट ट्रिक करायचा. कधी ताश च्या पत्त्यांनी कारनामे दाखवणे तर कधी दुसऱ्या ट्रिकने लोकांना मूर्ख बनवणे हेच त्याचं काम होतं.

तरुण झाल्यावर हीच ट्रिक त्याच्या अवैध कमाईच साधन बनली.

 

victor lustig inmarathi

 

विक्टर याची ४५ बोगस नावे होती, हे एकूण तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असणार.

याच नावांच्या जोरावर तो लोकांना ठगायचा. तुरुंगात त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, तो १८४० साली ऑस्ट्रिया-हंगेरीच्या हॉस्टीन शहरात जन्माला होता.

त्याने आपली कारकीर्द जणू चोर म्हणूनचं पुढे नेण्याचे ठरवले होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. चोर म्हणजे कोणी आलतू फालतू रस्त्यावरचा चोर नाही तर एक प्रोफेशनल चोर!

विक्टर लोकांना सांगायचा की, त्याचे वडील हे एका मोठ्या शहरातील मेयर आहे, तर कधी सांगायचा त्याचे वडील व्यावसायिक आहेत. पण विक्टरला ओळखणारे लोकं सांगतात की, त्याचे आई-वडील खूप गरीब होते.

 

man who sold eifel tower inmarathi

 

लहान-मोठ्या फसवेगिरीला कंटाळलेल्या विक्टरने काही तरी मोठं करण्याचा निर्णय घेतला.

१९२५ साली पॅरीसच्या  आयफेल टॉवर  येथे दुरुस्तीचे काम चालले होते आणि एका वर्तमानपत्रात यासंबंधी बातमी आली होती. ही विक्टर करिता मोठी संधी होती.

विक्टरने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने आयफेल टॉवरची नकली कागदपत्रे बनवली.

त्यानंतर स्वतः एक मोठा फ्रान्सीसी अधिकारी बनून कित्येक मोठ्या व्यावसायिकांना ‘हॉटेल दि क्रिलॉन’ येथे बोलावले,  जे त्याकाळातील सर्वात महाग हॉटेल्स पैकी एक होते.

 

victor eifel inmarathi

 

या मिटिंगमध्ये विक्टरने त्या व्यावसायिकांना म्हटले की, ‘ही एक सरकारी मिटिंग आहे आणि सरकार आता आयफेल टॉवरच्या दुरुस्तीवर आणखी खर्च करू शकत नाहीये.

म्हणून आयफेल टॉवरला विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याकरिता याच्या करारासाठी तुम्ही बिड करू शकता.’

विक्टर एवढा चलाख होता की, त्याने अगदी खरं वाटेल अश्या शैलीत हे देखील सांगितले की, या मिटिंग बद्दल बाहेर कुठेही वाच्यता करू नका, कदाचित आयफेल टॉवरच विकलं जाणं लोकांना आवडणार नाही.

या मिटिंग दरम्यान त्याने कोणाला ठगायचं हे ठरवलं होतं.

काही दिवसांनी त्याने एका व्यावसायिकाला फोन केला की, तो बिड जिंकला आहे पण कॉन्ट्रेक्ट मिळविण्यासाठी त्याला लाच द्यावी लागेल, असेही सांगितले.

तो व्यावसायिक आता विक्टरचा निशाणा बनला होता. बिड आणि लाच या दोन्हीचे पैसे घेऊन विक्टर फरार झाला.

 

victor-lustig-marathipizza03

 

एका अमेरिकी नागरिकाला विक्टरने नोट छापण्याच्या मशीनच्या नावावर फसवले होते.

विक्टरने एक लाकडाचा बॉक्स दाखवून सांगितले की, या मशिनमध्ये रेडियमच्या सहाय्याने १०० डॉलरचे नोट छापले जाऊ शकतात.

===

===

त्या व्यक्तीने ही मशीन ३० हजार डॉलरमध्ये विक्टरकडून विकत घेतली, ज्यातून केवळ दोन १०० डॉलरच्या नोटा निघाल्या.

जोपर्यंत त्या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे कळाले तोपर्यंत तर विक्टर कुठल्या कुठे निघून गेला होता.

 

victor machine inmarathi

 

 

विक्टरने एकदा नाही तर दोनदा  आयफेल टॉवरला विकले होते. दुसऱ्यांदा त्याने एका फ्रेंच व्यावसायिकाला आयफेल टॉवर विकला.

पण यावेळी ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचली होती. १९३४ मध्ये नकली करन्सी सोबत विक्टरला एफबीआयने अटक केली. ट्रायलच्या एका दिवसाआधी चादरीला दोरी बनवून तो पसार झाला.

पण तुरुंगातून पळाल्याच्या एका महिन्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आणि १९४७ साली आजारपणामुळे तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला.

एवढ्या मोठ-मोठ्या फसवणुकी करूनही त्याच्या डेथ सर्टिफिकेटमध्ये तो एक ‘अप्रेंटिस सेल्समैन’ होता म्हणून नोंदविले गेले आहे.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?