' विकृत मानसिकतेचा आणखी एक बळी : धाकड गर्ल जायरा वसीमचा फ्लाईटमध्ये विनयभंग – InMarathi

विकृत मानसिकतेचा आणखी एक बळी : धाकड गर्ल जायरा वसीमचा फ्लाईटमध्ये विनयभंग

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आजकाल दररोजच महिलांचा विनयभंग झाल्याच्या बातम्या कानावर पडतात. आपल्या समाजातील काही लोकांची मानसिकता एवढी विकृत झालेली आहे की, त्यांना एखाद्या महिलेचा विनयभंग करणे यातच खरं पुरुषत्व वाटत. असे नाही आहे की या घटना केवळ सामान्य महिलांसोबतच घडतात तर यातून आपल्या सेलिब्रिटी देखील वाचू शकलेल्या नाही. अशीच एक आणखी घटना उघड झाली आहे.

 

zaira-wasim-inmarathi
lehren.com

दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार सारख्या चित्रपटांत काम केलेल्या १७ वर्षीय अभिनेत्री जायरा वसीम हिचा विमानात विनयभंग झाल्याची बातमी समोर आली आहे. जायरा हिने स्वतः इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून सांगितले की, जेव्हा ती झोपेत होती तेव्हा तिच्या मागच्या सीटवर बसलेल्या एका वयस्कर व्यक्तीने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने तिच्या व्हिडीओमध्ये हे देखील सांगितले की, तो माणूस त्याच्या पायाने तिच्या कमरेला आणि मानेला स्पर्श करत होता.

 


जायरा ही दिल्ली येथून मुंबईला परतत असताना ही घटना घडली. ती विस्तारा एअरलाईनच्या विमानाने परतत होती. शनिवारी रात्री तिने ही घटना उघड करणारा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने जायरा सोबत घडलेल्या घटनेला लज्जास्पद सांगत नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाला या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
जायरा हिने सांगितले की, दोन तासांच्या या फ्लाईट चा अनुभव तिच्यासाठी खूप भयानक होता. तिने फोनने त्या व्यक्तीचे कृत्य रेकॉर्ड करण्याचा देखील प्रयत्न केला पण प्रकाश कमी असल्याने त्याचे हे कृत्य रेकोर्ड होऊ शकले नाही. ती केवळ त्या व्यक्तीच्या पायांचाच फोटो घेऊ शकली.
आधी तिला कळालेच नाही की तिच्यासोबत काय होत आहे. पण जेव्हा तो व्यक्ती ५-१० मिनिटे हे कृत्य करत होता तेव्हा त्यांना कळाल की त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न होतो आहे.

त्याहून अधिक वाईट म्हणजे फ्लाईटमध्ये उपस्थित केबिन क्रूने देखील याकडे दुर्लक्ष केले.

व्हिडीओमध्ये जायराने रडत रडत सांगितले की, असे व्हायला नको, काय अश्याप्रकारेच मुलींचे संरक्षण केल्या जाईल.’

 

 

तर या संबंधी विस्तार एयरलाईन ने ट्विटरवर हे स्पष्ट केले की, अश्या प्रकारच्या घटनांना सहन केले जाणार नाही, या घटनेचा तपास सुरु आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाची अध्यक्षा, रेखा शर्मा यांनी म्हंटले की, विस्तारा यांना या घटनेकरिता नोटीस पाठवला जाईल. DGP महाराष्ट्र यांना देखील याची कॉपी पाठविली जाईल. जेणेकरून या एअरलाईन विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.

त्यांनी हे देखील सांगितले की, ‘जर या घटना सहन केल्या जाणार नसतील तर अजून पर्यंत विस्तारा एअरलाईन्सने त्या व्यक्तीचे नाव जाहीर का नाही केले. त्या व्यक्तीचे नाव माहित होणे गरजेचे आहे आणि ते जायराची सर्व प्रकारे मदत करतील.’

यावरून हेच दिसून येते आपल्या देशात अजूनही महिला हव्या तेवढ्या सुरक्षित नाहीत आणि याला कारणीभूत सुरक्षा यंत्रणा नाही तर विकृत मानसिकता आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?