' सेल्फी क्रेजी बंदर बनणार ‘पर्सन ऑफ दि ईयर’? – InMarathi

सेल्फी क्रेजी बंदर बनणार ‘पर्सन ऑफ दि ईयर’?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

प्रसिद्धी ही सर्वांनाच हवी असते, त्यासाठी लोकं काय काय नाही करत. कुठल्याही वर्षीचं खास व्यक्तिमत्व म्हणून तुमची ओळख होणे हे कोणाला नाही आवडणार. आता यावर्षीचा ‘पर्सन ऑफ दि ईयर’ कोणाला मिळणार हे तर माहित नाही, पण पेटा ने त्यांच्या ‘पर्सन ऑफ दि ईयर’ चे नाव जाहीर केले आहे आणि हा एक खास बंदर आहे.

 

naruto monkey-inmarathi01
jagran.com

हा बंदर सर्वात आधी त्याच्या सेल्फी घेण्याच्या क्रेजमुळे प्रसिद्ध झाला होता. आता परत एकदा हा इंडोनेशियाचा सेल्फी क्रेजी बंदर चर्चेत आहे. पशु अधिकार संघटन पेटाने त्याला ‘पर्सन ऑफ दि ईयर’ करिता त्याचे नामांकन केले आहे.

 

naruto monkey-inmarathi02
jagran.com

या बंदराच नाव ‘नरुटो’ असून तो मकाऊ प्रजातीचा आहे. या बंदराने क्लिक केलेल्या सेल्फिच्या कॉपीराइट संबंधित विवाद होर्तापर्यंत जाऊन पोहोचला होता. पशु अधिकार संघटन पेटा (People for the Ethical Treatment of Animals) ने सांगितले की ते ‘नरुटो’ याला यासाठी नामांकित करत आहेत कारण तो कुठली वस्तू नसून तो एक सेलिब्रिटी आहे.

 

peta-inmarathi
peta.org

२०११ साली ब्रिटीश वन्यजीव संरक्षक फोटोग्राफर डेविड जे स्लाटर यांच्या कॅमेऱ्याचे बटन दाबून या नरुटोने एक सेल्फी घेतला होता. स्लाटर यांनी ही सेल्फी त्यांच्या कंपनी वाईल्डलाईफ पर्सनॅलिटीज च्या कलेक्शनमध्ये छापली. त्यांनी याच्या कॉपीराईटचा देखील दावा केला होता. याला विरोध करण्याकरिता पेटाने कोर्टात दावा दाखल करत नरुटोला या सेल्फिचा कायदेशीर हक्क देण्यात यावा अशी मागणी केली होती.

 

naruto monkey-inmarathi03
metro.co.uk

यानंतर जानेवारी २०१६ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोच्या फेडरल कोर्टाने नरुटो या बंदराला सेल्फिचा कायदेशीर हक्क देण्यास नकार दिला. तेव्हा पेटाने उच्च कोर्टात नेले. पण हे प्रकरण कोर्टाबाहेरच तडजोड करत सोडविण्यात आले. स्लाटर या गोष्टीवर सहमत झाले की, या सेल्फिने होणाऱ्या उत्पन्नाचा २५ टक्के भाग हा इंडोनिशियातील या प्रजातीच्या बंदरांच्या संरक्षणासाठी दान करण्यात येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?