आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गुगलचे सिईओ सुंदर पिचाई हे भारतीय आहेत त्यासोबतच गुगलमध्ये नोकरी करणारे अनेक कर्मचारी हे देखील भारतीय आहेत. याच भारतीयांच्या सोयीकरिता गुगलच्या कॅम्पसमध्ये एक रेस्टॉरंट उघडण्यात आले आहे. चला तर जाणून घेऊया गुगलच्या या देशी रेस्टॉरंट बद्दल.
गुगलच्या कॅलीफोर्निया येथील कॅम्पसमध्ये एकूण ३० कॅफे आहेत, ज्यामध्ये एक भारतीय कॅफे देखील आहे. या कॅफेचं नाव आहे ‘बादल कॅफे’…
२०१३ सालापासून हा कॅफे बादल गुगल कर्मचाऱ्यांना भारतीय पकवानांची मेजवानी सादर करत आहेत. याला बॉन एपेटीट ही मॅनेजमेंट कंपनी संचालित करते. ही कंपनी Google, eBay, Oracle इत्यादी मोठ्या टेक्निकल कंपनींमध्ये कॅफे चालवते. याच कंपनीने २०१३ साली Googleplex मध्ये एक भारतीय कॅफे सेट करण्याचा निर्णय घेतला.
कॅफे बादलचे शेफ इरफान दामा आहेत, जे भारतीय तसेच अनेक विदेशी पदार्थ बनविण्यात पारंगत आहेत. इरफान दामा ह सोशल मिडिया प्लॅटफॉर्म युट्युब वर देखील खूप प्रसिद्ध आहेत.
या भारतीय कॅफेमध्ये चहा पासून तर मँगो लस्सी पर्यंत सर्वकाही मिळत. दुपारच्या जेवणात थाळी असते, ज्यात भाजी, रायता, चटणी, डाळ, भात हे सर्व असत.
पण गुगलच्या कर्मचाऱ्यांना जर कुठली डीश सर्वात जास्त आवडत असेल तर ती म्हणजे येथे मिळणारी बिर्याणी, जी केवळ शुक्रवारीच बनविण्यात येते.
हा आहे गुगलचा बुफे एरिया…
रेस्टॉरंटच्या आतील देखावा…
इथल्या भिंतींवर तिरंगा लावलेला आहे, त्यासोबतच बॉलीवूड चित्रपटांची पोस्टर्स देखील आहेत.
येथे तुम्हाला भारताचा नकाशाही लागलेला दिसेल.
===
- प्लास्टिक कॅफे : ह्या हॉटेलमध्ये मनसोक्त हादडा आणि पैशांऐवजी प्लास्टिक द्या
- हे ७ कॅफेज फक्त खाबूगिरीसाठीच नव्हे, तर नेत्रसुखासाठीही आहेत प्रसिद्ध!
===
कॅफे बादलमध्ये गुगलचे भारतीय कर्मचारी
तर असा आहे हा गुगलच्या कॅलीफोर्निया कॅम्पस मधील भारतीय ‘कॅफे बादल’…
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.