Site icon InMarathi

पैसे झाडाला लागलेत का? होय, “ह्या” झाडांना खरंच पैसे लागलेत!

Money tree 2 im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पैसा विचारपूर्वक वापरण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. पण काहीजण इतके उतावीळ असतात की या सल्ल्याकडे कानाडोळा करून आवडीच्या वस्तूंवर सहज खिसा रिकामा करतात. मग त्यांना घरच्यांकडून, जवळच्या माणसांकडून लाखभर बोलणी खावी लागतात.

अश्यावेळी एक वाक्य मात्र हमखास कानी पडतं – “काय रे? पैसे काय झाडाला लागलेत का?”

असं विचारल्यावर समोरचा बिचारा निरुत्तर होऊन मान खाली घालतो. पण आता निरुत्तर होण्याची गरज नाही, कारण या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर सापडलयं.

हो! पैसे खरंच झाडावर लागलेत!

(अर्थात – एकाच झाडाला…तेही इंग्लंडमधे 😀 )

स्रोत

इंग्लडमध्ये एक असं झाड आहे जे पाहिल्यावर तुम्ही स्वत: म्हणाल – बाबो! खरंच पैश्याचं झाड आहे की!

स्रोत

आपल्याकडे काही देवळात गेल्यावर पाण्यात पैसे टाकण्याची प्रथा आहे. तसंच काहीसं हे प्रकरण आहे.

इंग्लंडमधील लोक फार पूर्वीपासून मोठ्या श्रद्धेने या झाडा”मधे” पैसे लावतात.

स्त्रोत

या झाडावर जवळपास लाखोंच्या घरात नाणी (Coins) लावलेली आहेत. स्वत:ची इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने आजही हजारोंच्या संख्येने लोक या झाडावर नाणी लावण्यासाठी येतात.

स्रोत

इंग्लंडमधील स्कॉटीश बेटावरच्या पीक जिल्ह्यामध्ये हे झाड वसलेलं आहे. Good Luck च्या आशेने लोक या झाडाला भेट देतात आणि त्यात नाणं रोवतात.

स्रोत

स्थानिकांच्या माहितीनुसार, ख्रिसमससारख्या मोठ्या सणांच्या वेळी लोक या झाडावर पैसे लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. आजही कित्येक वर्षानंतर ती प्रथा तशीच सुरु आहे.

स्रोत

या झाडावर जुन्या काळातील असंख्य बहुमुल्य नाणी आहेत, ज्यांची अॅंटिक बाजारातील किंमत अरबोंच्या घरात आहे.

केवळ इंग्लंड देशाचीच नाही, तर जगातील विविध देशांची नाणी इथे अडकवलेली पाहायला मिळतात.

स्रोत

इंग्लंडच्या आसपास असलेल्या राष्ट्रांसह अमेरिकेतही या झाडाची मोठी ख्याती आहे.

आपल्याकडे श्रद्धा-अंधश्रद्धा वर बरीच चर्चा झडत असते.

अंग्रेजी बाबू पण याला अपवाद नाहीत…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version