Site icon InMarathi

ही आहे मुघलांचा “वारसा” जपणारी, बहादूर शाह जफरची ६वी पिढी!

Bahadur Shah feature InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

ब्रिटीश येण्यागोदर आपल्या भारतावर मुगलांचे राज्य होते हे तर आपण सर्वच जाणतो. मुगलांनी भारतावर ४०० वर्ष राज्य केले. यादरम्यान त्यांनी हिंदू धर्माच्या कित्येक वस्तूंचे नुकसान केले तर  मुघलांच्या अस्तित्वाची ग्वाही देणाऱ्या अनेक वास्तू देखील बनवल्या.

यात जगातील ७ आश्चर्यांपैकी एक ताजमहाल, लाल किल्ला, जामा मशीद, हुमायुचा मकबरा इत्यादी वास्तू येतात.

पण आता आपल्या देशात लोकशाही आहे, मुघलांचे ब्रिटीशांचे राज्य संपून दीडशे वर्षांहून आधी काळ लोटला. आता मुगल शासक नाहीत, त्यामुळे कदाचित आपल्याला वाटत असेल की आता मुघलांची आठवण करवून देणाऱ्या केवळ या वास्तुच उरल्या आहेत. पण असं नाहीये.

अजूनही असे लोक आहेत – जे आपल्याला मुघलांच्या अस्तित्वाची, त्यांच्या अलिशान राहणीमानाची करून देतात.

आजही आपल्या देशात मुघलांचे वारस आहेत आणि ते आजही त्याच थाटामाटात जीवन जगतात जे त्या काळी मुघल जगायचे. तसेच त्यांना समाजातही खूप आदर मिळतो. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल!

 

inmarathi.com

 

बहादूर शाह जाफर हे भारतावर शासन करणारे शेवटचे मुघल सम्राट. १८६२ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या ४९ मुलांपैकी केवळ एकच मुलगा इंग्रजांच्या तावडीतून सुटून काठमांडू येथे पलायन करण्यास यशस्वी ठरला होता. त्यानंतर तो हैदराबाद येथे आला आणि तेथेच वसला.

 

twitter

 

सध्या आपण ज्या मुघलांच्या वारसाबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव प्रिंस याकुब हबीबुद्दीन तूसी आहे. ते बहादूर शाह जफर यांची सहावी पिढीचे आहेत.

 

 

प्रिंस याकुब हबीबुद्दीन तूसी हे सध्या हैद्राबाद येथे राहत आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९६९ साली हैद्राबाद येथे झाला. त्यांनी आपलं पूर्ण शिक्षण याच शहरातून केलं.

 

navodaya times

 

प्रिंस याकुब यांनी १९९७ मध्ये प्रिंसेस हुमैरा फातिमा यांच्याशी निकाह केला. त्यांना तीन मुलं आणि २ मुली आहेत. यांच्या सर्वात मोठ्या मुलाचं वय १९ तर सर्वात लहान मुलीचं वय ८ वर्ष आहे.

 

twitter

 

हैद्राबादच्या सिविल कोर्टाने प्रिंस याकुब यांना कायदेशीररित्या मुगलांचे वारस म्हणून घोषित केले आहे. त्याच बरोबर उजबेकिस्तान सरकारने देखील प्रिंस याकुब यांना मुगलांचे वारस म्हणून घोषित केले आहे.

 

ichowk

 

एका मुलाखतीत प्रिंस याकुब यांनी सांगितले होते की, ते काही विशेष प्रसंगांवेळीच शाही कपडे परिधान करतात. इतर वेळी ते पॅण्ट-शर्ट आणि जीन्स-टी शर्ट  घालतात.

 

navodaya times

 

प्रिंस याकुब हे खूप सोशल आहेत. ते नेहेमी मुगलांच्या कुठल्या ना कुठल्या वास्तूला भेट देत असतात. त्यासोबतच ते दरवर्षी ताजमहाल जातात.

प्रिंस याकुब यांनी मुगल शासक बहादूर जाफर यांना भारत रत्न देण्यात यावे याकरिता अनेक वेळा केंद्र शासनाकडे अर्ज देखील केला आहे. ते जेव्हाही प्रसारमाध्यमांना मुलाखत देतात तेव्हा ते मुघलांनी बनविलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या देखभालीचा प्रश्न नक्की उपस्थित करतात.

असे हे मुघलांचे वंशज प्रिंस याकुब हबीबुद्दीन तूसी मुघलांचा वारसा अजूनही जपत आहेत.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version