' पत्रकारितेत रस असणाऱ्यांना ह्या ११ वर्षीय चिमुकल्या पत्रकारकडून खूप काही शिकण्यासारखं आहे! – InMarathi

पत्रकारितेत रस असणाऱ्यांना ह्या ११ वर्षीय चिमुकल्या पत्रकारकडून खूप काही शिकण्यासारखं आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

टेक्नॉलॉजी च्या या युगात लहान मुले देखील स्मार्ट झाली आहेत. आजच्या मुलांना नाही काही सांगायची गरज असते नाही काही शिकवायची. या टेक्नॉलॉजी मुळे ही लहान लहान मुलं काही अशी काम देखील करून जातात जी करण्याचा आपण विअचारही करू शकत नाही. यापैकीच एक स्मार्ट मुलगी म्हणजे Hilde Kate Lysiak. हिने जे करून दाखवलं आहे ते तिच्या वयानुसार खर्च खूप जास्त आहे. Hilde Kate Lysiak ही एक वर्तमान पत्र चालवते आणि तिला हे खूप चांग्ल्याबी माहिती आहे कुठली बातमी तिला वाचकांपर्यंत पोहोचवायची आहे.

 

Hilde Kate Lysiak-inmarathi04
patrika.com

अमेरिकेच्या Pennsylvania येथील Pennsylvania शहरात राहणारी Hilde Kate Lysiak ही एक ११ वर्षीय चिमुकली आहे. पण तिचे काम हे मोठ्यांना देखील जमणार नाही असे आहे. ती Orange Street News नावाचं एक वर्तमान पत्र चालवते आणि तीच त्या वर्तमान पत्राची वार्ताहार आणि पब्लिशर आहे. हा व्यवसाय तिने २ वर्षांपूर्वी सुरु केला होता.

 

 

Hilde Kate Lysiak-inmarathi03
jagran.com

Hilde पत्रकारीतेचे शिक्षण आपल्या वडिलांकडून घेतले. Matthew Lysiak हे Hilde चे वडील असून ते एक लेखक आणि पत्रकार राहिलेले आहेत. Matthew Lysiak हे अमेरिकेच्या प्रसिद्ध New York Daily News मध्ये पत्रकार म्हणून काम करायचे. त्यावेळी ते त्यांच्या कित्येक प्रोजेक्टमध्ये Hilde ला आपल्या सोबत घेऊन जात असत. बस मग काय, तेव्हापासूनच Hilde हिला पत्रकार होण्याचं वेड लागलं. त्यानंतर ती देखी पत्रकारिता क्षेत्रात रामू लागली.

 

Hilde Kate Lysiak-inmarathi01
hindustantimes.com

Hilde हिने Hindustantimes ला दिलेल्या एक मुलाखतीत सांगितले की,

“मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्या प्रोजेक्टसाठी जायची आणि त्यांना फॉलो करत राहायची. काही काळाने त्यांनी पत्रकारिता सोडली, पण मला हे क्षेत्र सोडायचे नव्हते, म्हणून मी स्वतःचे वर्तमान पत्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकारे Orange Street News (OSN) वर्तमानपत्राची सुरवात झाली.”

पुढे तिने सांगितले की,

“OSN च्या प्रत्येक एडिशनमध्ये ७ ते ८ स्टोरीज सोबतच ओरिजिनल फिक्शनल शोर्ट स्टोरीज देखील पब्लिश होतात. या सर्व स्टोरीजच्या एडिटिंगमध्ये तिचे वडील Matthew तिची मदत करतात.”

 

Hilde Kate Lysiak-inmarathi05
hindustantimes.com

Hilde ची १४ वर्षीय मोठी बहिण Izzy ही या वर्तमान पत्राची एकुलती कर्मचारी आहे. ती व्हीडीओज सोबतच ONS च्या वेबसाईटला सांभाळते.

Hilde सांगते की,

“तिचे आई-वडील खूप चांगले आहेत, त्यांना नवे मार्ग शोधायला आवडतात आणि त्यांना एकाच गोष्टीत अडकून राहायचे नसते ही त्यांच्यातील जी सर्वात चांगली गोष्ट आहे.”

 

Hilde Kate Lysiak-inmarathi
sheknows.com

Hilde च्या पालकांनी तिला सायकलवरून संपूर्ण शहर फिरत वेगवेगळ्या बातम्या कव्हर करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. जेव्हा तिने तिच्या वर्तमानपत्रावर काम करण्यास सुरवात केली तेव्हा त्यांनी तिला घरूनच शिक्षण घेण्याचीही परवानगी दिली.

याबाबत बोलताना ती सांगते की,

“आता माझ्याजवळ बातम्या शोधण्याकरिता, त्यांना फॉलो करण्याकरिता, त्यांच्यावर अभ्यास करण्यासाठी खूप वेळ आहे.”

 

Hilde Kate Lysiak-inmarathi06
hindustantimes.com

ती तिच्या पत्रकारितेच्या करिअर सोबतच आपला अभ्यास देखील करते, तसेच ती मातीची खेळणीही बनवते आणि Taylor Swift चे गाणेही ऐकते.

ती सांगते की,

“साधारणपणे ३ वाजेपर्यंत माझं रिपोर्टिंगचं काम होऊन जाते, जर कुठली मोठी बातमी नाही आली तर आणि असे फार क्वचितच होते.”

 

Hilde Kate Lysiak-inmarathi02
hindustantimes.com

Orange Street News हे वर्तमान पत्र इतर अमेरिकी वर्तमान पत्रांप्रमाणे प्रत्येक घटना आणि इवेन्ट बाबत बातम्या कव्हर करते. एवढचं काय तर Hilde हिने काही इन्वेस्टीगेटिव्ह स्टोरीज कव्हर करण्यासोबतच त्यांचा छडा देखील लावला आहे.

अशी ही छोटीशी पत्रकार Hilde कुठल्या वंडर गर्ल पेक्षा कमी नाही…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?