खराब फॉर्म सुधारण्यासाठी सचिनला एका वेटरने दिला होता सल्ला
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतात क्रिकेटप्रेमी खूप पाहायला मिळतात. गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांनाच क्रिकेटचे वेड असते. क्रिकेटचा कोणताही सामना असो, गर्दीचे खच्चाखच भरलेली स्टेडियम्स आणि घरांतील टिव्हीपुढे जमलेले दर्दी यांची हे चित्र सगळीकडे सारखेच असते.
क्रिकेट हा खेळ लहानापासून लोकांच्या मनामध्ये वसलेला असतो. क्रिकेट भारतीयांच्या रक्तातच असतं म्हणा ना! भारताच्या क्रिकेट संघामध्ये खूप मोठमोठे दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत.
विराट कोहली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी यांनी सुद्धा भारतीय संघाला एका वेगळ्या स्तरावर पोहचवले आहे.
पण आजही सर्व भारतीय एकाच खेळाडूची आठवण काढतात; तो खेळाडू म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडूलकर.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे भारतातील प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनामध्ये आजही अढळ स्थान आहे, कारण त्याच्यासारखा तोच आहे आणि त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
सचिन मैदानात उतरल्यावर त्याच्या नावाचा असा काही जयघोष व्हायचा की, ते पाहून भारताविरुद्ध खेळायला आलेल्या टीमचे खेळाडूदेखील त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचे.
सचिनच्या खेळाने आणि त्याच्या रेकॉर्ड्समुळे त्याला आपसूकच देवपण प्राप्त झाले होते. त्याला त्याच्या या खेळामध्ये केलेल्या कामगिरीसाठी भारतरत्न पुरस्काराने नावाजले गेले आहे. आजच्या भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये त्याच्याविषयी आदराचे स्थान आहे.
भारतीय संघाचा कर्णधार आणि आजचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील हे सांगतो की, सचिनने कशी त्यांच्या फलंदाजीच्या कौशल्याला अजून चांगले बनवण्यसाठी मदत केली. चुकूनच कोणीतरी सचिनच्या फलंदाजीमध्ये एखादा दोष काढू शकले असेल.
पण कुणीतरी असा देखील होता, ज्याने सचिनला त्याच्या फलंदाजीतील उणीव सांगितली होती.
सचिनच्या कारकिर्दीत एक मोठा काळ असा होता, जेव्हा सचिन आपल्या सर्वात वाईट फॉर्ममधून जात होता. धावा बनवणे तर लांबच राहिले, पिचवर टिकणे देखील त्याला जमत नव्हते.
कितीतरी एक्सपर्टसने सचिनला क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्ला देखील दिला होता. सचिनने आपल्या फलंदाजीमध्ये सर्वकाही करून पाहिले, पण यश काही मिळत नव्हते. काहीतरी असे होते, जे राहून जात होते.
सचिनला त्याच्या या प्रश्नाचे उत्तर चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये मिळाले. सचिनने स्वतः सांगितले आहे की, तो त्यावेळी खूप दु:खी होता. त्याला नेहमी आपला खेळ कसा सुधारता येईल, याचीच चिंता भेडसावत होती.
असेच एकेदिवशी सचिन चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये याबद्दलच विचार करत बसला होता.
त्यावेळी त्याच्याजवळ एक वेटर आला, ज्याने खूप सभ्यतेपूर्वक विचारले की, “सर, जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगू का?”
सचिन त्याला म्हणाला की,
“का नाही, सांगा ना”
तेव्हा त्या वेटरने सांगितले की,
“तुमची फलंदाजी खराब होण्याचे कारण तुमचा ‘एल्बो गार्ड’ आहे. त्याच्यामुळे तुमची बॅट पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये राहत नाही.”
सचिन हे ऐकून आश्चर्यचकित झाला, कारण तो जे बोलत होता, ते अगदी बरोबर होते. त्यानंतर सचिनने आपल्या ‘एल्बो गार्ड’ला आपल्या कम्फर्टच्या हिशोबाने परत डिझाईन करवून घेतले. सचिनला यामुळे खरंच खूप फायदा झाला.
जी गोष्ट भल्याभल्या दिगज्जांना आणि स्वतः सचिनला लक्षात आली नव्हती, ती एका हॉटेलच्या वेटरने लक्षात आणून दिली.
यावरून एक समजते की, कधी कोणाचा सल्ला तुमच्या कामी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कधीही कोणाला कमी लेखू नये… काय माहिती कोण कधी तुमच्या कामी येईल…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.