Site icon InMarathi

युट्युब वापरताय? मग हे फिचर्स तुम्हाला ठाऊक असायलाच हवेत

youtube inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

युट्युब आपल्या सर्वांना माहीत आहेच. आपण नेहमी यावर विविध विषयाच्या व्हिडीओ पाहतो.

प्रत्येक दिवशी आपल्याला युट्युबवर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडीओ पाहण्यास मिळतात. दरदिवशी नवीन काहीतरी घेऊन युट्युब आपल्या समोर येते. या युट्युबच्या मदतीने आपल्याला खूप काही शिकायला मिळते.

गुगलच्या या युट्युबमुळे जगभरातील कलाकारांना देखील आपली कला सादर करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक वेगळे प्लॅटफॉर्म मिळाले आहे.

तसेच, तंत्रज्ञान, शैक्षणिक, मनोरंजन असे सर्वच या युट्युबवर पाहण्यास मिळते.

 

tuberads.com

 

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच येथे काहीना काही आहे. त्यामुळे याचा वापर करणारी माणसे सहसा कधी या सोशल मिडीयाला कंटाळत नाहीत.

युट्युब ही जगातील आज सर्वात लोकप्रिय ऑनलाईन वेबसाईट म्हणून ओळखली जाते. आज इंटरनेट देखील जवळपास फ्रीमध्ये उपलब्ध झाले आहे.

आज आम्ही तुम्हाला याच युट्युबच्या काही अशा फिचर्सबद्दल सांगणार आहोत, जे कदाचित तुम्हाला माहित नसतील. चला तर मग जाणून घेऊया, या फिचर्सबद्दल..

१. टीव्ही मोडवरती बघू शकता व्हिडीओ

 

ytimg.com

 

जर तुम्ही ८ ते १० फुट लांब बसून युट्युबवर व्हिडीओ पाहू इच्छित असाल, तर ‘http:www.youtube.com/tv’ या URL वर जाऊन तुम्ही टीव्ही मोडवर व्हिडीओचा आनंद घेऊ शकता.

या मोडला तुम्ही किबोर्डच्या मदतीने सहज कंट्रोल करू शकता. तसेच, तुम्हाला या मोडवर कमी प्रकाशात व्हिडीओ पाहण्यासाठी यामध्ये डार्क थीमचा ऑप्शन देण्यात आलेला आहे.

२. Karaoke व्हिडीओ

 

ottmag.com

 

जर तुम्हाला कराओकेच्या सपोर्टबरोबर व्हिडीओ पाहण्याची इच्छा असेल, तर युट्युबवर तुम्ही गाण्याचे नाव Karaoke सोबत लिहून सर्च करू शकता.

याप्रकारे तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलला कराओके मशीनसारखे वापरू शकता.

३. स्लो मोशन किंवा फास्ट स्पीडमध्ये बघा व्हिडीओ

 

ytimg.com

 

युट्युबमध्ये व्हिडीओ प्ले करताना सेटिंग बटनमध्ये स्पीडचा ऑप्शन दिलेला असतो. ज्याच्या मदतीने तुम्ही व्हिडीओला स्लो मोशन किंवा फास्ट स्पीडमध्ये बघू शकता.

४. किबोर्ड शॉर्टकट्स

 

obamapacman.com

 

राईट आणि लेफ्ट अॅरोच्या बटणाने व्हिडीओला मागे किंवा पुढे करू शकतो.

K बटणाने व्हिडीओला पॉज आणि प्ले करू शकतो. F बटणाने व्हिडीओ फुल स्क्रीन मोडवर लावू शकतो. M बटणाने व्हिडीओ म्यूट करू शकतो.

५. लाइव्ह स्ट्रीमिंग

 

wittyfeed.com

 

युट्युबवर लाइव्ह स्ट्रीमिंग ऑप्शनपण देण्यात आलेला आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर लाइव्ह व्हिडीओ ब्रॉडकास्ट करू शकता.

या व्यतिरिक्त युट्युबमध्ये फोटो स्लाईड शो आणि व्हिडीओ एडीटर जसे ऑप्शन देखील देण्यात आलेले आहेत.

६. युट्युबचे मॅजिक अॅक्शन

 

 

मॅजिक अॅक्शन या नावाचे एक ब्राऊजर एक्सटेन्शन जोडल्यास तुम्ही सेटिंग पेजवर जाऊन ते चालू करू शकता.

या फिचरच्या मदतीने तुम्ही माउसच्या स्क्रोलने आवाज कंट्रोल, जाहिराती लपवणे, ४ के किंवा फोर्स एचडी प्लेबॅक, बायपास कंट्री रिस्ट्रीक्शन, सिनेमा मोड चालू करणे आणि स्पीड बूस्टर अजून फास्ट व्हिडीओ लोड होण्यासाठी याचा वापर होतो.

७. ३६० डिग्री व्हिडीओज

 

kym-cdn.com

 

आजकाल ३६० डिग्रीच्या व्हिडीओला व्हीआर आल्यामुळे खूप पसंती मिळत आहे. आता युट्युबवर देखील ३६० डिग्रीच्या व्हिडीओ सहज प्ले करता येतात.

आता ३६० डिग्री रेकॉर्ड करणारे कॅमेरे देखील आले आहेत. तुम्ही युट्युबवर जशी सामान्य व्हिडीओ अपलोड करता, तशीच ३६० डिग्रीची व्हिडीओ देखील अपलोड करू शकता.

८. ऑफलाईन व्हिडीओ पाहणे

 

ytimg.com

 

युट्युबवर व्हिडीओ पाहण्यासाठी लागणाऱ्या डेट्याची बचत करण्यासाठी तुम्ही व्हिडीओ ऑफलाईन देखील सेव्ह करू शकता. सध्या हे फिचर युट्युब अॅपवर उपलब्ध आहे.

९. युट्युब व्हिडीओमधून जीआयएफ बनवणे.

 

trickyways.com

 

युट्युब व्हिडीओच्या एका भागातून अॅनिमेटेड जीआयएफ तयार करणे सोपे आहे. त्यासाठी आपल्या पसंतीचा युट्युब व्हिडीओ उघडा आणि ब्राऊजरच्या अॅड्रेस बारमध्ये युट्युबपूर्वी ‘gif’ हा शब्द जोडा.

त्यावेळी साईट आपल्याला दुसऱ्या पेजवर पुनर्निर्देशित करेल, जिथे आपण जीआयएफमध्ये रुपांतरीत करण्यासाठी व्हिडीओमधून १५ सेकंदपर्यंतचा क्लिप निवडू शकता.

एकदा का तुम्ही पाहिजे ते जीआयएफ सिलेक्टे केल्यानंतर पेजवर तुम्हाला टेक्स्ट आणि स्टीकर त्यामध्ये जोडण्याचा पर्याय मिळतो. हे सर्व झाल्यानंतर संगणक ती जीआयएफ डाऊनलोड करण्याचा पर्याय देतो.

असे हे युट्युबचे फिचर्स खूपच महत्त्वाचे आणि आकर्षक आहेत. तसेच, यांच्या मदतीने तुम्ही युट्युबवरील व्हिडीओचा मनसोक्त आनंद उठवू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version