आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
ISRO म्हणजेच ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ने चंद्रयान १ मानवरहित अंतरीक्षयानाची २००८ मध्ये यशस्वीरीत्या चाचणी केली होती. पण ते क्रॅश झाले होते. चंद्रयान १ चे प्रक्षेपण २२ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले होते. यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक, तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग होते. अंतराळयानाचे वस्तुमान प्रक्षेपणाच्या वेळी ११३० किलोग्रॅम होते. भारत आता आपल्या चंद्रयान २ ची तयारी करत आहे. हे चंद्रयान-२ चंद्रावर उतरणार आहे. चंद्रयानचा संस्कृतमध्ये अर्थ चंद्र वाहन असा होतो.
आजपर्यंतच्या भारत सरकारच्या सर्वात महत्त्वकांक्षी चंद्राच्या शोध प्रकल्पाचे उद्धिष्ट म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) हे विकसित केले आहे. हे चंद्रयान २ Geosynchronous Satellite Launch Vehicle (GSLV Mk II) च्या मदतीने प्रक्षेपित केले जाईल. यामध्ये चंद्राचे ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर समाविष्ट आहे.
भारत गेल्या ४ वर्षातील पहिला देश असेल, जो या मिशनचा प्रयत्न करेल. याआधी २०१३ मध्ये चंद्रावर यशस्वीरित्या यान उतरवण्यात आले होते. त्यावेळी चीनने ‘युटू’ नावाचे मानवरहित यान चंद्रावर यशस्वीरीत्या उतरवले होते.
हे लक्षात घेणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे की, याबाबतीत अमेरिकेला अजूनही कोणत्याही देशाने हरवलेले नाही. अमेरिका हा एकमेव देश आहे, ज्यांनी माणसाला चंद्रावर उतरवले आहे. १९७२ मध्ये नासाकडून चंद्रावर जाणारा युजीन कर्नन हा शेवटचा माणूस होता.
चंद्रयान १ साठी २००८ मध्ये सुमारे जवळपास ५०० कोटींचा खर्च आला होता. या मोहिमेत या चंद्रयानाने काही ‘मॅग्मॅटिक वॉटर’ शोधून काढले होते. पण हे चंद्रयान क्रॅश झाले आणि १४ नोव्हेंबर २००८ ला चंद्राच्या कक्षेमध्ये कोसळले. त्याला २०१६ मध्ये नासाने शोधून काढले होते. पण चंद्रयान २ च्या सहाय्याने इस्रोचा चंद्राच्या पृष्ठभागाला अतिशय बारीक नजरेने पाहण्याचा पहिला प्रयत्न असेल.
इस्रो भारतामध्ये विकसित करण्यात आलेल्या या अभियानासाठी तीन मानवरहित वाहने तयार करत आहे. यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरण्यासाठी रोव्हर आणि लँडर ही वाहने तयार केलेली आहेत. यातील रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर वेगळे होऊन चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन काही रासायनिक विश्लेषण करेल. तसेच यामध्ये ऑर्बिटर क्राफ्टचा देखील समावेश आहे. या मिशनमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे वेगवेगळे परीक्षण केले जाईल. या चंद्रयानाचे वजन २६५० किलो असेल. या मोहिमेसाठी जवळपास ४५० कोटी रुपये खरच होण्याची संभावना व्यक्त करण्यात आलेली आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मार्च २०१८ मध्ये या चंद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे चंद्राच्या कक्षेमध्ये १०० किमी आत जाईल. यामध्ये एक हाय – रिझोल्यूशन कॅमेरा असेल, जो प्रत्येक गोष्टीची माहिती उपग्रहाच्या सहाय्याने पृथ्वीवर असलेल्या इस्रोच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहाचवेल. या चंद्रयानावर प्रत्येकवेळी कडक लक्ष ठेवले जाईल. या मिशनचा हेतू हा चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या खनिज आणि तेथील मुलभूत गोष्टींचा अभ्यास करणे हा आहे.
असे चंद्रयान २ भारतासाठी एक सर्वात महत्त्वाचे अंतराळातील मिशन आहे आणि या मोहिमेतून चंद्राबद्दल अजून काही महत्त्वाची माहिती समोर येईल अशी अशा आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.