आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू देखील आहे. यातून आजवर कोणीही वाचू शकलेले नाही, देव सुद्धा नाही. यासंबधी रामा ची विष्णू लोकात परत जाण्याची एक अतिशय रोचक कथा आहे.
भगवान विष्णू आपला सातवा अवतार घेत श्री राम यांच्या रुपात पृथ्वीतलावर आले. पण जेव्हा त्यांचा काळ पूर्ण झाला तेव्हा त्यांना या पृथ्वीवरून परत विष्णुलोकात परतावे लागले होते. श्री राम हे पृथ्विहून विष्णुलोकात कसे परतले या संबंधी एक रोचक कथा आहे.
हिंदू धर्मात तीन देवांना सर्वात जास्त महत्व देण्यात येते, ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. यांपैकी भगवान विष्णू यांनी वेगवेगळ्या युगात वेगवेगळी रूपं घेतली. भगवान विष्णू यांचे एकूण १० अवतार असल्याचे मानल्या जाते ज्यापैकी राम हे सातवे अवतार होते.
अयोध्येत इक्ष्वाकू वंशात जन्मलेले श्री राम हे तेथील राजा दशरथ यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांनी दहा हजार वर्षांहून जास्त शासन केले असे सांगितल्या जाते. रामचरित मानसमध्ये तुलसीदास लिहितात की, त्यांच्या राज्यात कोणाचीही अल्प मृत्यू किंवा कोणीही रोगाने ग्रासलेले नव्हते.
राम अवताराच्या शेवटाबद्दल याबद्दल कदाचित कोणाला माहित नसेल. याबद्दलची एक कथा पद्मपुराणात वाचायला मिळते.
पद्मपुराणातील कथे अनुसार एकदा एक वृद्ध संत रामाच्या दरबारी पोहोचले. त्यांनी रामाला म्हटले की, मला तुमच्यासोबत एकट्यात काही बोलायचे आहे. रामाने त्या संतांची विनंती स्वीकार केली आणि त्यांना घेऊन एका खोलीत गेले. त्यांनी लक्ष्मण ने खोली बाहेर पहारा देण्याची सूचना करत सांगितले की –
कोणीही आत यायला नको, जर कोणामुळे संत आणि त्यांच्यामधील चर्चेत खंड पडला तर त्याला मृत्यू दंड देण्यात येईल.
एवढे सांगून ते आत खोलीत निघून गेले आणि लक्ष्मण आपल्या भावाच्या आज्ञेच पालन करत तिथे पहारा देऊ लागला.
रामाला भेटण्यासाठी आलेले ते वृद्ध संत काल देव होते. त्यांना विष्णू लोकातून पाठविण्यात आले होते. रामाचा वेळ पृथ्वीवर संपतो आहे, आता त्यांना विष्णुलोकात परत यावे लागेल. हेच सांगण्याकरिता ते राम यांना भेटण्यासाठी आले होते.
एवढ्यातच ऋषी दुर्वासा राजमहालात येऊन पोहोचले. ऋषी त्यांच्या रागीट स्वभावाकरिता प्रसिद्ध होते. त्यांनी अचानक रामाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी लक्ष्मणाला सांगितले, त्यांना रामाला भेटायचे आहे. पण लक्ष्मण तर राम यांच्या आज्ञेच पालन करत होते. म्हणून त्यांनी दुर्वासा ऋषींना नकार दिला.
लक्ष्मणाच्या तोंडून नाही ऐकून दुर्वासा क्रोधीत झाले. त्यांनी म्हटले की, जर राम त्यांना भेटले नाही तर ते त्यांना श्राप देतील. आपल्या प्रिय भावाकरिता ऋषींचे हे शब्द ऐकून लक्ष्मण घाबरले. आता ते संभ्रमात पडला की, रामाच्या आज्ञेच पालन करायचे की त्यांना ऋषींच्या श्रापापासून वाचवायचे.
–
- वाल्मिकींपेक्षाही श्रेष्ठ रामायण हनुमंताने लिहिलं होतं, पण या कारणाने ते नष्ट झालं
- प्रभू श्रीराम – लक्ष्मण यांच्या अवतार कार्याचा आणि रामायणाचा शेवट कसा झाला? वाचा!
–
लक्ष्मणाला माहित होते की, जर ऋषींना आत जाऊ दिले नाही तर ते श्री राम यांना श्राप देतील आणि जर त्यांना आत जाऊ दिले रामाच्या आज्ञेच उल्लंघन होईल.
त्यामुळे लक्ष्मणाने स्वतः आत जाऊन राम यांना दुर्वासा ऋषी बाबत सांगण्याचा निर्णय घेतला. जेव्हा की त्यांना हे माहित होते की, चर्चा भंग केल्यावर त्यांना मृत्यु दंड देण्यात येईल. तरीदेखील त्यांनी रामाला श्राप मिळू नये म्हणून हा निर्णय घेतला.
त्यानंतर लक्ष्मणाने खोलीत प्रवेश केला, ज्यामुळे राम आणि काल देव यांच्यातील चर्चेत खंड पडला. लक्ष्मणाला बघून राम दुविधेत पडले, त्यांना कळे ना काय करावं. ते पहिलेच बोलून चुकले होते की, चर्चेत खंड पाडणाऱ्याला मृत्यू दंड देण्यात येईल. आता एकीकडे त्यांचा निर्णय होता आणि दुसरीकडे त्यांचा प्रिय लक्ष्मण.
पण राम यांनी आपला धर्म निभावला आणि आपल्या प्रिय भावाला राज्य आणि देशातून निष्कासित करण्याचा आदेश दिला. लक्ष्मणाला श्रीरामांच्या अयोध्येतून काढून टाकणे म्हणजे काही मृत्यूदंडापेक्षा कमी नव्हते.
पण लक्ष्मणाला हा निर्णय पटला नाही. आपल्या मोठ्या भावापासून दूर होणे त्यांना जराही मान्य नव्हते. तेव्हा लक्ष्मणाने विचार केला की, अश्या जीवनाचा काय अर्थ. असा विचार करत लक्ष्मण शरयू नदीकडे निघाले आणि त्या नदीत त्यांनी जलसमाधी घेतली.
नदीत जाताच लक्ष्मणाचे अनंत शेष अवतारात रुपांतर झाले आणि अश्याप्रकारे लक्ष्मण विष्णुलोकात पोहोचले.
आपल्या प्रिय भावाच्या विरहाने राम दुखी झाले, त्यांनी त्यांचे शासन सोडले. आपल्या मुलांना आणि भावांच्या मुलांना सर्व सत्ता सोपवून श्रीराम यांनी देखील शरयू नदीत जलसमाधी घेतली.
शरयू नदीत जाताच राम अदृश्य झाले आणि विष्णू अवतारात प्रगटले. त्यांनी सर्वांना दर्शन दिले आणि अश्याप्रकारे राम अवतार आपला पृथ्वीवरील काळ संपवून विष्णुलोकात परतले.
आता तुम्ही विचार करत असाल की, एवढं सर्व घडलं तेव्हा हनुमान कुठे होते? कारण जर ते असते तर हे सर्व झालंच नसतं….!
तर, कथा हे सांगते की – श्री राम हे विष्णू अवतार होते. हे सर्व त्यांनीच रचलेलं होतं. त्यांना माहित होत की, जर हनुमान येथे राहिले तर त्यांना कळून जाईल की काल देव त्यांनाच न्यायला येत आहेत आणि त्यांनी कधीही असे होऊ दिले नसते.
म्हणून ज्या दिवशी काल देव येणार होते, त्याच दिवशी श्रीरामांनी आपली अंगठी राजमहालातील एका फरशीच्या फटीत पाडली आणि हनुमानाला ती शोधून आणण्याचा आदेश दिला.
हनुमान हे तर राम भक्त, त्यांनी कसलाही विचार न करता, आपलं सूक्ष्म रूप धारण केलं आणि निघाले त्या फटीत अंगठी शोधायला. पण ती फट एवढी मोठी होती की, ती हनुमानाला सरळ पाताळात घेऊन गेली. तिथे हनुमानाला नाग राज वासुकी भेटले.
–
- चौदा वर्षांच्या वनवासात प्रभू रामचंद्रांनी कुठे कुठे वास्तव्य केले, वाचा रंजक माहिती!
- रामायणातील या ‘७’ गोष्टी शिकल्याशिवाय आजच्या कॉर्पोरेट जगात यश मिळणं अशक्यच!
–
वासुकी यांनी हनुमानाला अंगठ्यांचा एक मोठा ढिगारा दाखवला जिथे खूप साऱ्या अंगठ्या होत्या…!
वासुकी म्हणाले की, तुम्हाला हवी असलेली अंगठी तुम्हाला या अंगठ्यांच्या ढिगाऱ्यात सापडेल. हनुमानाने त्या ढिगाऱ्यातून एक अंगठी उचलली तर ती प्रभू रामांची होती. हनुमानाने दुसरी अंगठी उचलली ती देखील रामाचीच होती…! हे बघून हनुमान चक्रावले. त्यांना काय घडतंय हे कळतच नव्हते.
तेव्हा वासुकी यांनी त्यांना सांगितले की, पृथ्वी एक असा लोक आहे की –
जो कोणी तिथे येतो त्याला एक ना एक दिवस परत जावच लागतं. त्याचप्रकारे प्रभू रामांना देखील पृथ्वी सोडून जावे लागणार. वासुकीचे हे बोलणे एकूण हनुमानाला सर्व हकीगत कळाली की, रामांनी मुद्दाम त्यांना अंगठी शोधण्याच्या बहाण्याने स्वतःपासून दूर सारले जेणेकरून ते पृथ्विहून विष्णुलोकात परतू शकतील.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.