अनिश्चितता, असुरक्षिततेच्या सावटात ही ५ शहरं लोकांच्या जीवनात मोठाच बदल घडवत आहेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
आपण कितीही धाडसाने वागत असलो, तरीदेखील आपल्या मनामध्ये नेहमी कोणत्यातरी गोष्टीवरून चलबिचल चालत असते. आपण कधीही स्वतःला सुरक्षित मनात नाही.
घरातून बाहेर कुठे जायचे असेल, तर आपण घराला भलेमोठे कुलूप लावूनच घरातून बाहेर निघतो. पण तरीदेखील मनात नेहमी एक भीती राहते की, कुणी आपले घर फोडून चोरी तर करणार नाही ना.
अशी भीती मनामध्ये निर्माण होणे, साहजिकच आहे. पण यावरून हे देखीलं तेवढेच लक्षात येते की, आपण आपल्या शहरामध्ये स्वत:ला सुरक्षित मानत नाही.
स्त्रियांना तर याची नेहमीच भीती सतावत असते, त्या बाहेर फिरायला गेल्या, तरीदेखील त्यांचे अर्धे मन घराकडेच लागलेले असते.
पण आज आम्ही तुम्हाला जगातील काही अशा शहरांविषयी सांगणार आहोत, जी जगातील सर्वात सुरक्षित शहरं म्हणून ओळखली जातात. तेथील लोकांना नेहमी आपण सुरक्षित असल्याचे जाणवते.
‘द इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस यूनिट’ नुसार राहण्यासाठी सर्वात सुरक्षित जागा ती आहे, जिथे लोक कुठल्याही प्रकारच्या भीतीशिवाय राहू शकतात.
चांगले जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, आजूबाजूचा परिसर आणि लोक यावरून खाली दिलेल्या शहरांची यादी काढण्यात आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया, जगातील या सुरक्षित शहरांबद्दल…
१. ओसाका, जपान
या यादीमध्ये सर्वात पहिले नाव येते, ते जपानच्या ओसाका शहराचे. हे शहर जपानची राजधानी असलेल्या टोकियोला लागूनच आहे. तसे तर संपूर्ण जपानमध्येच शांततापूर्ण वातावरण असते. पण ओसाका या शहराची गोष्ट काही औरच आहे.
येथील लोकांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती पाहायला मिळत नाही. येथील लोकं कुठेही सार्वजनिक ठिकाणी बसून असतील तरी ते त्यांचा लॅपटॉप असाच ठेवून जातात, कारण त्यांना माहित असते की, त्याला कुणीही उचलून घेऊन जाणार नाही.
या शहरात खूप मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. त्यामुळे येथे २४ तास काम चालू असते. येथील रस्त्यांवर दिवसाप्रमाणेच उशिरारात्री देखील लोकांची रेलचेल असते.
२. अॅमस्टरडॅम, नेदरलँड
ओसाकानंतर नेदरलँडच्या अॅमस्टरडॅमचे नाव येते. हे छोटेसे शहर देखील सुरक्षेच्या बाबतीत खूप चांगले आहे. येथील लोकसंख्या जवळपास १० लाख आहे.
येथील लोक खूप शांत, सुखी आणि मदत करणारे आहेत. येथे राहणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद पाहण्यास मिळतो. शहरामधील गजबजलेले भाग देखील तेवढेच सुरक्षित आहेत.
या शहराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे येथे तुम्हाला खूप उंच इमारती पाहायला मिळणार नाहीत. हे शहर पाण्यावर वसवले गेले आहे, त्यामुळे येथील घरे सरळ साधी आहेत.
३. सिडनी, ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहराची सुंदरता काही वेगळीच आहे. येथील लोकांना बिंधास फिरताना पाहिल्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की, येथील लोकं किती सुरक्षित आहेत.
सिडनीचे एक स्थानिक रहिवासी रिचर्ड ग्रहम म्हणतात की, जर कुणी संशयास्पद दिसले तर लोक एकमेकांना त्याच्याबद्दल सतर्क करतात. सिडनीविषयी म्हटले जाते की, जेवढे तुम्ही सिडनीच्या या रस्त्यांवर फिराल, तेवढेच लोकांमध्ये मिसळाल. त्यामुळे येथील लोकांना आणि त्यांच्या संस्कृतीला जवळून समजून घ्याल.
४. सिंगापूर
सिंगापूर जगातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक शहर आहे. येथील कायदेव्यवस्था खूप कडक आहे. येथील सरकार पोलीस फोर्सवर खूप खर्च करते.
येथील लोकं देखील खूप इमानदार आहेत. येथे कायद्याचे सक्तीने पालन केले जाते. सिंगापूरमध्ये कुणीही कोणाच्या जाती, धर्माची मस्करी करत नाही. येथील लोक आपल्या कामाच्या ठिकाणापासून जवळ राहणे पसंत करतात. सरकारच्या कायद्याच्या सक्तीमुळे येथे कोणतीही चुकीचे कामे होत नाहीत.
५. स्टॉकहोम, स्वीडन
स्वीडनची राजधानी स्टॉकहोम देखील सुरक्षेमध्ये खूप चांगले आहे. या शहरामध्ये खासकरून मुलांच्या सुरक्षेची चांगल्याप्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे. रस्ते आणि ट्रॅफिकच्या लांब शहराच्या मधोमध मोठमोठे पार्क आणि खेळाचे मैदाने बनवले गेले आहेत.
येथील लोकांचे जीवन देखील आरामदायी आहे. कोणत्याही प्रकारची चलबिचल नाही आहे. नवीन तंत्रज्ञान, फॅशन, डिझाईन यामध्ये येथील लोक नेहमी पुढे राहतात.
येथील जास्तकरून लोक सेंटल बिझनेस डिस्ट्रिक्टच्या जवळ आपर्टमेंटमध्ये राहतात. पण यापेक्षा जास्त शांती असलेली जागेवर राहायचे असल्यास कुंगशोलमेनला देखील जाऊ शकतो, जिथे खिडकीतून बाहेर डोकावल्यावर लगेचच खूप सुंदर निसर्ग दिसतो.
अशा या जगातील सुंदर आणि सुरक्षित शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर कधीही भीतीचे आणि काळजीचे स्वर उमटत नाहीत. आपली शहरं देखील अशीच सुरक्षित असावी, असे नक्कीच तुम्हाला वाटत असेल.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.