जगातील हे दिग्गज क्रिकेटर्स अंधश्रद्धाळू असल्याचा प्रत्यय आपल्याला मॅचदरम्यानही येतो.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
क्रिकेट हा आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय खेळ आहे. क्रि
क्रिकेट कोणताही सामना आपले भारतीय क्रिकेट रसिक पाहिल्याशिवाय राहत नाही. क्रिकेट हे जणू त्यांच्यासाठी एक वेगळे विश्वच आहे. तसेच क्रिकेट हा फुटबॉलनंतर सर्वात जास्त लोकप्रिय खेळ आहे.
धोनी, कोहली, सचिन यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मैदानावर खेळताना पाहिल्यावर लोकांना एक वेगळीच उर्जा अंगामध्ये संचार झाल्यासारखे वाटते.
पण तुम्हाला माहित आहे का ? आपले हे सुपरस्टार क्रिकेटर्स देखील काही अंशी अंधश्रद्धा पाळतात.
सामना जिंकण्यासाठी आणि चांगली कामगिरी करण्यासाठी हे क्रिकेटर्स वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्सचा वापर करतात, ज्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे.
आज आम्ही तुम्हाला भारत आणि जगातील काही अशा क्रिकेटर्सविषयी सांगणार आहोत, जे चांगल्या परफॉर्मन्ससाठी वेगवेगळे फंडे वापरतात. चला तर मग जाणून घेऊया या क्रिकेटर्सबद्दल..
१. सचिन तेंडूलकर
आपल्या सर्वांसाठी क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडूलकर हा नेहमी आधी आपला डावा पॅड घालतो आणि त्यानंतर उजवा पॅड घालतो.
तसेच, सचिन खेळताना त्याच्या फेवरेट बॅटचाच वापर करतो.
वर्ल्डकप २०११ च्या आधी सचिनने आपली फेवरेट बॅट रिपेयर करून घेतली होती, जेणेकरून भारताने विश्वकप जिंकावा.
२. विराट कोहली
टीम इंडियाचा कर्णधार आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळख असलेला विराट कोहली देखील अंधश्रद्धाळू आहे. हे त्याने स्वतः मान्य केले आहे.
माहितीनुसार, विराट आपल्या हातामध्ये रिस्टबँड घालतो. याआधी तो प्रत्येक सामन्यामध्ये एकच ग्लोजची जोडी घालत असे.
तसेच, रिस्टबँडच्या व्यतिरिक्त २०१२ पासून तो त्याच्या उजव्या हातामध्ये कडा देखील घालत असल्याच दिसून आलं.
३. सौरव गांगुली
भारताचा माजी कर्णधार आणि दादा या नावाने नावाजलेला सौरव गांगुली नेहमी आपल्या खिशामध्ये आपल्या गुरूचा फोटो ठेवत असे.
तो सामन्यामध्ये खेळत असताना सुद्धा त्याच्या गुरूचा फोटो आपल्या खिशात ठेवायचा. तसेच, तो लकी चार्म म्हणून रिंग्स आणि माळा घालायचा.
४. महेंद्रसिंग धोनी
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, धडाकेबाज फलंदाज आणि उत्कृष्ट विकेटकीपर म्हणून ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी हा ७ नंबरला लकी मानतो.
त्याचा जन्म हा ७ जुलैला झाला. त्यामुळे तो नेहमी ७ नंबरच्या जर्सीमध्ये दिसतो. या ७ नंबरच्या आकड्याला तो त्याच्या या यशाचे श्रेय देतो.
५. युवराज सिंग
कॅन्सरला देखील मात देणारा भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा जर्सी नंबर १२ हा लकी चार्म आहे.
कारण तो १२ व्या महिन्यात १२ तारखेला जन्मला होता. धोनी प्रमाणे युवराज देखील नेहमी १२ नंबरची जर्सीच घालतो.
६. सनथ जयसूर्या
श्रीलंकेचा सनथ जयसूर्या हा जलदगतीने धावा काढण्यासाठी ओळखला जात असे. तो पहिल्या १५ षटकांमध्ये तो गोलंदाजाना चौफेर फटकेबाजी करत असे.
तो प्रत्येक बॉल खेळण्याच्या अगोदर आपले दोन्ही पॅड, ग्लोज, हेल्मेट आणि पॉकेट चेक करत असे.
७. आर. अश्विन
अश्विन नेहमी आपल्याबरोबर एक बॅग ठेवतो. ही बॅग फक्त त्याच्यासाठी नाहीतर सर्व टीमसाठी लकी आहे, असे तो मानतो.
जेव्हा कधी तो बॅग घेऊन येतो, तेव्हा त्या सामन्यामध्ये भारताचा विजय होतो. २०११ च्या विश्वकपमध्ये अश्विन फक्त २ सामनेच खेळला होता, तरीदेखील त्याने संपूर्ण स्पर्धेमधील सामन्यांमध्ये त्याने ती बॅग नेली होती.
८. झहीर खान
भारताचा उत्तम जलदगती गोलंदाज झहीर खान हा प्रत्येक सामन्यामध्ये स्वतःकडे पिवळ्या रंगाचा रुमाल बाळगतो.
त्याचे मानणे आहे की, पिवळा रंग हा त्याच्यासाठी खूप लकी आहे.
९. मायकल क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क हा सामन्यामध्ये फलंदाजी करण्यासाठी जाण्याअगोदर मोठमोठ्या आवाजात म्युझिक ऐकत असे.
असे मोठ्या आवाजात म्युझिक ऐकण्याला तो लकी मानत असे.
१०. राहुल द्रविड
‘द वॉल’ नावाने सन्मानित करण्यात आलेला राहुल द्रविड, हा नेहमी उजवा थाय पॅड आधी घालायचा.
हे त्याच्यासाठी नेहमी लकी ठरते असे तो मानायचा. तसेच, कोणत्याही मालिकेच्या आधी तो नवीन बॅट ट्राय करत नव्हता.
असे हे क्रिकेटर्स आपल्या लकी चार्मसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स करत असत, मेहनतीबरोबरच खेळामध्ये नशिबाची साथ असणे तेवढेच गरजेचे आहे, असे ते मानतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.