' या काही जोडप्यांनी चक्क हवेत आणि पाण्यात लग्नसोहळा पार पाडला! – InMarathi

या काही जोडप्यांनी चक्क हवेत आणि पाण्यात लग्नसोहळा पार पाडला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न म्हणजे दोन जीवांचे एक अतूट बंधन असते. लग्नानंतर दोन माणसे एका प्रवित्र बंधनात अडकतात आणि त्यांच्या जीवनाचा नवीन प्रवास सुरू होतो. या प्रवासात वेगवेगळ्या प्रकारची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या येतात, त्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण करण्याचा भार त्यांच्या खांद्यावर येतो. ज्या घरात लग्न असते, त्या घरामधील लोकांची खूप धावपळ चाललेली आपल्याला दिसून येते. कधी – कधी या गडबडीत त्यांना घरी आलेल्या पाहुण्यांकडे लक्ष देण्यासाठी देखील पुरेसा वेळ नसतो.

 

Weird Wedding Ceremonies.Inmarathi4

 

असो, हे तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहण्यास मिळते, अगदी आपल्या स्वतःच्या घरी देखील असेच काहीसे घडते. वेगवेगळ्या जाती – धर्माच्या लग्न करण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या असतात. पण काही जोडपी या पद्धती आणि परंपरांच्या देखील खूप पुढे जाऊन अशाप्रकारे लग्न करतात, जी अविस्मरणीय असतात.

आज आम्ही तुम्हाला अशा काही आगळ्यावेगळ्या लग्नांबद्दल संगाणार आहोत, जे तुम्हाला विचार करायला भाग पडतील की, अशाप्रकारे पण लग्न होऊ शकत! चला तर मग जाणून घेऊया, या आगळ्यावेगळ्या पद्धतींच्या लग्नांबद्दल..

स्मशानामध्ये लग्न :

 

Weird Wedding Ceremonies.Inmarathi

 

स्मशानामध्ये देखील लग्न होऊ शकते, असा आपण विचार देखील कधी केला नसेल. पण गुजरातच्या भावनगर येथील महुवा येथील घनश्याम आणि पारूलने हे केले आहे. या दोघांनी स्मशानामध्ये चिता ठेवण्याच्या जागेवरच लग्नाचे फेरे घेतले. मोरारी बापूच्या प्रवचनाने प्रेरित होऊन या जोडप्याने बापूच्या गुजरातमध्ये असलेल्या पैतृकमधील तलगाजरड गावातील स्मशानाला आपल्या लग्नासाठी निवडले.

मोरारी बापूने सांगितले होते की, स्मशानाविषयी जनमाणसात असलेले गैरसमज दूर झाले पाहिजेत. स्मशान अशुभ नाही, तर महान पवित्र ठिकाण आहे. येथे वाढदिवसाबरोबरच लग्न समारंभ देखील झाले पाहिजेत. नातेवाईक आणि कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये बँडबाजा आणि गरबाच्या सोबतीने झालेले हे लग्न सगळीकडेच चर्चेचा विषय बनले होते. यातील वर घनश्याम हा साधू समाज आणि वधू पारुल कोळी समाजाची होती.

समुद्रामधील लग्न :

 

Weird Wedding Ceremonies.Inmarathi1

 

महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या निखिल पवारने स्लोवाकियाच्या युनिका पोगरणला समुद्राच्या खोल पाण्यामध्ये आपली पत्नी बनवले. हा लग्न समारंभ जवळपास एक तास चालला आणि यामध्ये निखिलच्या काही जवळच्या मित्रांनी देखील भाग घेतला होता. निखील आणि युनिकाने या छोट्याशा समारंभामध्ये समुद्राच्या आतमध्ये अंगठी आणि एक खास प्रकारची शंख – शिंपल्यांची माळ एकमेकांना घालून लग्न केले होते.

या लग्नाच्या आयोजन करणाऱ्या ब्रांड सफारीने समुद्राच्या आतमध्ये एक छोटासा मंडप बनवला होता, ज्यामध्ये उभे राहून लग्नाच्या विधी करण्यात आल्या. या लग्नाला भारतामधील पहिली अंडर वॉटर लग्न मानले गेले आहे.

रोपवेवर झुलत लग्न :

 

Weird Wedding Ceremonies.Inmarathi2

 

महाराष्ट्रातीलच कोल्हापूरमध्ये एका जोडप्याने हवेमध्ये लटकत लग्न केले. या जोडप्याचे नाव जयदीप आणि रेशमा हे आहे. जयदीप आणि रेशमा हे दोघे स्वतः तर हवेत लटकले, पण लग्न लावणाऱ्या भटजी बुवांना देखील रोपवेला लटकवत या दोघांचे लग्न लावावे लागले.

===

===

पावनखिंडीमध्ये जमिनीपासून ९० मीटर उंच लोखंडाच्या तारेवर कोणतेही मंडप नव्हते आणि कोणतेही अग्नीकुंड नव्हते. पण कोल्हापूरच्या ३४ वर्षीय जयदीप जाधव आणि रेशमा पाटील हे रोपवेवर लग्न करून सात जन्माच्या बंधनात अडकले. ट्रेकिंगचा छंद असलेल्या या जोडप्याने अश्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्न केले.

हॉट एअर बलूनमध्ये लग्न :

 

Weird Wedding Ceremonies.Inmarathi3

 

चीनमध्ये १०० जोडप्यांनी हवेमध्ये उडत हॉट एअर बलूनमध्ये लग्न करण्याचा रेकोर्ड बनवला आहे. या आगळ्यावेगळ्या सामुहिक विवाहामध्ये ३० देशांतील १ हजार पायलट समाविष्ट होते. चीनच्या हेबुई प्रांतामध्ये जगामध्ये पहिल्यांदाच १०० जोडप्यांनी एकत्र हॉट एअर बलूनमध्ये बसून हवेत लग्न केले, ज्याचे वर्ल्ड फ्लाय एक्स्पोमध्ये एयर स्पोर्ट्स फेडरेशनने आयोजन केले होते.

हा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला आहे. या समारंभामध्ये सर्वात पहिल्यांदा सर्व १०० जोडपी हॉट एअर बलूनमध्ये बसून हवेत उडाली आणि त्यानंतर त्यांनी हवेत लग्नाच्या विधी पार पडल्या. हा खरच एक अविस्मरणीय क्षण होता.

अशा या आणि यांसारखी इतर काही लग्न ही आपल्या समजण्याच्या पलीकडली आहेत आणि त्या जोडप्यांना देखील त्यांचे लग्न कधीही विसरता न येण्यासारखे आहेत. लग्न हे माणसाच्या जीवनामध्ये एकदाच होते आणि ते अविस्मरणीय बनवण्यासाठी तो नेहमी काहीतरी वेगळे करत असतो. त्यामुळे असे काहीतरी केल्यास काहीही चुकीचे नाही…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?