या शासकाने सत्तेच्या लालसेपोटी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतावर जसं इंग्रजानी, मुघलांनी आक्रमण करून आपल्यावर राज्य केलं तसेच इतरही देशांवर कोणत्यातरी हुकूमशहाने ने राज्य केलं आहे! आज लोकशाही आणि हुकूमशाही यापैकी लोकं लोकशाहीकडेच झुकतं माप जातं असं का??
कारण या जगात जेवढे हुकूमशहा होऊन गेले त्यांच्या राजवटीत त्या त्या देशाची अधोगतीच झाली, लोकं दुरावली, जनतेत कटुता निर्माण झाली एकंदरच काय तर या हुकुशहांमुळे त्या देशाची वाताहात झाली!
मुसोलिनी, स्टॅलिन, हिटलर यांची नावं तर सगळ्यांनाच ठाऊक आहेत, नॉर्थ कोरिया सारख्या देशात तर आजही हुकूमशाही राजवटच आहे! आणि त्यामुळे त्या देशातल्या लोकांना काय नरकयातना सोसाव्या लागत आहेत याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही!
प्राचीन काळापासून ते आतापर्यंत या जगातील कित्येक राष्ट्रांवर अनेक शासकांनी राज्य केलं काहीतर आजही करत आहेत.
यापैकी काही शासक असे होते ज्यांचे उदाहरण आपण आजही देतो तर काही असे देखील होते ज्यांनी जगाला क्रूरता काय असते, एक व्यक्ती किती क्रूर असू शकतो हे दाखवून दिले.
क्रूर शासकांबद्दल आपण जेव्हा केव्हा बोलतो तेव्हा एक नाव आपल्या सर्वांनाच आठवत ते म्हणजे अडॉल्फ हिटलर…
पण काय हिटलरच जगातील सर्वातील क्रूर शासक होता तर असे नाही, आज आपण अशाच एका क्रूर आणि उलट्या काळजाच्या शासकाविषयी जाणून घेणार आहोत ज्याने लोकांवर अनन्वित अत्याचार केले!
तो शासक म्हणजे युगांडाचा हुकूमशहा ईदी अमीन. हा जगातील सर्वात बदनाम शासकांपैकी एक होता. याच्या क्रूरपणाची उदाहरणं वाचली तर कोणाच्याही छातीत धडकी भरेल!
ईदी अमीन याला ‘अमीन दादा’, ‘बुचर ऑफ आफ्रिका’ आणि ‘ब्रिटीश साम्राज्याचा विजेता’ अशी अनेक नाव देण्यात आली आहेत जी त्याची हुकुमशाही सिद्ध करतात.
युगांडाचा हुकुमशहा ईदी अमीन २० व्या शतकाच्या अखेरीस सर्वात क्रूर हुकुमशहांच्या यादीत आला. त्याच्या क्रूरतेची परिसीमा म्हणजे त्याने सत्तेच्या आहारी जाऊन युगांच्या १ लाखाहून अधिक लोकांचा जीव घेतला होता.
ईदी अमीन याने ८ वर्षांपर्यंत युगांडाचा राष्ट्रपती म्हणून शासन केले, या ८ वर्षांच्या काळात त्याने तेथील जनतेवर अनेक अत्याचार केले, त्याच्या अत्याचार एवढे भयानक होते की आजही त्याबद्दल वाचताना ऐकताना अंगावर शहारा येतो.
त्याची क्रूरता एवढी शिगेला पोहोचली होती की त्याने केवळ निष्पाप जीवांचा बळीच नाही घेतला तर तो माणसाचं मांस देखील खायचा.
हेच नाही तर त्याच्या फ्रीजमध्ये माणसांचे कापलेले शीर आणि इतर अंग देखील आढळले होते. त्याच्या याच क्रूरता आणि वेडेपणामुळे त्याला ‘मॅड मॅन ऑफ आफ्रिका’ असे म्हणून देखील संबोधले जायचे.
आपले पद आणि सत्ता वाचविण्यासाठी ईदी अमीन याने त्याचे प्रतीध्वंधी आणि अनेक ओबोट सर्मथकांवर देखील खूप अत्याचार केले आणि त्यांची हत्या केली.
यामध्ये अनेक पत्रकार, मंत्रीगण, न्यायाधीश, नेते आणि विदेशी देखील होते. ईदी अमीन याच्या आदेशावर कित्येक गावं देखील नष्ट करण्यात आली. यात मारलेल्या लोकांना नील नदीत फेकून देण्यात आले.
हा केवळ सत्तेचाच भुका नव्हता तर त्याने अनेक स्त्रियांवर अत्याचार करून त्यांच्यावर बलात्कार करून आपल्या वासनेची भूक पर्ण केली.
===
- तब्बल ३९ देशांना आपल्या विरोधात चिथवून युद्ध छेडायला लावणारा एक क्रूर ‘हुकुमशहा’!
- चीनमधील मीडिया सेन्सॉरशिप आणि नेतृत्वाची एकाधिकारशाही: जगाची सूत्रे बदलण्यास सुरुवात===
तो लोकांना मारण्यासाठी कुठल्याही शस्त्राचा वापर करत नव्हता तर तो त्यांना मारण्यासाठी त्यांना जिवंत पुरून देत असे किंवा त्यांना मगरींसमोर सोडून देत असे.
ईदी अमीन याने तेथील सर्व भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना देशातून निष्कासित करून टाकले.
तसेच आशियाई श्रमिकांना देश सोडण्याकरिता केवळ ९० दिवसांचा वेळ दिला. ईदी अमीन याने अशी चेतावणी दिली होती की, जर ‘ते देश सोडणार नाहीत तर ते स्वतःला अग्नीवर बसलेले बघतील.’
सत्तेच्या हव्यासापायी तो एवढा वेडा झाला होता की, माणुसकी काय असते हेच तो विसरला होता. तो कुणाचेही ऐकत नव्हता.
बस त्याला जे वाटेल जसं वाटेल तसं करायचा. ते बरोबर आहे की चुकीचं याच्याशी त्याच काहीच घेणं -देणं नव्हतं. त्याच्या मार्गात जो कोणी येईल तो त्याला संपवून टाकायचा.
१९७९मध्ये तंजानिया आणि अमीन विरोधी युगांडा सेनेने अमीनच्या शासनाला उधळून लावलं. त्यानंतर त्याच्या हुकुमशाहीचा अंत झाला आणि २००३ साली त्याचा मृत्यू झाला!
एकंदरच या अशा क्रूर शासकांमुळे देशाची वाताहत होतेच पण त्या सगळ्यातून पुन्हा उभं राहायला सुद्धा देशाला आणि नागरीकांना सुद्धा प्रचंड वेळ लागतो!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.