Site icon InMarathi

“७ भारतीय चित्रपट” ज्यामधील कल्पना वापरून चोरांनी खऱ्या चोऱ्या घडवून आणल्यात!

Real Robberies InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चित्रपटाचे काही चांगले, तर काही वाईट परिणाम लोकांवर झालेले आपल्याला दिसून येतात.

चित्रपट हे आपल्या ज्ञानामध्ये नेहमीच कोणत्या न कोणत्या नवीन गोष्टीची भर पाडत असतात. तसे म्हटले तर, चित्रपट हे फक्त लोकांच्या मनोरंजनाचा एक भाग आहे.

बहुतेक चित्रपट हे काल्पनिक गोष्टींवर आधारित असतात आणि त्याचा खऱ्या जीवनाशी काहीही संबंध नसतो, त्यामुळे त्यांचा आपल्या मनावर जास्त प्रभाव पडू न देणेच कधीही चांगले असते.

पण सध्या या चित्रपटांमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे आणि त्यामुळे अशक्य वाटणाऱ्या या चित्रपटांमधील गोष्टी खऱ्या आयुष्यामध्ये देखील घडत आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशा काही चोरीच्या घटनांबाबत सांगणार आहोत, ज्यांच्या आयडिया या चित्रपटांमधून घेण्यात आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया, या चित्रपटांशी प्रभावित असलेल्या चोऱ्यांबद्दल…

१. चेलेम्ब्रा बँक रॉबरी केस – धूम

 

 

डिसेंबर २००७ मध्ये चोरांच्या एका समूहाने केरळमधील चेलेम्ब्रा बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर होल केले आणि ८ कोटी रुपये किंमतीचे सोने आणि पैसे घेऊन लंपास झाले.

या चोरांना पकडल्यावर त्यांच्या म्होरक्याने सांगितले की, त्यांना या चोरीची कल्पना धूम या चित्रपटातून आली.

धूम हा चित्रपट प्रदर्शित झाल्यांनतर बाईकवरून येऊन चोरी करणे आणि चेन स्न्याचिंग करून बाईकवरून फरार होणे, अशा घटना वाढल्या होत्या.

२. MNC गोदामातील लूट – बॉम्बे टू गोवा

 

laughingcolours.com

 

१९७२ मध्ये आलेला बॉम्बे टू गोवा या चित्रपटातून प्रेरणा घेत एका MNC कर्मचाऱ्याने गोदामात ठेवलेली तिजोरी लुटण्याची योजना आखली. त्यासाठी त्यांनी एका सुरक्षा रक्षकाला देखील ठार केले.

या चोरांना पकडण्यात आले, पण चोरलेल्या १० लाख रुपयांपैकी पोलिसांना फक्त एक हजार रुपयेच मिळाले.

३. चारकोप रॉबरी केस – स्पेशल २६

 

ndtv.com

 

मुंबईच्या चारकोपमध्ये एका व्यवसायिकाच्या घरावर छापा टाकून आठ जणांच्या एका समूहाने १.५ कोटी रुपये किमतीचे सामान जप्त केले. पण पोलिसांनी त्यांना अटक केली.

आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी ही चोरी केली आणि त्यासाठी त्यांनी ‘स्पेशल २६’ या चित्रपटातून प्रेरणा घेतली. या चित्रपटातून प्रेरणा घेऊन खऱ्या जीवनात जवळपास अश्या १५ केस आजवर झाल्या आहेत.

४. डॉली की डोली – रूडकीमधील लुटारू नवरी

 

ndtv.com

 

तसे तर ‘डॉली की डॉली’ हा चित्रपट खरच एका सत्य घटनेवर आधारित होता. पण या चित्रपटामुळे आणखी एक अशी घटना घडली आहे.

२२ नोव्हेंबर २०१७ ला रूडकी येथील शेतकरी असलेले अजय त्यागी यांचे लग्न कायाशी झाले होते.

लग्नानंतर काही दिवसांनी काया दागिने घेऊन पळून गेली. पोलीस अजूनही तिला शोधात आहेत.

५. DDA प्लॉट रॉबरी केस – खोसला का घोसला

 

rediff.com

 

काही DDA कर्मचाऱ्यांनी खोसला का घोसला या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली युक्ती खऱ्या जीवनात उतरवण्याचा निर्णय घेतला आणि डीडीएच्या भूखंड विक्री आणि पुनर्विक्रीसाठी बनावट कागदपत्रे तयार केली.

त्यामुळे दोन्ही पार्टींमध्ये वाद निर्माण झाले. पोलिसांना यावरून खात्री पटली की, हे ऑपरेशन या चित्रपटापासून प्रेरित आहे.

६. कानपूरमधील बँकेची लूट – ओशंस इलेव्हन (Ocean’s Eleven)

 

cinemablend.com

 

डिसेंबर २०१२ मध्ये कानपूरला ४ लोकांनी बँक ऑफ बडोदामधून २३ लाख रुपये लुटले होते. या लोकांना पकडल्यावर त्यांनी सांगितले की, त्यांना ओशंस इलेव्हन या चित्रपटाने यासाठी प्रेरित केले होते.

त्यांनी चोरी करताना ओळखले जाऊ नये, यासाठी हेल्मेट आणि चष्मा घातला होता. पकडले जाऊ नये, यासाठी त्यांनी आपले सिमकार्डतोडून फेकले होते आणि वेगळे झाले होते.

७. नेता रॉबरी केस – ओय लकी लकी ओय

 

blogspot.com

 

‘ओय लकी लकी ओय’ हा चित्रपट जुन्या काळातील ‘बंटी’ या चोरावर आधारित होता, पण या चित्रपटातून इतरकाहींनी देखील प्रेरणा घेतली आणि या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या चोरीप्रमाणे चोऱ्या खऱ्या आयुष्यात होऊ लागल्या.

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खूप जणांनी त्याचे अनुकरण केले. पण त्यातील लक्षात राहणारी केस म्हणजे सुशिक्षित ग्राफिक डिझायनर सिद्धार्थ मेहरोत्रा याची आहे.

सिद्धार्थ मेहरोत्रा हा रात्रीच्या वेळी प्रशासक आणि राजकारणी यांच्याकडे चोरी करत असे आणि दिवसा विलासी जीवनशैली जगत असे. त्याने चोरलेल्या कारबरोबर फेसबुकवर फोटो टाकला होता आणि त्यावरूनच त्याला पकडण्यात आले.

अशा आणि यांसारख्या आणखी काही चोरी, ह्या चित्रपटामधून प्रेरणा घेत केल्या गेल्या आहेत आणि त्यातील काही तर समजण्याच्या पलीकडच्या आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version