' जपानमधील हा अजब लग्नप्रकार तुम्हाला माहित आहे का? – InMarathi

जपानमधील हा अजब लग्नप्रकार तुम्हाला माहित आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आतापर्यंत आपण माणसांची लग्न बघितली आहेत. एवढंच नाही, तर क्वचित प्रसंगी तुम्ही प्राण्यांची देखील लग्न होताना बघितली असतील. पण या सर्वांना मागे टाकत जपानने आता एक नवीनच लग्न प्रकार अस्तिवात आणला आहे…

आता येथील लोक चक्क अॅनिमेटेड कॅरेक्टर्स सोबत लग्न करायला लागले आहेत.

जपान येथे मागील काही वर्षांपासून लोक लग्न आणि मुलं यांपासून दूर राहायला लागली आहेत. तेथील लोक या जबाबदाऱ्यांपासून घाबरायला लागले आहेत. पण येथील एका कंपनीने याही गोष्टीचा फायदा कसा उचलायचा याकरिता एक अजबच शक्कल लढवली आहे.

 

japan people marrying animated characters inmarathi

 

या कंपनीने पुरुष आणि अॅनिमेटेड कॅरेक्टर्स यांच्या लग्नाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

ओटाकू संस्कृतीनुसार, Waifu एक अशी अॅनिमेटेड मुलगी आहे जिला जपानी पसंत करतात. Waifu हे नाव इंग्रजी शब्द वाईफ यापासून घेण्यात आला आहे. तर हसबंड हा शब्द पुरुषी कॅरेक्टरकरिता वापरण्यात येतो.

एका स्पेशल गेटबॉक्स वेबसाईटनुसार ज्या लोकांना या विचित्र लग्नात इंटरेस्ट असेल ते त्याचं मॅरेज रजिस्ट्रेशन करू शकतात. या साईटवर मॅरेज रजिस्ट्रेशन फॉर्म डाऊनलोड करून तो सबमिट करण्याचा ऑप्शन देखील देण्यात आला आहे.

 

japan-marriage-inmarathi01

 

पण अॅनिमेशन आवडणाऱ्यांकडे एका पेक्षा जास्त Waifu असू शकतात, त्यामुळे या कंपनीने या करिता एक अट ठेवली आहे.

कंपनीच्या अटीनुसार कोणीही व्यक्ती केवळ एकाच कॅरॅक्टरला रजिस्टर करू शकते. मग अश्यात अॅनिमेटेड कॅरेक्टर्सच्या दिवान्यांना त्यांच्या आवडीची Waifu निवडणे नक्कीच कठीण जाईल.

हा त्यांच्यासाठी मुलगी निवडण्याइतकाच कठीण आणि महत्त्वाचा मुद्दा ठरतो.

 

japan-marriage-inmarathi03

 

लग्नाकरिता रजिस्टर करण्याव्यतिरिक्त गेटबॉक्स हा जॉब करिता अप्लिकेशन देखील घेतो आहे. जे लोक या कंपनीमध्ये घेतले जातील आणि त्यांनी त्यांच्या Waifu लग्नाकरिता रजिस्ट्रेशन केलं असेल, त्यांना दरमहा ६० डॉलर्सचा स्टाईपेंड देखील देण्यात येईल.

या व्यतिरिक्त गेटबॉक्स कर्मचारी त्यांच्या Waifu चा जन्मदिवस साजरा करण्याकरिता एका दिवसाची सुट्टी देखील घेऊ शकतात.

जपानी लोक हे अॅनिमेटेड कॅरेक्टर्सकरिता खूप वेडे आहेत. तिथले लोक त्यांच्या आवडत्या अॅनिमेटेड कॅरेक्टर्सचा जन्मदिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा करतात.

यासोबतच गेटबॉक्सने आणखी एक प्रोडक्ट देखील काढलं आहे. ज्याचं नाव गेटबॉक्स वर्चुअल होम रोबोट आहे.

या डीवाईसमध्ये अॅनिमेशन गर्लचा एक छोटासा होलोग्राफिक फोटो आहे. जो वॉइस कमांड्सवर प्रतिक्रिया देतो. हे कॅरेक्टर्स वर्चुएल असिस्टेंट प्रमाणे काम करतात.

हे लाईट लावू शकतात, गाणी वाजवू शकतात तसेच एका स्मार्टफोन अॅपच्या आधारे आपल्या मालकाशी संपर्क देखील साधू शकतात.

या प्रोडक्टमध्ये सध्या दोन अॅनिमेटेड गर्ल्स आहेत, एकीच नाव हिकारी अजुमा आणि दुसरीच Hatsune Miku आहे. Hatsune Miku ही आता १६ वर्षांची आहे.

Waifu रजिस्ट्रेशन ही एखादी मार्केटिंग स्ट्रॅटेजी असू शकते, ज्यावरून लोकांना कुठलं कॅरेक्टर जास्त आवडतं आणि कुठल्या नवीन कॅरेक्टरला ते पसंती देतात हे कंपनीला कळू शकेल, असं काही लोकांना वाटतं.

 

japan-marriage-inmarathi

 

सोशल मिडीयावर या विचित्र प्रकारच्या लग्नालाबाबत अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. कोणी म्हणालं आहे की, हा प्रकार म्हणजे मानवाच्या स्वार्थीपणा कळस आहे, आताच्या काळात लोकं लोकांसोबत नाही तर रोबॉट सोबत राहणे जास्त पसंत करत आहेत, माहित नाही हे जग कुठे चाललंय…

तर कोणी म्हणालं आहे की, माणूस आता भरवश्याच्या लायकीचा राहिलेला नाही, त्याऐवजी जर एखादा रोबॉट असेल तर तो तुम्हाला कधीही दुखवू शकणार नाही…

ह्या लग्नाचा asiaone.come ने दिलेला वृत्तांत ह्या व्हिडीओ मध्ये बघू शकता :

 

 

पण अश्या प्रकारे एखाद्या रोबॉटशी लग्न करणे कितपत योग्य आहे आता हे तुम्हीच ठरवा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?