Site icon InMarathi

आपल्या सौंदर्याने कित्येकांना वेड लावणाऱ्या ह्या अप्सरेच्या जन्माची अज्ञात कथा नक्की वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

एखाद्या सुंदर मुलीला पाहिल्यावर तिची स्तुती करताना आपण जणू स्वर्गातील अप्सराच खाली उतरून आली आहे, असे म्हणतो. आपण त्या मुलीची तुलना अप्सरांशी करतो. रंभा, उर्वशी आणि मेनका स्वर्गामध्ये इंद्राच्या दरबारातील या तीन सर्वात सुंदर अप्सरा होत्या.

त्यांच्याबद्दल तुम्ही वाचले किंवा कोणत्यातरी टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये पाहिले असेल. त्यांचे नाव कधी ऐकण्यात आले की, आपण लगेच त्या कश्या असतील, याविषयी विचार करू लागतो आणि त्यांचे आपल्या मनामध्ये एक चित्र निर्माण करतो.

या अप्सरांचे सौंदर्य आपल्या विचारांच्या पलीकडले आहे. त्यांचे ते रूप मोठमोठ्या तपस्वी साधूंच्या तपश्चर्या भंग करत असे. देवता आणि राक्षस हे तर या सुंदर अप्सरांचा आपल्या वैयक्तिक कामांसाठी देखील उपयोग करत असत.

 

अशीच काहीशी गोष्ट स्वर्गातील सर्वात सुंदर अप्सरा उर्वशी हिच्या जन्माशी निगडीत आहे. जेव्हा दुसऱ्या अप्सरांना आपल्या सौंदर्यावर गर्व होऊ लागला, तेव्हा नर – नारायणने आपल्या एका अवयवाने उर्वशीला तयार केले होते, चला तर मग जाणून घेऊया, यामागील पूर्ण गोष्ट..

स्वर्गातील सर्वात सुंदर अप्सरा उर्वशीच्या उत्पत्ती संबंधित माहिती वामन पुराणाच्या सातव्या अध्यायात आणि भागवत पुराणाच्या चौथ्या अध्यायात मिळते. ही गोष्ट तेव्हा सुरू झाली, जेव्हा भगवान विष्णू यांचा अवतार असलेले नर – नारायण हे बद्रिका आश्रमात तप करत होते. त्याचवेळी त्यांच्या त्या घोर तपावर देवराज इंद्राची नजर पडली.

नर – नारायणला अशाप्रकारे भगवान शंकराची तपश्चर्या करताना पाहिल्यावर इंद्राला आपले सिंहासन जाण्याचे भय वाटू लागले. महादेव यांच्यावर प्रसन्न होऊन माझे सिंहासन त्यांना देतील, अशी चिंता इंद्राला सतावू लागली. त्यामुळे देवराज इंद्राने नर आणि नारायणला लोभात फासून, त्यांना घाबरवून त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. पण इंद्राला काही त्यांची तपश्चर्या भंग करता आली नाही…

 

 

नर – नारायण यांची तपश्चर्या भंग करण्याचा इंद्राचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर इंद्राने कामदेव आणि वसंत ऋतू यांच्याबरोबर इंद्र लोकात असलेल्या समस्त अप्सरांना नर आणि नारायण यांची तपश्चर्या भंग करण्याचा आदेश दिला.

सर्व अप्सरा कामदेव आणि वसंत ऋतूबरोबर बद्रिका आश्रमात पोहोचल्या आणि तिथे नृत्य करू लागल्या आणि जेव्हा अप्सरांच्या घुंगरांचे आवाज नर – नारायण यांच्या कानावर पडले, तेव्हा नर – नारायण यांची नजर नृत्य करणाऱ्या त्या अप्सरांवर पडली.

जेव्हा नर – नारायण यांनी अप्सरांना नृत्य करताना पाहिले, तेव्हा ते समजेल की, इंद्राने या अप्सरांना त्यांचे तप भंग करण्यासाठी पाठवले आहे. स्वर्गातील या अप्सरा खूप सुंदर होत्या आणि त्यांना या गोष्टीवर खूप गर्व होता. त्यांना वाटले की, त्या आपल्या मादकता आणि सुंदरतेच्या जोरावर नर आणि नारायण यांच्या तप सहजच भंग करतील.

 

wittyfeed.com

त्यामुळे या स्वर्गातील अप्सरांचा गर्व तोडण्यासाठी नारायण याने आपल्या उरू भागाने (जांघ) एका सुंदर अप्सरेला जन्म दिला. या अप्सरेला पाहून स्वर्गातील सर्व अप्सरा आश्चर्यचकीत झाल्या. ती एवढी सुंदर होती की इतर अप्सरा तिला बघतच राहिल्या.

नारायणने त्या अप्सरेचे नाव उर्वशी ठेवले, कारण उर्वशीचा जन्म नारायणच्या उरू भागामधून झाला होता. त्यामुळे तिला उर्वशी असे नाव देण्यात आले. त्यानंतर नर – नारायण यांनी ही सुंदर अप्सरा देवराज इंद्राला भेट स्वरुपात दिली, त्यानंतर उर्वशी स्वर्गातील इतर अप्सरांसोबत स्वर्गात राहू लागली.

 

blogspot.com

अशा प्रकारे स्वर्गातील सर्वात सुंदर आणि विलोभनीय अशा या उर्वशी अप्सरेचा जन्म झाला.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version