Site icon InMarathi

धमक्यांना भीक नं घालता घरावर तिरंगा फडकावणारी काश्मिरी मुलगी

topyaps.com

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतातील काश्मीरचा मुद्दा हा सध्या खूप चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी लोक आपल्या भारतीय सैन्यावर करत असलेल्या दगडफेकीचे सूत्र अजून तसेच चालू आहे. सोशल मिडीयामार्फत आणि इतर माध्यमांमार्फत लोक या मुद्द्यावर आपले मत मांडत आहेत. तेथील भारतीय सैन्याला या लोकांना आवरणे थोडे कठीण झाले आहे. त्यांच्या भारताविरोधी घोषणा दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. काश्मीरमध्ये आता इसीसचे आणि पाकिस्तानचे झेंडे काश्मिरी तरुणांच्या हातात असणे आणि हे झेंडे घेऊन भारतविरोधी घोषणा करणे, हे आता रोजचे झाले आहे. हे काश्मीरचे लोक आपल्या भारताकडून त्यांच्यासाठी वेगळे स्वातंत्र्य मागत आहेत. त्यांचे भारताविरोधात रॅली काढून भारताचा निषेध करणे, ही गोष्ट आता तिथे सामान्य सामान्य आहे.

गेल्या शुक्रवारी या काश्मिरी लोकांनी श्रीनगरमध्ये प्रार्थना केल्यानंतर या लोकांनी रॅली काढून भारताच्या विरोधात घोषणाबाजी केली. पण काश्मीरमधील सर्वच लोक भारतच्या विरोधात आहेत, असे नाही आहे. काही लोकांच्या मनामध्ये अजूनही भारताबद्दल आदराची भावना आहे आणि त्यांचे भारतावरचे देशप्रेम जागृत आहे. एका काश्मिरी मुलीने हेच सिद्ध करणारी एक कृती केली आहे. ह्या मुलीच्या मनामध्ये भारताबद्दल प्रेम आहे आणि तिने हे तिच्या कृतीतून दाखवून दिलेले आहे.

 

u4uvoice.com

जम्मू – काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या शब्रोजा या १७ वर्षाच्या काश्मिरी मुलीने आपल्या राहत्या घरावर भारताचा ध्वज फडकवून आपल्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले. शब्रोजा म्हणाली की, “मी भारतीय होते, मी भारतीय आहे आणि मी भारतीय म्हणूनच राहणार आहे.” शब्रोजा सध्या इयत्ता बारावीमध्ये शिकत आहे.

 

Twitter.com

शब्रोजाने पुढे सांगितले की,

“लोक मला आपल्या देशाचा तिरंगा उतरवायला सांगतात. पण मी तिरंगा खाली का उतरवू ? मी भारतीय आहे. त्यांनी मला धमकावण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मी घाबरून झेंडा खाली उतरवेन. पण मी कोणालाही घाबरून हा झेंडा उतरवणार नाही.”

तिच्या या कृत्यामुळे तिच्या परिसरातील काही लोक संतापले आणि त्यांनी तिला झेंडा खाली उतरवण्यास सांगितले. पण शब्रोजा त्यांनी म्हणाली की, मी एकवेळ मृत्यूला सामोरी जाईन, पण हा झेंडा खाली उतरवणार नाही. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शब्रोजा आणि तिच्या कुटुंबाला सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागत आहे.

ट्विटरवरून लोकांनी शब्रोजाला तिच्या या कामामुळे पाठिंबा दिला आहे.

 

 

twitter.com

 

twitter.com

 

twitter.com

 

गेल्या वर्षी लुधियानामध्ये राहणाऱ्या जानव्ही बेहल या मुलीने लाल चौक येथे तिरंगा फडकवण्याची शपथ घेतली होती. परंतु तिला कलम १४४ नुसार परत तिच्या शहरामध्ये पाठवण्यात आले.

पण आता सरकारने यावर  लक्ष देण्याचे ठरवले आहे.  केंद्र सरकार आता औपचारिकरित्या काश्मीरच्या समस्येवर शांतीपूर्ण उत्तर निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यासाठी माजी गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक दिनेश्वर शर्मा यांना जम्मू – काश्मीरच्या केंद्राचा स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह केले आहे. या केंद्र सरकारच्या निर्णयाचे जम्मू आणि काश्मीर या दोन्ही बाजूंनी स्वागत केले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version