Site icon InMarathi

शिपाई, सिक्युरिटी गार्ड, मशीन ऑपरेटर….सर्व जण करोडपती असलेली आगळीवेगळी देशी कंपनी!

Gujarat Company im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – विशाल दळवी  

===

आपण नोकरी का करतो? – तुम्ही म्हणाल -पैसा कमवण्याकरिता.

पण असं विचारलं की – जर तुम्ही already करोडपती आहात, तर तुम्ही नोकरी कराल का?

साहजिकच तुमचं उत्तर असेल “नाही”…! Maybe स्वतःचा बिजनेस कराल…पण नोकरी? शक्यच नाही!

पण गुजरातमधे एक असं शहर आहे जेथील काही लोक करोडपती असून देखील शिपाई आणि सिक्युरिटी गार्डची कामं करत आहेत…!

विश्वास बसत नाही? मग हे संपूर्ण प्रकरण तुम्ही जाणून घ्यायलाचं हवं!

 

 

गुजरात मधील साणंद या शहराची ही गोष्ट आहे. टाटा मोटर्सने पश्चिम बंगाल मधील सिंगूर येथून आपला प्लांट हलवून तो साणंदमध्ये वसवण्यासाठी गुजरात सरकारकडे अर्ज केला.

प्रथम स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला, परंतु गुजरात सरकारने प्रकल्पाचे महत्व पटवून देत जमिनींची योग्य किंमत शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली. त्यामुळे स्थानिकांचा विरोध मावळला आणि त्यांनी जमीन सरकारच्या ताब्यात दिली.

 

 

गुजरात सरकारने बाजार भावाच्या चार पट जास्त किंमतीमध्ये शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेत जमिनीसाठी एकरी तब्बल ७२,०५,०८५ रुपये मोजले.

गेल्या काही वर्षांत गुजरात सरकारने चार हजार हेक्टर भूमी अधिग्रहित केली आहे. याबदल्यात जमिनीच्या मालकांना करोडो रुपये मोबदला म्हणून मिळाले. ज्यामुळे आसपासच्या भागातील लोक एका दिवसात करोडपती झालेत.

२००८ मध्ये जेव्हा टाटा मोटर्सने पश्चिम बंगाल मधील सिंगूर येथून आपला प्लांट हलवून तो साणंदमध्ये वसवला तेव्हापासून साणंद औद्योगिकदृष्ट्या एक हब म्हणून उदयास येत आहे.

 

 

येथील रविराज फोईल्स लिमिटेड कंपनीच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या ३०० पैकी १५० कर्मचारी करोडपती आहेत.

हे लोक येथे मशीन ऑपरेटर्स, फ्लोअर सुपरवायझर, सिक्युरिटी गार्ड आणि शिपाई सारख्या पदावर कामे करतात. त्यांनी जमीन अधिग्रहणातून मिळालेल्या रकमेला सोने, बँक डीपॉझिट सारख्या गुतंवणूक माध्यमांमध्ये गुंतवले आहे.

टाटा प्लांट येण्यापूर्वी येथे केवळ दोन बँकांच्या ९ शाखा अस्तित्वात होत्या, मात्र येथील लोक करोडपती झाल्यापासून आता येथे २५ बँकांच्या ५६ शाखा असून त्यामध्ये सुमारे तीन हजार करोड रुपये जमा आहेत.

( – आणि ज्या सिंगूर हून Tata Nano चा प्रकल्प गुजरातमधे आला, तिथल्या बँका बंद पडण्याची वेळ आली आहे!)

 

 

महिन्याला भरपूर व्याज देणारे करोडोंचे bank deposits असताना देखील केवळ “स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी” काम करत रहाणाऱ्या ह्या गुजराती लोकांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.

पैसा आला म्हणून आळसाने काम करणं सोडू नये, या शिकवणीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हे लोक – असं म्हटलं तर वावगं ठरू नये!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version