आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाचा पुरातत्त्ववेत्ता डेव्हिड केनेडी यांनी “द वर्क्स ऑफ ओल्ड मेन” या नावाने ओळखले जाणाऱ्या प्राचीन दगडाची संरचना शोधून काढण्यासाठी कितीतरी दशके खर्ची घातली आहेत.
ते दगडी दरवाजे सौदी अरेबिया आणि जॉर्डनच्या खोऱ्यातील लाव्हा फिल्ड्समध्ये मिळाले होते. त्याच्याआधी कुणीही त्यांना पहिले देखील नव्हते.
केनेडीने गुगल अर्थचा वापर करून सौदी अरेबियाच्या वाळवंटातील या इतिहासातील प्राचीन दगडाची ४०० काहीही दस्तावेज नसलेले अज्ञात दरवाजे शोधून काढली आहेत. केनेडी यांच्या म्हणण्यानुसार, हे प्राचीन दगडी दरवाजे सुमारे २००० ते ९००० वर्षापूर्वी असलेल्या संस्कृतीची साक्ष देतात.
केनेडी यांनी सांगितले आहे की,
मी त्यांना “दगडी दरवाजे” मानतो. कारण जेव्हा तुम्ही त्यांना पाहता, तेव्हा तुम्हाला ते साध्या लाव्हाच्या शेड्स दिसतात. पण त्यांना जवळून पाहिल्यास लक्षात येते की, ते काही बारने एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एखाद्या दरवाज्याप्रमाणे त्यांचा आकार आहे.
याच्या या आकारावरून असे वाटते आहे की, येथे मनुष्य राहत नव्हते. पण याचा वापर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येत होता असेल. याचा वापर नक्की कशासाठी केला गेला असेल, ही अजून एक गूढ आहे.
या अफाट संरचनेचा भाग निर्जन डोंगर आणि वाळवंटामुळे खूप काळापासून झाकले गेले होते. म्हणूनच ते जमिनीवरून नक्की कुठे आहे, हे निश्चित ठरवणे देखील खूप कठीण होते. केनेडी यांनी याबद्दल समजावून सांगितले की,
“आपण कोणत्याही सुगम मार्गाने त्यांना जमिनीवर पाहू शकत नाही. पण तुम्ही एकदा काही शेकडो फूट उंचीवर गेल्यावर किंवा सेटलाइटच्या मदतीने पाहिल्यास हे खूपच सुंदर दिसते.”
१९७८ मध्ये केनेडीने एरियल फोटोग्राफिक आर्चिव्ह फॉर अर्चिओलॉजी इन मिडल इस्ट (APAAME) ची स्थापना केली होती. जास्तकरून त्याच्या अर्चिओलॉजीकल साईट्सवर जाण्यासाठी तो हेलिकॉप्टरचा वापर करत असे.
त्याने १९९७ पासून एरियल अर्चिओलॉजी इन जॉर्डन (एएजे) च्या प्रकल्पात संयुक्तरीत्या मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञान, जसे सेटलाइट आणि ड्रोनच्या सहाय्याने लक्ष ठेवणे. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या भागांसाठी त्याने या प्रकल्पात मदत केली.
हे दगडी आकार, ज्यांना केनेडी दगडी दरवाजे म्हणून संबोधतो, ही दरवाज्यांची रांग एका दगडांच्या विशाल वर्तुळातून निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
त्यापैकी काही तर ४०० मीटर उंच आहेत. ते वेगवेगळ्या आकारचे असल्याचे दिसून येत आहे. काही पतंगासारखे, काही पेंडंट्ससारखे आणि काही चाकांसारखे दिसतात.
आताच्या काळातील बेडविन (Bedouin) माणसे याला “द वर्क्स ऑफ ओल्ड मेन” म्हणून संबोधतात. पण खरच, बेडविन माणसांच्या पूर्वजांनी या प्राचीन वास्तू तयार केल्या आहेत का, हे अजून अस्पष्ट आहे. या दरवाज्यांबद्दलचे गूढ अजूनही कायम आहे.
आता या दरवाज्यांच्या साईटची ओळख पटवली गेली आहे. यापुढे आता येथे इतर लोकांना जाण्याची बंदी घालून उत्खनन करण्यात येणार आहे आणि या दरवाज्यांना कसे आणि का तयार करण्यात आले, कोणाद्वारे तयार करण्यात आले – हे शोधून काढण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
असे हे प्राचीन दरवाजे एका वेगळाच इतिहास आपल्या उराशी बाळगून आहेत. जो संशोधकांद्वारे लवकरच उलगडेल, असे लोकांना वाटत आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.