Site icon InMarathi

“नमस्कार” संस्कृती लोप पावत असताना वाचा “चरणस्पर्श”चं महत्त्व

rekha asha im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या भारतात थोरामोठ्यांच्या पायाला हात लावून त्यांचा नमस्कार घेण्याची परंपरा पहिल्यापासून चालत आली आहे.

आपण एखाद्या नातेवाईकांच्या घरी गेल्यास किंवा ते आपल्या घरी आल्यास आपले पालक त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेयास सांगतात आणि आपणही आपल्या पालकांचा मान राखून त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतो.

पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की आपण असे का करतो?

 

थोऱ्यामोठ्यांचा मान राखण्यासाठी करतो हे ठिक आहे, पण यामागे काही वेगळी कारणे देखील आहेत…!

आज आम्ही तुम्हाला आपण लोकांना वाकून नमस्कार करण्यामागची काही कारणे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, पाया पडण्याच्या या परंपरेबद्दल.

भारतीय परंपरेनुसार, वडिलधाऱ्या लोकांच्या पायाला स्पर्श करणे, ही त्यांच्याबद्दल असलेल्या आदर दाखवण्याची एक पद्धत आहे. पण अनेक लोक या परंपरेला मनात नाहीत. त्यांचे असे म्हणणे आहे की –

वरिष्ठांबद्दल आदर व्यक्त करण्याचे अनेक मार्ग असतात. त्यांच्याशी अदबीने वागणे, शक्य तेव्हा आधार देणे, मदत करणे अश्या “day to day” गोष्टींमधून, आपल्या नेहेमीच्या वर्तनातून समोरच्याबद्दल चा आदर व्यक्त करता येतो. मग चरणस्पर्श चे “फाजील” उपद्व्याप कशाला?

पण या परंपरेमागे काही विशिष्ट कारणे आहेत, जी आपल्या लोकांना माहीत नाहीत.

द स्पिकिंग ट्री नुसार, पक्षी आणि काही दुर्मिळ सस्तन प्राणी वगळता, बाकी सर्व प्राण्यांचा भार त्यांचा पायावर असतो. मनुष्य देखील त्यांच्यातीलच एका आहे.

माणसाच्या शरीराच्या सर्व वजनाचा त्याच्या पायावर असते, त्यामुळे ते महत्त्वाचे असतात. एखाद्या इमारतीच्या पाया जसा भक्कम असतो, त्याचप्रमाणे माणसाच्या पायाचे आहे.

 

 

जेव्हा आपण एखाद्या समोर वाकतो, तेव्हा आपण आपला अहंकार बाजूला ठेवतो आणि मोठ्या माणसांना आदर देतो. त्यांच्या ज्ञानाला, त्यांना मिळालेल्या यशाला आणि अनुभवांना व्यक्त करतो. त्या बदल्यात ते आपल्या शुभ आशीर्वाद देतात.

अथर्ववेदानुसार, हिंदू धर्माचे वैदिक ग्रंथ सांगतात की, जेव्हा आपण वडिलधाऱ्या लोकांच्या चरणांना स्पर्श करतो, तेव्हा आपण त्यांचे ज्ञान आणि त्यांची शिकवण पुढच्या पिढीला देण्यासाठी त्यांची परवानगी घेतो.

प्राचीन परंपरेनुसार, वडिलधाऱ्या लोकांच्या चरणांना स्पर्श करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे – आपले पाय वाकवून हात आणि खांदे सरळ समोर समोर झुकवावे आणि मान खाली वाकवावी.

आपल्या डाव्या हाताने त्यांच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताने त्यांच्या उजव्या पायाला स्पर्श करून आदरपूर्वक नमस्कार करावा.

 

 

असं समजलं जातं की आपण वडिलधाऱ्या लोकांच्या पायांना स्पर्श करतो, त्यावेळी त्यांच्या पायामधून उच्च सकारात्मक ऊर्जा वाहते आणि ती सद्भावना आणि आशीर्वादाच्या स्वरूपात पाया पडणाऱ्या व्यक्तीला हस्तांतरित केली जाते.

जेव्हा त्या वडिलधाऱ्या माणसाने आशीर्वाद देण्यासाठी पाया पडणाऱ्या व्यक्तीला हात लावला, तेव्हा ते सर्किट पूर्ण होते.

चरण स्पर्श करणे, हा एक प्रकारचा छोटासा, काही सेकंदांच्या योगासनासारखाच प्रकार आहे.

जेव्हा आपण वडिलधाऱ्या लोकांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकतो, तेव्हा त्यामुळे गुडघे, पाठ वाकवले जातात, खांदे ताणले जातात. ह्याने गुडघ्यांच्या वेदना कमी होतात आणि कंबर व पाठ विस्तारित होण्यास मदत होते.

शिवाय असे देखील म्हटले जाते की, आशीर्वाद घेण्यासाठी वाकल्याने रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होते. खाली वाकल्यावर तेवढा काळ मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो.

 

 

आपण काही सर्वच लोकांना वाकून नमस्कार करत नाही. आपण फक्त आपले आजी – आजोबा, शिक्षक, पालक, मोठे बंधू आणि काही प्रतिष्ठित लोकांनाचेच चरण स्पर्श करतो. अश्यांना, ज्यांच्याकडून आपल्या मनोभावे आशीर्वाद मिळतात आणि आपल्या मनाला देखील त्यांच्या पाया पडल्याने समाधान मिळते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version