स्वत:च्या विचित्र नावामुळे त्याला मिळाली पोलिसाची नोकरी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एखादा मनुष्य या जगामध्ये आल्यावर त्याला पहिल्यांदा कोणती गोष्ट मिळत असेल, तर ते म्हणजे त्याचे नाव. त्या नावावरून पुढे सर्वजण त्याला ओळखतात. त्यामुळे नावाचे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे.
एखादा माणूस यशस्वी झाल्यानंतर त्याचे नावच लोकांसाठी महत्त्वाचे असते. त्याचे नाव घेतल्या – घेतल्या लोकांचा चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह निर्माण होतो.
आता हेच बघा ना, मैदानावर विराटा कोहली फलंदाजी करण्यासाठी येणार आहे, हे जेव्हा समजते. त्यावेळी विराट कोहली हे नाव ऐकूनच चांगल्या – चांगल्या गोलंदाजाना घाम फुटतो.
आता तुम्ही विचार कराल की, आम्ही नावाबद्दल एवढे का सांगत आहोत? आज आम्ही तुम्हाला इंडोनेशियामधील अशा एका तरुणाच्या गोष्ट सांगणार आहोत, ज्याच्या फक्त नावाने जीवन बदलून टाकले आहे. चला तर मग जाणून घेऊया, या इंडोनेशियातील तरुणाबरोबर घडलेली ही घटना..
इंडोनेशियामधील एका २२ वर्षीय तरुणाचे जीवन फक्त नावामुळे पूर्णपणे बदलले गेले आहे. आपल्या विचित्र नावामुळे हा तरुण फक्त चलन देण्यापासून वाचला नाही, तर त्याला स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये नोकरी देखील मिळाली आहे.
खरेतर, पोलिसी नावाच्या या तरुणाला पोलिसांनी पकडले होते, कारण तो विना परवाना गाडी चालवत होता. पण जसे वाहतूक पोलिसांना हे समजले की, त्याचे नाव पोलिसी आहे. तेव्हा ते आश्चर्यचकीत झाले, कारण इंडोनेशियन भाषेमध्ये पोलिसीचा अर्थ पोलीस असा होतो.
इंडोनेशियामध्ये कितीतरी लोक आपल्या आडनावाचा वापर करत नाही आणि पोलिसी पण त्यातीलच एक होता. पोलिसी हा Pasuruan शहरात राहणारा होता आणि एक गरीब कंस्ट्रक्शन कर्मचारी होता.
त्याने पोलिसांना सांगितले की, त्याच्या कुटुंबियांमध्ये तो एकटाच कमावणारा व्यक्ती आहे आणि त्याच्यावर त्याचे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे.
पोलिसी आणि वाहतूक पोलिसांच्या संभाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसीच्या या विनवणीमुळे या दयाळू आणि संवेदनशील पोलीसवाल्यांनी फक्त त्याचा दंडच माफ केला नाही, तर त्याला स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये नोकरी करण्याची देखील ऑफर दिली. सोमवारपासून पोलिसीने आपल्या नवीन नोकरीवर जाण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसी आता ड्रायव्हिंग लायसन्सच्या टेस्टमध्ये पोलिसांना मदत करत आहे. तरीपण तो खूप नर्व्हस होता, कारण त्याने आतापर्यंत कोणत्याही ऑफिसमध्ये काम केले नव्हते. वाहतूक पोलीस युनिटचे हेड एरिका पुत्राने पोलिसीला त्याच्या कामाच्या पहिल्या दिवशी मार्गदर्शन केले आणि आज हा मुलगा चांगल्याप्रकारे स्थानिक कर्मचारी बनला आहे.
अशाप्रकारे या तरुणाने आपल्या विचित्र नावामुळे लोकांची मने जिंकून चांगली नोकरी प्राप्त केली. त्याच्याबरोबर घडलेल्या या प्रसंगावरून महान लेखक विल्यम शेक्सपियर यांनी बोललेले “नावात काय आहे?” हे शब्द खरेच बरोबर आहेत का – असा प्रश्न पडतो.
—
- उंच मुलींचा बांधा सुबक, व्यक्तिमत्व उठावदार दिसण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स
- पीटर इंग्लंड ते मॉन्टे कार्लो : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.