टाईम ट्रॅव्हेलिंग शक्य आहे..?
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
भविष्य हे कसं असेल हे कोणालाच माहित नाही. म्हणूनच आपण भविष्य जाणून घेण्यास नेहमी उत्सुक असतो. काही वैज्ञानिकांनी तर त्यांचे संपूर्ण जीवन या भविष्याबद्दल संशोधन करण्यात घालवले. पण भविष्यात जाणे म्हणजेच टाईम ट्रॅव्हलिंग हे सर्व काल्पनिक असून ते केवळ चित्रपटांतच शक्य आहे. असाच निष्कर्ष या वैज्ञानिकांच्या संशोधनातून समोर आला. तरीदेखील अजूनही यावर संशोधन सुरूच आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून काही अश्या घटना घडत आहेत ज्या टाईम ट्रॅव्हलिंग आणि एलियन्स सारख्या काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात असल्याचा भास करवून देत आहेत.
काही दिवसांआधी अमेरिकेच्या पोलिसांनी ब्रयांट जॉनसन नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती. तेव्हा ब्रयांट याने सांगितले की, तो भविष्यातून आला आहे, त्याच्या म्हणण्यानुसार तो २०४८ सालातून आला आहे. तसेच २०१८ मध्ये एलियन्स पृथ्वीवर हल्ला करणार आहेत, असेही त्याने सांगितले होते. त्याच्या या वक्तव्याने अमेरिकेच्या तसेच जगाच्या अनेक वैज्ञानिकांना संभ्रमात पडले होते. तर दुसरीकडे रशियात बोरिस्का मिप्रियानोविच नावाच्या २० वर्षीय मुलाने तो मंगल ग्रहाचा रहिवासी असल्याचा दावा केला होता. अंतराळाबद्दलच्या आपल्या अद्भूत ज्ञानाने वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञांना त्याने अचंभित करून सोडले होते.
एलियन्स हल्ला करणारेत : ह्या दोघांच्या दाव्यांमुळे अमेरिका, रशिया चक्रावलेत
अशीच आणखी एक घटना समोर आली असून ही व्यक्ती देखील स्वतःला टाईम ट्रॅव्हेलर सांगते आहे. त्याच्यानुसार तो भविष्यातून आला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे तो सध्या सर्वांचाच चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय बनला आहे.
दक्षिण अमेरिकेत राहणारी ही व्यक्ती भविष्यात जाऊन आली आहे, त्यासोबतच त्यांनी भविष्यातील काही संशोधन आणि काही घटना देखील उघड केल्या आहेत. त्याच्या या दाव्यांमुळे टाईम ट्रॅव्हेलिंगमध्ये विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या आशा बळावल्या आहेत.
या टाईम ट्रॅव्हेलरच नाव नोआह असे सांगण्यात येत आहे. हा तुटक्या अमेरिकी भाषेत बोलतो. नोआह याने स्पष्ट केले की, तो २०३० मधून आला आहे. त्याने असा देखील दावा केला आहे की, त्याने २०३० बघितले आहे आणि तो हे सिध्दही करू शकतो. पण त्याने स्वतःचे खरे नाव सांगितले नाही. त्याला भीती आहे की, असं केल्याने त्याचा जीव धोक्यात येईल.
या व्यक्तीने २०२१ बाबत देखील अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्याने सांगितले की, त्याचा येथे येण्याचा एकच उद्देश आहे की, टाईम ट्रॅव्हलिंग शक्य आहे. जेव्हा की महान वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी आधीच असा दावा केला आहे की, टाईम ट्रॅव्हेलिंग शक्य नाही. नोआह याने हे देखील सांगितले की, तो आता ५० वर्षांचा आहे पण त्याने वय कमी करण्याचं औषध घेऊन तो २५ वर्षांचा झाला आहे.
नोआह सांगतो की,
‘मी २०२१ चा आहे आणि मी त्याच काळाचा निवासी आहे. पण मला तेथून पळवून लावण्यात आले, ज्यामुळे मी आता २०१७ मध्ये येऊन फसलो आहे. मी दावा करतो की, २०२८ मध्ये प्रायव्हेट संस्था जगाला सांगतील की टाईम ट्रॅव्हलिंग ही कल्पना नसून वास्तविकता आहे. टाईम ट्रॅव्हलिंग हे २००३ पासूनच शक्य झालं आहे.’
नोआह याने हे देखील सांगितले आहे की तो डिप्रेशन आणि एनोरेक्सिया या आजारांनी ग्रासलेला आहे. त्याची वागणूक आणि तणावावरून हे कळून देखील येतं. त्याच्या विनंती वरच त्याचा चेहरा ब्लर करण्यात आला आहे. त्याला भीती आहे की, त्याने केलेले दावे आणि भविष्यवाणी याने ताच्या जीवाला धोका असू शकतो.
नोआह याने जी भविष्यवाणी केली आहे, ती काही खूप आश्चर्यजनक नाही. कारण ते सर्व शक्य असू शकत हे आताच आपल्याला दिसून येत आहे. नोआह याच्या भविष्यवाणीनुसार वर्चुअल रिअॅलिटी आणि आर्टिफिशिअल इंटेलीजेंस प्रगती करेल, इलेक्ट्रिक आणि सेल्फ ड्रायव्हिंग कर यांचा स्तर वाढणार, गुगल ग्लासचे चलन वाढणार, रिन्युएबल एनर्जीचा वापर वाढेल, तसेच २०२१ सालच्या राष्ट्रपती मतदानात देखील डॉनल्ड ट्रंप हेच परत जिंकून येतील असाही दावा त्याने केला.
पॅरानॉर्मल एलिट यांनी नोआहचा हा व्हिडीओ रिलीज केला आहे. सोबतच या संस्थेने त्यांचे आरोग्य सुधारण्याकरिता त्याला ७०० डॉलर्सची मदत देखील केली आहे.
नोआह चा हा व्हिडीओ तुम्ही येथे बघू शकता :
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.