आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लग्न ही एक अशी गोष्ट असते की, लोकांनी ती केली तरी त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते आणि नाही केली तरी देखील समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बहुतेक जण लग्न करूनच समस्यांना सामोरे जाण्यासाठी तयार असतात.
आपल्या परंपरेनुसार, लग्न करणे हे खूप महत्वाचे जाते. एखादा नवीन मनुष्य आपल्या जीवनामध्ये येऊन आपले जीवन प्रेम आणि आनंदाने भरण्याचा प्रयत्न करत असतो.
पण प्रत्येकवेळी असे होईलच असे नाही, कारण काही लोकांना लग्न केल्यानंतर सुख कमी आणि दुःखचं जास्त मिळत असतात, तो अक्षरशः या लग्नाला कंटाळून जातो. त्यामुळे आपला जोडीदार निवडताना काळजी घेणे गरजेचे असते.
प्रत्येकालाच या परिस्थितीतून जावे लागतेच. पण तुम्हाला हे माहित आहे का ? की अविवाहित लोक हे विवाहित लोकांपेक्षा सुदृढ असतात.
लग्नानंतर आपल्यात झालेल्या बदलांचा प्रभाव आपल्या जीवनावर देखील होतो. जर पाहिले तर १९६० ते १९७० च्या दशकामध्ये लग्न झालेल्या लोकांचे आयुष्य (मुख्यतः पुरुषांचे) विवाहानंतर बऱ्यापैकी चांगले आहे.
पण त्यानंतर करण्यात आलेल्या संशोधनामध्ये हे दिसून आले आहे की, विवाह झालेल्या लोकांच्या ऐवजी अविवाहित लोक खूप सुखी आयुष्य जगत आहेत.
याचा असा अर्थ होत नाही की, लग्न हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. या संशोधनाची विभागणी करून पाहिल्यास काही ठराविक असा नाही, पण ३ ते ४ वर्ष लग्नाला उलटून गेलेल्या लोकांच्या आरोग्यामध्ये काही चांगला बदल दिसला नाही.
लग्नाला ५ ते ९ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेल्या लोकांचे आरोग्य चांगले असल्याचे दिसून आले, तसेच या लोकांना चांगले व्यावहारिक सुख देखील लाभल्याचे दिसून आलेले आहे.
२०१७ मध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून असे लक्षात आले आहे की, लग्नाचे आरोग्यावर चांगलेच परिणाम होतात, असे नाही. त्याचे वाईट परिणाम देखील दिसून आले आहेत. त्यामधील घटस्फोटाचा खूपच नकारात्मक प्रभाव मनावर आणि आरोग्यावर झालेला जाणवतो.
तसेच शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानंतर विवाहाचे आरोग्यावर चांगलेच परिणाम झाले आहेत का ? अशी शंका निर्माण केली आहे.
विवाहानंतर ताण – तणाव वाढल्याचे यामधून दिसून आले आहेत, तसेच भविष्याचा विचार यामुळे लोकांचा त्रास वाढतो. आपल्या जोडीदाराला कधी – कधी समजून घेतानाच खूप वेळ जातो आणि त्यांचा त्रास वाढतो. त्यामुळे त्याचा प्रभाव त्यांच्या आरोग्यावर दिसून येतो.
विवाहित लोक आपल्या जोडीदाराकडे आणि त्यांच्या मुलांकडे (जर असतील तर) यांच्याकडेच सगळे लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे इतरांसाठी त्यांच्या जीवनात खूप कमी जागा असते.
इतरांच्या सुखामध्ये आणि त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारा वेळ हा या लोकांकडे नसतो आणि त्यामुळे ते त्यांच्याच कुटुंबामध्ये रमण्याचा प्रयत्न करतात.
पण जर त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबाकडून सुख मिळत नसेल, तर त्यांचा ताण वाढतो आणि ते लोक तणावाखाली जातात आणि याचाच चुकीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसून येतो. तुम्ही अशी कितीतरी विवाहित माणसे पाहिले असतील, जी अविवाहितांना लग्न न करण्याचा सल्ला देत असतात. त्याचे काही प्रमाणात कारण हेच आहे. स्विस अभ्यासकाने म्हटले आहे की,
लग्न हे प्रामुख्याने चांगल्या आरोग्याऐवजी एखाद्याच्या जीवनाच्या अधिक सकारात्मक मूल्यांकनाशी जोडलेले आहे.
अशाप्रकारे लग्न हे तुमच्या आरोग्यावर परिणाम करते. पण याचा अर्थ असा नाही की, लग्न करू नये. लग्न करून जर तुम्हीं लहान-सहान गोष्टींमध्ये सुख शोधलात तर तुमच्या आरोग्यावर नक्कीच चांगला परिणाम होईल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.