ह्या इकोफ्रेंडली सायकलची किंमत एकूण तुम्ही नक्कीच चक्रवाल
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आपल्या देशात आयडिया आणि क्रिएटिव्हीटीची काही कमी नाही. आपण आजवर अनेक असे शोध लागलेले बघितले असतील ज्यामुळे आपले दैनंदिन जीवन आणखी सोयीचे झाले आहे. अशीच एक सोयीस्कर क्रिएटिव्हीटी लवकरच पिंपरी-चिंचवड येथील लोकांना बघायला मिळणार आहे.
येथे लवकरच एक आगळी- वेगळी सायकल रस्त्यावर फिरताना दिसणार आहे. ही सायकल प्लास्टिक किंवा मेटलची नसून ती बांबू पासून तयार करण्यात आली आहे. ही सायकल इतर सायकल्सच्या तुलनेत वजनाने हलकी पण मजबूत असणार आहे. या सायकलच वजन केवळ २ किलोग्राम असणार आहे.
बांबू इंडियाचे फाउंडर योगेश शिंदे हे सांगतात की,
प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. त्यामुळे पर्यावरणाला नुकसान होण्यासोबतच आपल्या जीवनावर देखील त्याचा वाईट परिमाण होतो आहे, त्यामुळे आम्ही एक अशी टेक्निक अमलात आणण्याच्या प्रयत्नात आहोत ज्यामुळे पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल. मला आशा आहे की, या सायकल्स लवकरच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘रेंट ए सायकल’ या योजनेचा भाग बनतील.
बांबू पासून बनलेल्या या सायकलची किंमत ३५ हजार रुपये असणार आहे. या सायकलचा ऑनलाईन बेस हा संपूर्ण भारतात ९ हजार पेक्षा अधिक आहे. तर अमेरिका आणि युरोपमध्ये ही सायकल अतिशय लोकप्रिय होत चालली आहे.
शिंदे यांनी सांगितले की,
आम्ही आमच्या प्रोडक्टला ऑनलाईन विकतो आणि दर वर्षी ४-५ भारतीय या सायकलला विकत घेत आहेत. तर १०-१५ सायकल्स जगात अनेक ठिकाणी एक्सपोर्ट केल्या जात आहेत. नुकतेच आम्ही १०२ ऑर्गानिक स्टोर्स सोबत टायअप केले आहे. येथे या बांबू सायकल्स ला विकण्याकरिता ठेवण्यात येईल.
या सायकल्सना वेल्हे तालुक्यात राहणाऱ्या १० शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी बनवल्या आहेत. पुण्याहून ५५ किलोमीटर दूर हे लोक बांबूची शेती करतात. बांबूपासून बनणारे प्रोडक्ट्स आणि कच्चा माल याच शेतकऱ्यांकडून घेतले जाते. या शेतकऱ्यांना सायकल बनविण्याच, जोडण्याच प्रशिक्षण देण्यात आलं होतं.
ही सायकल मजबूत, वॉटर रेस्सिटेंट आणि वजनाने हलकी असते. या व्यतिरिक्त ग्राहकांना त्यांची सायकल कस्टमाइज करण्याचं ऑप्शन देखील मिळते. ही सायकल गियर आणि नॉन गियर या दोन्ही फॉर्ममध्ये उपलब्ध आहे.
शिंदे यांचा फ्युचर प्लॅन हा, सह्याद्री रांगांमधून बांबूची उपलब्धता सहज करणे आणि त्यांच्या कंपनीसोबत कमीत कमी १०० नवीन शेतकरी कुटुंबांना त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग सेटअप सोबत जोडणे आहे.
ही कंपनी सध्या Dendrocalamus Strictus नावाच्या बांबूच्या प्रजातीचा उपयोग करून ही सायकल बनवत आहे. बांबूच्या एकूण१३६ प्रजाती असतात आणि ही कंपनी सायकल्सना आणखी नवीन प्रजातींबरोबर देखील प्रयोग करू इच्छित आहे. तसेच त्यांनी या सायकलचे वजन १.८ किलोग्रॅम पर्यंत आणण्याचं ध्येय ठेवलं आहे.
जरी ही बांबू सायकल इको-फ्रेंडली आणि युनिक असली, तरी त्याची किंमत बघून तुम्ही नक्कीच चक्रावले असाल… आणि ही सायकल घेण्याआधी दोनदा नक्की विचार करालं….
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.