आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हिंदू-मुस्लीम तेढ तर आपल्या देशात सुरूच असतात. या दोन्ही धर्मांतील काही लोकं अशी असतात ज्यांना त्यांच्याचं धर्म सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवायचं असत आणि मग त्यातून हा द्वेष निर्माण होतो, पण या सोबतच अनेक ठिकाणी आपल्याला हिंदू-मुस्लीम ऐक्य देखील बघायला मिळत.
आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल एकूण तुम्ही देखील थक्क व्हाल..
मंदिर आणि दरगाह हे अमोरासमोर असलेले तर आपण अनेक वेळा बघितले असेल, पण काय तुम्ही कुठलं असं मंदिर बघितलं आहे जिथे दरगाह आहे? नाही ना.. म्हणूनच आज माही आपल्याला अशाच ठीकाणांबद्द्ल सांगणार आहोत.. जिथे कुठल्याही प्रकारच्या द्वेषाशिवाय प्रार्थना आणि इबादत दोन्ही केल्या जाते.
एकाच परिसरात बनलेली सईद गुलाम चिश्तीची दरगाह आणि शिव मंदिर ही हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि आपुलकीच सर्वोत्तम उदाहरण आहे. हे ठिकाण पश्चिम बंगालच्या झाडग्राम जिल्ह्याच्या घोराधरा गावात आहे. हे धर्मस्थळ मागील २३ वर्षांपासून हिंदू-मुस्लीम एक्याची शिकवण देत आहे.
येथे प्रत्येक सायंकाळी भजन झाल्यानंतर त्याच लाउडस्पीकर आणि माइकमध्ये एकाच ढोलकी आणि पेटीवर कव्वाली देखील गायिली जाते. या धर्म स्थळाच्या परिसरात केशरी जो हिंदू धर्म दर्शवतो आणि हिरवा जो मुस्लीम धर्म दर्शवतो, या दोन्ही रंगाचे झेंडे लावण्यात आले आहे.
या ठिकाणची देखभाल करणारे नारायण चंद्र आचार्य त्यांच्या मते,
“१९८६मध्ये हे मंदिर बनविले होते. त्यानंतर मी मुस्लीम पीर सईद गुलाम चिश्ती यांच्यापासून खूप प्रभावित झालो होतो. १९९४ साली चिश्ती साहब यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांच्या शेवटच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी मी त्यांना शिवलिंग जवळ दफन केले. या ठिकाणावर आजपर्यंत कुठल्याही व्यक्तीने आपत्ती दर्शविली नाही.”
आचार्य सांगतात, की पीर साहब हे संस्कृतमध्ये गीता, वेद आणि उपनिषद एकविण्यासोबतच अरबी भाषेत कुराणआणि आयत देखील ऐकवीत होते. पीर साहब हे आचार्य यांना सांगयचे की, ‘गीता आणि कुराण यांची शिकवण एकच आहे.’ ही दोन्ही धर्मग्रंथ प्रेम आणि एकता शिकवितात.
आचार्य याचं म्हणन आहे की, “एवढ्या वर्षांपासून मी या ठिकाणी एकता आणि शांतता बनवून ठेवली आहे. पण मला नेहेमी याची चिंता लागलेली असते की, माझ्या मृत्यूनंतर या ठिकाणाच काय होईल?”
दुसर ठिकाण म्हणजे, अलवार येथील मोती डूंगरी पहाडावरील हे धार्मिक स्थळ. जिथे सय्यद दरबार यासोबतच संकट मोचन हनुमान मंदिर देखील आहे. हे धार्मिक स्थळ कित्येक वर्षांपासून असच आहे.
या धार्मिक स्थळाची देखभाल करणारे केअरटेकर महंत नवल बाबा यांना त्या लोकांपासून आपत्ती आहे जे एकाच छताखाली दोन धार्मिक स्थळ आहेत हे बघून आश्चर्यचकित होतात. त्यांच्या नुसार,
“दोन्ही धर्म एकच मार्ग दाखवितात. मग त्यात काय अडचण आहे?”
येथे एकाच पूजेच्या थाळीत दोन्ही धर्मस्थळांची पूजा केली जाते. आधी लोकं हात जोडून टीका लावून घेतात आणि त्यानंतर डोक्यावर कपडा बांधून प्रार्थना देखील करतात.
आजवर जिथे आपण नेहेमी हिंदू-मुस्लीम तेढ यांबद्दलच वाचत आलो आहोत तिथे अश्या एखाद्या ठिकाण बद्दल वाचून नक्कीच तुम्हालाही छान वाटलं असेल.
प्रत्येक धर्म हा समांतर आहे, कुठलाही धर्म उच्च नाही आणि तुच्छही नाही. तर प्रत्येक धर्म हा आपल्याला ऐक्य, प्रेम, एकता याचीच शिकवण देतो. त्यामुळे आतातरी आपण या सर्वांच्या पुढे जाऊन विचार करायला हवा… नाही का?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.