Site icon InMarathi

हिटलरच्या विचित्र सवयी, त्याचं “शेवटचं जेवण” आणि मृत्यू अशा प्रकारे उलगडला!

Adolf Hitler im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

अडॉल्फ हिटलर… याच्याबद्दल तर आपण सर्वच जाणतो. पण नुकतीच त्याच्याबद्दल आणखी एक रोचक माहिती समोर आली आहे.

ज्यात त्याचे शेवटचे जेवण आणि अश्याच काही इतर गोष्टी उघड झाल्या आहेत. ही माहिती एका जर्मन इतिहासकाराने सांगितली आहे.

 

 

हिटलरने  १९३० च्या शतकात मांस खाणे सोडले होते, म्हणजेच तो शाकाहारी झाला होता.

Constanze Manziarly या २३ वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांनी १९४३ मध्ये हिटलरसाठी एक स्पेशल डायेट कुक म्हणून काम करण्यास सुरवात केल होती. पुढील दोन वर्षांसाठी म्हणजेच १९४५ पर्यंत त्या हिटलर सोबतच होत्या.

 

 

Manziarly यांच्या होमटाऊन Innsbruck येथील शोधकर्ता Stefan Dietrich यांनी त्यांची काही वैयक्तिक पत्रे जाहीर केली आहेत. जी Constanze Manziarly त्यांच्या बहिणीला १९४४ लिहिली होती.

 

 

Constanze Manziarly यांनी त्यांच्या बहिणीला लिहीलेल्या पत्रात त्या तक्रार करत आहेत की त्या एक Specially Trained Rawfood कुक असूनसुद्धा त्यांना हिटलरला संतुष्ट करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. हिटलरच्या विचित्र मागण्यांना पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासमोर रोज एक नवीन समस्या उभी व्हायची. Manziarly हे देखील लिहितात की,

हिटलर कधी-कधी अनियंत्रित होऊन जातात आणि उशिरा रात्री जनरल्स सोबत मिटिंग करता करता सर्व केक्स संपवून टाकायचे. मी रोज खूप सारे केक बनवते पण सायंकाळ होताच सर्व संपून जातात.

 

 

हिटलर यांनी Manziarly ला भेटवस्तू म्हणून स्टॉकिंग्स दिले होते. याबद्दल त्या त्यांच्या बहिणीला लिहितात की,

‘बॉसला स्त्रियांच्या फॅशन बद्दल जास्त काही माहित नाही.’

बॉस म्हणजेच हिटलर यांना महिलांच्या फॅशन बद्दल जास्त काही माहिती नाही असे त्या म्हणतात.

 

 

ऑक्टोबर १९४४ पासून Manziarly त्यांच्या पत्रांत कोड वर्ड्सचा वापर करायला लागली. ज्यात हिटलर करिता त्या Chief Doctor या शब्दाच्या प्रयोग करायच्या.

३० एप्रिल १९४५ ला Manziarly यांनी हिटलर करिता शेवटचे जेवण बनवले होते, ज्यात बटाटे आणि तळलेली अंडी होती. पण ते खाण्याआधीच हिटलरने आत्महत्या केली. स्वतःला गोळी मारण्याआधी हिटलरने बर्लिनच्या बंकरमध्ये पास्ता आणि टोमॅटो सॉस खाल्लं होतं.

हिटलरच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर, Manziarly यांना रशियाच्या रेडआर्मीचे दोन सैनिक पकडून घेऊन गेले. त्यानंतर त्यांना कधीही कोणी बघितलेले नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – हिटलरने आत्महत्या केली की तो ९५ वर्षे जगला? वाचा यामागचं थक्क करणारं सत्य!

====

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version