Site icon InMarathi

ह्या सुंदर गावात रहा आणि 45 लाख रुपये कमवा

switzerland-inmarathi03

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

शहरात आपल्याला फक्त मोठ-मोठ्या इमारती, रस्ते, वाहनांची गर्दी, त्यांचा तो कर्कश आवाज आणि पैसे कमविण्यासाठी प्रत्येकाची चाललेली दगदग… एवढचं बघायला मिळते.

यासर्वांपासून कुठेतरी दूर शांतेत राहावं असं प्रत्येकाला वाटत असत. जिथे नाही मोठ्या इमारती, नाही त्या गाड्यांचे आवाज.. जिथे चारी बाजूंनी फक्त निसर्ग आणि निसर्गच असेल.

 

 

पहाडांमध्ये आपलं देखील एक घर असावं असं प्रत्येकाच स्वप्न असतं. जर आम्ही तुम्हाला म्हटलं की, तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकत आणि त्यासाठी तुम्हाला पैसेही द्यायची गरज नाही. उलट त्यासाठी तुम्हाला पैसे देण्यात येईल. विश्वास होत नाहीये ना..?

पण हे खर आहे, स्वित्झर्लंडच्या एका गावात राहण्याचे पैसे दिल्या जाणार आहेत.

 

 

पहाडांच्या छायेत निसर्गाच्या सानिध्यात असलेले Albinen हे गाव. येथे राहण्याचे लोकांना ७० हजार डॉलर म्हणजेच जवळपास ४५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

 

 

या ठिकाणी निसर्गरम्य देखावे, शुद्ध वातावरण, शांती आणि ते सर्व काही आहे जे तुम्हाला शहराच्या धावपळीत कधीही अनुभवायला मिळणार नाही.

 

 

म्युनिसिपालीटी प्रेसिडेंट Beat Jost यांनी सांगितले की, येथील कुटुंब तसेच तरुण येथून स्थलांतर करत आहेत. त्यामुळे येथील जनसंख्या आता २४० वर येऊन ठेपली आहे. त्यामुळे येथील शाळा देखील बंद करण्यात आली आहे. आता या गावातील मुलांना जवळच्या दुसऱ्या गावात शिकायला जावे लागत आहे.

 

 

स्वित्झर्लंड एक श्रीमंत देश आहे, त्यामुळे तो आपल्या या छोट्याश्या सुंदर गावाला वाचविण्यासाठी लोकांना येथे राहण्याचे आवाहन करत आहे, ज्यासाठी तो त्यांना पैसे सुद्धा देणार.

 

 

हा पुढाकार ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना येथे राहण्यास आकर्षित करण्यासाठी घेण्यात आला आहे. यासाठी मोठ्यांना २५ हजार डॉलर आणि लहान मुलांना १० हजार डॉलर देण्यात येईल. म्हणजेच चार मुलं असणाऱ्या कुटुंबाला येथे येऊन राहण्यासाठी ७० हजार डॉलर पर्यंत दिल्या जाऊ शकते.

 

 

तस बघितल्या गेलं तर हे गाव एवढ सुंदर आहे की, येथे राहायला कोणीही तयार होईल. पण त्याचे जर पैसेही मिळणार असतील तर ही डील फायद्याचीच – नाही का..?

स्त्रोत : boredpanda.com

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version