' भारतीय तरुणाईचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या ह्या ५ युट्यूब सिरिज नाही बघितल्या तर काय बघितलं? – InMarathi

भारतीय तरुणाईचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या ह्या ५ युट्यूब सिरिज नाही बघितल्या तर काय बघितलं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेडीज & जेन्टलमन तुम्ही मान्य करा अथवा नका करू पण टीव्हीचं अस्तित्व संपुष्टात येतंय. किमान आपल्या जनरेशनसाठी तरी टीव्ही नावापुरताच उरला आहे.

आणि ह्याला कारण एकमेव ते म्हणजे ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, ज्यांना OTT म्हणून सुद्धा संबोधले जाते! ह्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म नी फक्त टीव्हीच नव्हे तर सिनेमाचं सुद्धा जगणं मुश्किल केलं आहे!

 

ott platforms inmarathi
exchange4media.com

 

सध्या ह्या ४ जी च्या जमान्यात बहुतेक सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन्स आहेत, प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा आणि बऱ्यापैकी फास्ट असा नेटपॅक त्या मोबाइल मध्ये आहे!

आणि ह्या दोन गोष्टींमुळे लोकांना जागतिक कंटेंट बघायला मिळाला आणि त्यांची टीव्ही आणि सिनेमाच्या पडद्याच्या पलीकडच्या दुनियेशी ओळख झाली!

आता तर लोकं सर्रास नेटफ्लिक्स, प्राइम, हॉटस्टार अशा साईट वर जाऊन गेम ऑफ थ्रोन्स, नारकोज, ब्रेकिंग बॅड अशा इंटर नॅशनल वेबसीरीज चवीने बघायला लागले आहेत!

 

got and breaking bad inmarathi
iwmbuzz.com

 

ह्यामध्ये सेक्रेड गेम्स, मिर्जापुर अशा इंडियन कंटेंट ची सुद्धा खूप तारीफ झाली!

तसं बघायला गेलं तर ही क्रांति यूट्यूब नावाच्या साईटने कित्येक वर्षांपूर्वीच केली होती, ऑनलाइन व्हीडियो ही कन्सेप्ट यूट्यूबनेच सर्वात जास्त पुढे आणली!

आज इतके स्पर्धक असून सुद्धा यूट्यूबचा प्रेक्षक कमी झालेला तुम्हाला दिसणार नाही, याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे यूट्यूब तुमच्याकडून कोणतेही ज्यादा शुल्क आकारात नाही!

आज आपण जाणून घेऊया, अशाच काही यूट्यूब सिरिज बद्दल ज्या भारतीय तरुणाईच प्रतिबिंब त्यातून दाखवतात, आणि हो अगदी विनामूल्य तुम्ही ह्या सिरिज चा आनंद घेऊ शकता!

 

1 – Kota Factory

ही सिरिज भारतातली शैक्षणिक राजधानी आणि आयआयटी विद्यार्थ्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या कोटा शहराबद्दल आहे! ह्या सिरिज मध्ये ह्या शहराची खासियत तर दाखवली आहेच!

शिवाय ह्या शहरात देशभरातून येणारे विद्यार्थी, त्यांची हॉस्टेल लाईफ, त्यांची मेहनत, तिथलं कोचिंग क्लासेस च कल्चर हे सगळं खूप सुंदर पद्धतीने मांडल आहे!

फक्त मेसेजच नव्हे तर ही सिरिज तुमची खूप मस्त करमणूक सुद्धा करते! टीव्हीएफ ह्या लोकप्रिय चॅनलचीच निर्मिती असलेली ही सिरिज आहे!

प्रत्येक तरुणाने आणि खासकरून हॉस्टेल लाईफ आणि आयआयटी लाईफ अनुभवलेल्यांनी तर ही सिरिज अजिबात चुकवू नये!

 

2 – Girl In The City

ही एक मस्त हलकी फुलकी वेबसिरीज आहे! यूट्यूब च्या बिंदास चॅनल ची निर्मिती असलेल्या ह्या सिरिज मध्ये मराठी अभिनेत्री मिथीला पालकर ही मुख्य भूमिकेत आहे!

जी आता फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा चांगलीच फेमस झालेली आहे!

ह्या सिरिज ची कथा एका महत्वाकांक्षी मुलीच्या भोवती फिरते जी देहरादून हून मुंबईला फॅशन इंडस्ट्री मध्ये नाव करायला येते आणि मग मुंबई ह्या मायनगरीतला तिचा प्रवास आणि तिचे अनुभव यातून छान मांडले आहेत!

 

3 – Baked

ScoopWhoop ची स्टुडंट लाईफ कॉमेडी. २ सिनिअर्स सोबत राहणारा १ जुनिअर – आणि ह्या तिघांचे धम्माल अनुभव! सीनियर ज्युनियर्सचं नातं आणि त्यातून खुलत जाणारं नाटय हे तुम्ही एकदातरी पाहायला हवं!

4 – Pretentious Movie Reviews by Kanan Gil :

ही खऱ्या अर्थाने सिरिज नाहीच पण ह्या २ आयआयटियन्सनी जुन्या हिंदी फिल्म्सचे रिवहयू केले आहेत. हिंदी फिल्म्समध्ये जे जे विचित्र आणि बाळबोध सीन्स आहेत, ते सर्व हे दोघं मिळून बाहेर काढत असतात.

ह्या दोघांनी मिळून केलेली ‘गुंडा’ सिनेमाची चिरफाड पाहून तर तर तुम्ही हसून बेजार व्हाल! शिवाय लीजंडरी सिनेमा DDLJ ची ह्या दोघांनी केलेली चिरफाड बघा!

शिवाय ह्यांची प्रेझेंटेशन स्टाइल आणि सगळंच काहीतरी अजबच आहे, वेळ जात नसेल तर ह्या सिरिजचा तुम्ही कधीही आस्वाद घेऊ शकता!

5 – Man’s World

कधीकधी स्त्री-मुक्तीवाल्यांचा राग येतो का तुम्हाला? असं वाटतं का की Feminismचा अतिरेक होतोय? स्त्रियांना आरक्षित सीट्स – पुरुषांसाठी काहीच खास नाही,

आईच्याच प्रेमाचं कौतुक – बापाचं काहीच विशेष नाही — असं काही वाटतं? तसं असेल – तर YFilms ची ही सिरीज तुम्ही बघायलाच हवी.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?