' “पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाका!” म्हणणाऱ्या भारतीयांसाठी अमेरिका-रशियाचा इतिहास – InMarathi

“पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाका!” म्हणणाऱ्या भारतीयांसाठी अमेरिका-रशियाचा इतिहास

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

भारत-पाकिस्तान तणाव वाढल्यावर नेहेमी “पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाका!” अश्या मागण्या व्हायला लागतात. परंतु ह्या मागण्यांमागे वस्तुस्थितीचं भान दिसत नाही. ते येण्यासाठी अमेरिका आणि रशिया ह्या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांच्या तणावपूर्ण संबंधातील – शीतयुद्धाच्या काळाचा इतिहास समजून घ्यायला हवा.

cold-war-marathipizza-00

अमेरिका व सोव्हिएत युनियन दोघेही अणवस्त्रे बाळगून आहेत. दोघांनी जवळजवळ 45 वर्षे शीतयुद्ध लढले. पण 1962 चा पेचप्रसंग व 1971 मधील बंगालच्या खाडीतील आरमारी आमनासामना वगळता या पंच्चेचाळीस वर्षात हे दोन्ही देश कधीही परस्परांसमोर उभे टाकलेले नव्हते. जेव्हा दोन्हीही देशांकडे अणुबाँम्ब असतात तेव्हा – आता ‘मैदानावरील सैन्याद्वारे लढायचे युद्ध’ हा मार्ग कायमचाच निकाली निघालाय -याची जाणीव दोघानांही असल्यामुळे त्यांनी परस्परांच्या विरोधात कधीही अण्वस्त्रे वापरण्याची धमकी दिलेली नव्हती. याऐवजी त्यांनी शीतयुद्ध (प्रॉक्झीवॉर) लढण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.

शीतयुद्धाची अधिकृत सुरूवात, दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटचे दिवस मानल्या जाते खरी. पण युद्धाने खरा पेट घेतला तो कोरियन युद्धापासून. ह्यानंतर या शीतयुद्धाच्या ज्वाळांनी कित्येक देश व त्यांच्या नागरिकांना अक्षरशः भाजून काढले होते. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या कोरियन फाळणीनेच या युद्धाची सुरूवात झालेली होती.

cold-war-korean-war-marathipizza-01

उत्तर कोरीयात सोव्हिएतांनी किम जोंग इल याला सत्तापदी बसवून कम्युनिस्ट शासनपद्धतीचे सरकार स्थापित केलेले होते. तेच इकडे खाली दक्षिणेस, अमेरिकन व तिच्या मित्रदेशांनी लोकशाहीवादी सरकार स्थापन केले होते. किम जोंग इलने जेव्हा दक्षिण कोरियावर हल्ला केला तेव्हा त्याची होत असलेली सरशी पाहून अमेरिकेने तिथे सैन्य हस्तक्षेप केला. त्याला परत पाठीमागे लोटून अमेरिकन सैन्य उत्तर कोरीयात घुसलेे. अमेरिकन सैन्य आपल्या सिमेच्या एवढ्या जवळ असणे चीनने कधीही खपवून घेतले नसते.

त्यांनी लगेचच उ. कोरियाच्या बाजूने युद्धात सहभाग घेऊन अमेरिकन सैन्याची मुंसडी रोखली होती. या दोघांनाही सोव्हिएत रशिया पूर्ण मदत करत होता. हा पहिला सामना जवळजवळ ड्रॉ राहीला.

यांनतर पूर्व व प. आशिया, पूर्व व पश्चिम युरोप, दक्षिण आशिया – सगळीकडे हे दोन्ही देश परस्परांशी छुपे युद्ध करत राहीले. त्या क्षेत्रात अमेरिका एखाद्या देशापाठी उभी राहीली की सोव्हिएत तेथील दुसऱ्या देशापाठी उभे राहणारच. जगच दोन गटात वाटले गेले होते. भारताच्या पुढाकाराने अलिप्त गट चळवळीचा एक क्षीण विचारप्रवाहही या काळात अस्तित्वात होताच. पण त्यातील बहुसंख्य देश गरीब व मदतीसाठी या दोन महासत्तांसमोरच आश्रीत असल्यामुळे या चळवळीत म्हणावे तितके सामर्थ्य कधीही नव्हते.

cold-war-situation-marathipizza-02

अमेरिका व सोव्हिएत यांच्या या छुप्या युद्धाचा अतिशय भयानक खेळ व्हियतनाममध्येही रंगला होता. फ्रान्सच्या जागी अमेरिका तिथे अडकली व शेवटी तिला तिथून मानहानीकारकपणे माघारही घ्यावी लागली. इथे परत चीन व रशियाने अमेरिकेला नमविण्यासाठी व्हियतनामचे सर्व सहाय्य केले होते. याचा राग अमेरिकन धोरणकर्त्यांच्या मनात होता. जेव्हा सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानात हस्तक्षेप केला तेव्हा एका अमेरिकन मुत्सद्याने – अफगाणिस्तान हे सोव्हिएत रशियासाठी व्हियतनाम ठरेल. – असे वक्तव्य करून व्हियतनामचा बदला घेण्याचे धोरण आखून त्याप्रमाणेच त्याची अमंलबजावणी केली होती. ते खरेच ठरले. अफगाणिस्तान हे सोव्हिएत रशियासाठी व्हियतनामच ठरले होते. ज्याप्रमाणे अमेरिकेला व्हियतनाममधून मानहानीकारकपणे माघार घ्यावी लागली, तशीच माघार सोव्हिएत रशियाला अफगाणिस्तानातून घ्यावी लागली.

या शीतयुद्धात या दोन्हीही देशांनी असंख्य माणसे,पैसा गमावला पण उघडपणे यांनी कधीही अणूबाँम्बचा वापर करण्याची गोष्ट केली नव्हती. कारण त्याचे होणारे भयानक परिणाम ते जाणून होते. याचबरोबर या कालावधीत अमेरिका वा रशिया यातील नागरिकांनीही अशी आग्रही मागणी केल्याचे कुठेही वाचण्यात आलेले नाही…!

पण भारत व पाकिस्तान या देशांची व लोकांची गोष्टच वेगळी आहे. काही भारतीय तर “पाकिस्तानला नष्टच करून टाकावे” ह्यावर कमालीचे आग्रही दिसत आहेत. यासाठी अर्धा भारत बरबाद झाला तरी त्यांची हरकत नसावी. ही मागणी करताना – उरलेला भारत आतासारखाच सुजलाम् सुफलाम् नसेल त्यामुळे तो असूनही नसल्यासारखाच नाही का राहणार? – हा विचार त्यांनी केलेला नसावा.

 

india-pakistan-marathipizza

एका पाकिस्तानी टाँक शोमधे न्युक्लिअर वॉर स्टिम्युलेटींग बेवसाईटवर पाकिस्तानी अणुबॉम्ब दिल्लीवर व भारतीय बॉम्ब कराचीवर टाकून होणाऱ्या जीवीतहानीचा अंदाज घेतला होता. आकडे अतिशय भयावह आहेत. दिल्लीत अणवस्त्र पडल्याबरोबर एका क्षणात तीन लाख माणसे जागेवरच ठार होतील, तर आठ लाख जखमी होतील. हवेमूळे होणारे फाँलआऊट पुन्हा वेगळेच. तर तिकडे कराचीत एका क्षणात भारतीय अणुबॉम्ब सात लाख लोकांना यमसदनी पाठवेल व चौदा लाख लोकांना कायमचे जायंबदी करेल. जर वारे समुद्राच्या दिशेकडून जमीनीकडे वाहत असतील तर अख्खा सिंध वाळवंटात बदललेला असेल…!

दोन्हीकडील हेटमाँगर्स कुठल्याही परिणामाची प्रकारची पर्वा नं करता “अणूबाँम्ब टाका” म्हणून कंठशोष करत आहेत. सध्या ते अल्पमतातच आहेत, ही आपल्यासाठी व जगासाठी, त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे…!

अर्थात – अणुयुद्ध नको, युद्ध नको, ह्याचा अर्थ मूग गिळून गप्प बसायचं का? तर अर्थातच नाही.

मग काय करायला हवं? – ते इथे वाचा: पाकिस्तानचं करावं तरी काय?

Image sources: 1, 2, 3

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 25 posts and counting.See all posts by shivraj

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?