Site icon InMarathi

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचा विचार करताय, तर हे खास तुमच्यासाठीच आहे

driving license inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

कोणतीही गाडी तुम्हाला चालवायची असल्यास, तुमच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. विना परवाना गाडी चालवणे हा कायद्याने गुन्हा मनाला जातो.

विना परवाना गाडी चालवताना पकडल्यास तुमच्यावर दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते. त्यामुळे कधीही गाडी चालवताना त्याचा परवाना सोबत असू द्या.

सुरुवातीला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे खूप सोपे होते. अगदी सहजरीत्या तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स एजंटकडून किंवा स्वत: जाऊन मिळत असे. पण गेल्या काही महिन्यांपासून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या प्रक्रियेच्या नियमांमध्ये काही बदल झालेले आहेत.

आता दिल्लीत  यामध्ये अजून काही बदल होण्याचे दिसून येत आहे, कारण गेल्या काळापासून दिल्लीमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीने दिल्लीत हे नवीन नियम लागू होणार आहेत.

 

 

indiatimes.com

सुरुवातीला ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे खूप सोपे होते, त्यामुळे नवीन शिकाऊ लोकांना देखील ड्रायव्हिंग टेस्ट न देताच ड्रायव्हिंग लायसन्स मिळत असत. ज्यांच्या रस्त्यावर रॅश ड्रायव्हिंग करण्यामुळे कितीतरी अपघात झालेले आहेत.

अशा लोकांना थांबवण्यासाठी दिल्ली  सरकारने काही नवीन गाईडलाईन्स तयार केल्या आहेत, ज्याअंतर्गत आता ड्रायव्हिंग टेस्टच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगला सांभाळून ठेवण्यात येईल.

याचबरोबर जून २०१८ पासून दिल्ली शहरामध्ये १० ऑटोमेटेड टेस्ट सेंटर बनवले जाणार आहेत. जिथे ही तपासणी केली जाईल की, ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला आलेली व्यक्ती पूर्णपणे कायमस्वरूपी लायसन्स प्राप्त करण्यासाठी सक्षम आहे की नाही.

 

indiatimes.com

हिंदुस्तान टाईम्सच्या एका वृत्तानुसार, गेल्या सहा वर्षामध्ये रोड अपघातामुळे फक्त एकट्या दिल्ली शहरामध्ये जवळपास १०,००० लोकं मृत्युमुखी पडली. तरी पण अजून हे स्पष्ट झालेले नाही की, यामधील किती अपघात हे रॅश ड्रायव्हिंगमुळे झाले आहेत.

परिवहन मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत हौज खास, शकूर बस्ती, राजा गार्डन आणि हरी नगरमध्ये पहिलेच टर्मिनल बनवण्यात आलेले आहेत.

तसेच, रोहिणी, द्वारका आणि झारोडा कलानमध्ये हे टर्मिनल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर चालले आहे. याव्यतिरिक्त इतर टर्मिनल हे बुरारी, सराय काले खान आणि लोनी रोड येथे होणार आहेत.

एकदा ही टर्मिनल्स तयार झाल्यानंतर आता असलेली १३ वाहतूक कार्यालये बंद करण्यात येतील आणि ही १० नवीन केंद्र स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) असतील.

 

thehindu.com

दररोज दिल्लीमध्ये १६०० ड्रायव्हिंग लायसन्स दिले जातात. सध्या ड्रायव्हिंग टेस्ट या सामान्य रहदारीच्या रस्त्यावर घेतल्या जातात, जिथे अर्जदारास एका किलोमीटरपेक्षा कमी गाडी चालवून दाखवावी लागते आणि ते पाहून परवाना निरीक्षक त्यांना गुण देत असतो.

वाहतूक मंत्री कैलाश गॅहलोट यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, ड्रायव्हिंग टेस्टच्या दरम्यान चालकाकडून करण्यात येणाऱ्या चुकांची आणि त्रुटींची योग्यप्रकारे तपासणी केली जाईल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे (एआय) चिन्हांकित केले जाईल.

यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचा अधिकार फक्त लायसन्सिंग ऑफिसरलाच (परवाना देणारा अधिकारी) असेल, यापुढे कोणत्याही प्रकारची लोकांची वशिलेबाजी येथे चालणार नाही.

लायसन्सिंग ऑफिसर स्वतः अर्जदाराची टेस्ट पाहून त्यानंतर त्याला गुण देऊन त्याची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करेल. जोपर्यंत हा ऑफिसर त्यावर स्वाक्षरी करत नाही, तोपर्यंत त्या अर्जदाराला लायसन्स दिले जाणार नाही.

दुचाकी चालकांना एका वेड्यावाकड्या सर्पाकृती वळणांमधून गाडी चालवून दाखवावी लागणार आहे. जे न चुकता आणि कुठेही न अडखळता तो पूर्ण ट्रॅक पार करतील, त्यांनाच या टेस्टमध्ये पास केले जाईल.

 

indiatimes.com

असे काही नवीन बदल ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या ड्रायव्हिंग टेस्टमध्ये करण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर आता तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचा विचार करत असाल, तर गाडी पूर्णपणे शिकल्यानंतरच टेस्टला जा, नाहीतर तुम्हाला लायसन्स दिले जाणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version