' निरोगी शरीरासाठी राजगिऱ्याच्या या फायद्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका – InMarathi

निरोगी शरीरासाठी राजगिऱ्याच्या या फायद्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका – डॉ प्राजक्ता जोशी

‘राजगिरा’ आपल्याला नवरात्री, एकादशी अशा उपवासांना आठवतो.

पण एवढा मर्यादीत त्याचा ऊपयोग आहे का??? नक्कीच नाही.

राजगिरा ही अत्यंत गुणकारी वनस्पती असुन जागतिक दर्जावर superfood म्हणून घोषित झाला आहे.

राजगीऱ्यास रामदाना, अमरनाथ म्हणुनही ओळखले जाते. अमेरीकेतून भारतात आलेली ही वनस्पती आहे.

 

amaranth-InMarathi

 

आधुनिकदृष्ट्या, प्रथम राजगिरा जाणून घेऊया.

पोषणमूल्ये :

• Calories-371mg
• Carbs-371mg
• Protien-13.5mg
• Iron-76mg
• Suger-1.69mg
• Fat-7.2mg
• Magnessium-248mg
• Fiber-6.7mg
• Calcium-159mg
• Starch-57mg

जीवनसत्वे
• B1-0.1mg
• B5-1.4mg
• vitC-4.2mg
• B2-0.2mg
• B6-0.5mg
• vitE-1.9
• B3-0.9
• B9-82mg

 

rajgeera InMarathi

 

आता आपल्या लक्षात आले असेलच, की राजगिरा ऊपवासाला का खातात?? जवळपास सर्व आहारसत्वांची पूर्तता होते.

१. Calcium भरपूर असल्याने व लायसीन हे calcium शोषणास मदत करणारे vitamin असल्याने हाडांची मजबूती राखते.

 

strong inmarathi

 

२. vit c भरपुर मात्रेत असल्याने त्वचा, केस यासाठी ऊपयुक्त सांगितले आहे. हिरड्याच्या विकारात (scurvy)ऊपयुक्त ठरते.

३. राजगिर्यातील protien मध्ये insulin वर नियंत्रण राखण्याचा विशेष गुणधर्म आढळतो. त्यामुळे Diabeticच्या रुग्णांमध्ये ऊपयुक्त ठरते.

४. राजगिरा Gluten free,fibers ने युक्त आहे. त्यामुळे वजन कमी करताना ऊपयुक्त ठरतो.

५. magnessium अधिक असल्याने migrain मध्येही ऊपयुक्त ठरते.

६. यातील bioactive compounds हे antiallergic असतात.

७. fibers व unsaturated fats असल्यामुळे रक्तवाहिन्यातील cholesrol चे प्रमाण कमी करण्यास मदत करते.हृदयाचे स्वास्थ्य राखते.

 

rajgeera InMarathi 1

 

आता आयुर्वेदीक दृष्टीकोन पाहूया.

१. आयुर्वेदाने राजगिरा रूचीवर्धक( appetizer)सांगितले आहे.त्यामुळे पचनव्याधीनंतर येणारा nausea कमी करण्यास मदत करते.

२. “रक्तशोधक” सांगीतले आहे. त्यामुळे रक्तपित्त, त्वचा विकार, यात ऊपयुक्त ठरते.

३. “स्तन्य” हा राजगिऱ्याचा गुणधर्म सांगितला आहे. म्हणजेच मातृत्वामध्ये स्तनदुग्धाची वृद्धी याच्या नियमित सेवनाने होते.

 

breast feeding inmarathi 1

 

४. “मल:सारक” हा राजगिऱ्याचा गुण बद्धकोष्ठ, संग्रहणी या व्याधीत उपयुक्त ठरते.

५. “हृद्य” हाही गुणधर्म सांगितला आहे. म्हणजेच हृदयासाठी उत्तम सांगितले आहे.

६. नेत्ररोगांमध्ये राजगिऱ्याचे सेवन सांगितले आहे. रोजच्या आहारात राजगिरा असेल तर दृष्टी ऊत्तम राहते.

७. स्थौल्य कमी करण्यासाठी आयुर्वेदाने रोज राजगिऱ्याचे सेवन सांगितले आहे.

८. पंडू (Anemia) मध्ये राजगिरा ऊपयुक्त सांगितला आहे.

९. केस गळणे, केस पांढरे होणे हे विकार राजगिरा सेवनाने टळतात.

१०. “रक्तस्तंभक” म्हणजे रक्तस्त्रव थांबवण्यास मदत करते, त्यामुळे रक्तार्श (heamorhoids) मध्ये ऊपयुक्त ठरते.

 

rajgeera InMarathi 2

 

हे सर्व गुणधर्म राजगिऱ्याची पाने व बियांमध्ये असतात. त्यामुळे राजगिऱ्याच्या पानांची भाजी, रस आहारात समाविष्ट करावी. तसेच राजगिरा हा लाडू, पराठे, थालिपीठ, शिरा, खीर अशा अनेक स्वरूपात बनवता येतो.

 

rajgeera InMarathi 3

 

चाॅकलेट्सची जागा राजगिऱ्याच्या लाडवांनी किंवा चिक्कीने घेतली तर ऊत्तमच! वजन कमी करताना राजगिऱ्याच्या लाह्या तुम्ही ओट्स, काॅर्नफ्लेक्स ऐवजी घेऊ शकता.

मधुमेहीसुद्धा त्यांची न्याहारी राजगिऱ्याचं थालिपीठ, लाह्या, भाकरी असे ठेऊ शकतात.

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?