' गंगा नदीचं “सजीव” असणं, मोदींचं ‘स्वच्छता अभियान’ ह्याबद्दल प्रश्न विचारले म्हणून दोघांवर गुन्हा आणि अटक – InMarathi

गंगा नदीचं “सजीव” असणं, मोदींचं ‘स्वच्छता अभियान’ ह्याबद्दल प्रश्न विचारले म्हणून दोघांवर गुन्हा आणि अटक

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सध्या सोशल मिडियाचे वेड आपल्याला सगळीकडे दिसून येते. तरुण पिढीला तर या सोशल मिडियाचे आकर्षण खूपच जास्त आहे. हे वेड एवढे जास्त आहे की, कोणतीही साधी गोष्ट देखील यांना सोशल मिडीयावर अपडेट केल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही. २४ तास तरुण पिढी या मोबाईलला चिकटून असते. पण या फेसबुक आणि व्हाट्सअप या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मने लोकांना आपली मते मांडण्याचा देखील अधिकार दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपली मते या सोशल मिडीयावरून लोकांपर्यंत पोहोचवताना दिसतात आणि त्यामुळे कधी – कधी यावर वाद देखील निर्माण होतात आणि त्याचे परिणाम खूप वाईट होतात. यासाठी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा देखील लोकांनी ओळखल्या पाहिजेत.

 

Social Media Crime.Inmarathi
avyaan.com

फेसबुक आणि व्हाट्सअपवर काहीही शेयर केले तरी चालते, आपल्याला कोण पकडणार आहे ? असा विचार करणे आता तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. ५ वर्षापूर्वी जेव्हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले होते, त्यावेळी एका पालघरच्या मुलीने त्यांच्या अंतयात्रेमुळे मुंबईत झालेल्या गर्दीवर भाष्य करणारे स्टेट्स टाकले होते. त्यामुळे तिला आणि तिच्या या स्टेट्स लाईक करणाऱ्या आणखी एका  मुलीला अटक करण्यात आली होती, हा प्रसंग तुम्हाला माहित असेलच. पण आता अशी खूप प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे आता व्हाट्सअपवर पाठवलेले मॅसेज आणि फेसबुकवर टाकलेली स्टेट्स तुम्हाला जेलमध्ये जाण्यास भाग पाडू शकतात.

असेच, काहीसे एका तरुणाबरोबर घडले आहे. या तरुणाचे नाव झाकीर त्यागी हे आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, या तरुणाने लोकांना हे विचारले की, गंगेला ‘लिव्हिंग अँटीटी’ म्हणजेच गंगेला जिवंत वस्तू का मानले जाते ? असे मस्करीमध्ये स्टेट्स टाकले, तसेच त्याने भाजपच्या राम मंदिरच्या योजनांची चर्चा देखील केली. अशा एकसारखे आक्षेपार्ह स्टेट्स टाकल्यामुळे मुजफ्फरनगरच्या १८ वर्षीय या तरुणाला ४२ दिवसांसाठी पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी टाकले, जिथे शौचालय वापरण्यासाठी देखील त्याला पैसे द्यावे लागत असे. त्याला पोलिसांनी एप्रिलमध्ये आयपीसीच्या कलम ४२० (फसवणूक) आणि आयटी कायद्याच्या कलम ६६ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दखल करून त्याला अटक करण्यात आले. त्याला ४२ दिवस खूप मारण्यात आले आणि जेव्हा तो परत आला तेव्हा त्याची नोकरी देखील गेली होती.

 

Social Media Crime.Inmarathi1
adage.com

हिंदी न्यूज चॅनेल आजतकवर ‘सो सॉरी’ या नावाने एक राजनैतिक अॅनिमेशन येतात. ज्यामध्ये राजनैतिक मुद्द्यांना मनोरंजक पद्धतीने दाखवले जाते. या व्हिडियोज लोकांना देखील खूप आवडतात आणि या आजतकच्या सर्वात जास्त बघितल्या जाणाऱ्या व्हिडियोजपैकी एक आहेत. पण अशाच एका व्हिडियोमुळे मेरठच्या अफगाण सोनी पत्रकाराला २ नोव्हेंबर रोजी आयटी कायद्याच्या कलम ६६ च्या अंतर्गत आक्षेपार्ह व्हिडियो पोस्ट केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. हा व्हिडीयो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होता, ज्यामध्ये ‘अच्छे दिन’ विषयी विचारण्यात येत आहे. पण या व्हिडियोमध्ये माणसांऐवजी गाढवे आहेत.

जगातील इतर देशांप्रमाणेच आपल्या भारतात देखील फ्री स्पीचला काही अटी आहेत. राजनैतिक, धार्मिक आणि समाज संवेदनशील मुद्द्यांवर कडक नजर ठेवली जाते आणि त्याचे उल्लंघन हे आयटी कायद्याचे उल्लंघन मानले जाते.

 

Social-Media-Crime.Inmarathi2
abtlaw.com

फेसबुकपेक्षा जास्त याचा परिणाम कशावर होत असेल, तर ते व्हाट्सअप आहे. व्हाट्सअप वापरणाऱ्या लोकांवर क्राईम सेल आणि पोलिस खूप सहज नजर ठेवू शकतात. पण अशा देखील काही केस झाल्या आहेत, ज्यामध्ये लोकांना हार्मलेस मॅसेजसने जेलमध्ये पाठवले आहे. काही वेळा लोकांना व्हाट्सअप फॉरवर्ड केल्यामुळे जेल जावे लागू शकते, कारण त्यांच्या इनबॉक्समध्ये हे मॅसेज होते. तरीपण पोलीस आणि सरकार निवडणुकीच्या वेळी तयार करण्यात येणाऱ्या राजनैतिक कार्टून्सवर कोणताही आक्षेप घेत नाही. हे कार्टून्स आणि व्हिडियोज जास्तकरून राजनैतिक पक्षांकडूनचं बनवण्यात येतात.

त्यामुळे व्हाट्सअप आणि फेसबुकवर आपण काय फॉरवर्ड करता आहे किंवा काय टाकत आहे, याचे नेहमी भान ठेवा आणि कोणतेही आक्षेपार्ह असेल असे काहीही सोशल सोशल मिडीयावर टाकू नका, नाहीतर तुम्हालाही जेलची हवा खावी लागेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?