Site icon InMarathi

असे आहेत जगभरातील “राम राम!” चे विविध १५ प्रकार

hritik roshan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भाषा हे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. आपली बोलीभाषा आपण जसजसे मोठे होतो, तसतसे शिकत जातो. पण आपली मातृभाषा सोडून इतर भाषेचे ज्ञान असणे देखील कधीही चांगलेच असते.

आपण बाहेर कुठे तरी फिरायला गेल्यास किंवा व्यवसायिक क्षेत्रांमध्ये या नवीन भाषेंचा नेहमीच आपल्याला फायदा होतो.

कोणतीही भाषा ही त्या देशामध्ये किंवा भागामध्ये असलेल्या संस्कृतीवरून तयार झालेली असते. त्यामुळे तेथील प्रत्येकाच्या मनामध्ये त्या भाषेविषयी एक वेगळा आदर असतो. काही ठिकाणी तर त्यांच्या भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेचा वापर ते लोक करत नाहीत.

 

beefree.io

 

तुम्हाला माहित असेलच की प्रत्येक भाषेमध्ये हॅलो म्हणण्याची पद्धत वेगवेगळी असते.

आपल्या मराठीमध्ये जसे आपण एखाद्याला नमस्कार किंवा रामराम म्हणतो, त्याचप्रमाणे इतर भाषांमध्ये देखील ते वेगवेगळ्याप्रकारे बोलले जाते.

चला तर मग जाणून घेऊया, जगातील इतर देशांच्या भाषेमध्ये “रामराम” कसा केला जातो!

 

 

१. बोनजोर – फ्रेंच (BONJOUR – French)

फ्रान्स, बेल्जियम आणि स्वित्झर्लंड याशिवाय मोरोक्को, ट्युनिशिया आणि अल्जीरियामध्ये याला नमस्ते म्हणजेच हॅलो समजले जाईल. तसेच काही आफ्रिकन देशांमध्ये देखील याचप्रकारे हॅलो बोलले जाते.

२. कझाक – (SALEMETSIZ BE?)

जगामध्ये ७० लाख आणि कझाकस्तानमध्ये जवळजवळ १ कोटी कझाक बोलणारे लोक राहतात.

उर्वरित, चीनच्या झिझीझियांग प्रांतात, तसेच उझबेकिस्तान, रशिया, मंगोलिया, तुर्कमेनिस्तान, युक्रेन आणि ताजिकिस्तानमध्ये विभागलेले आहेत.

३. जम्बो / हेबरारी – स्वाहिली (JAMBO / HABARI – Swahili)

स्वाहिली भाषेचे ५० लाख ते १ कोटी मूळ भाषिक आहेत. जे प्रामुख्याने टांझानिया, युगांडा आणि केनियामध्ये राहतात. पण पूर्व आफ्रिकेतील काही भाषांमध्ये देखील हिचा वापर केला जातो.

४. नि हायू – मँडारीन (NI HAU – Mandarin)

चीनमधे बोलली जाणारी मँडारीन जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. चीनच्या १३० कोटी लोकसंख्येपैकी किमान ५० टक्के लोक ही भाषा बोलतात.

 

uni.edu

 

५. न्या हॉह – कॅंटोनीज (यू) (NAY HOH – Cantonese (Yue))

दक्षिण चीनमध्ये विशेषतः ग्वांगडाँग प्रांतात, हाँगकाँग आणि मकाऊमध्ये ही भाषा बोलली जाते.

६. हेलो – बहासा इंडोनेशिया (HALO – Bahasa Indonesia)

इंडोनेशियामध्ये बोलल्या जाणाऱ्या ३०० पेक्षा अधिक वेगवेगळ्या बोलीभाषांव्यतिरिक्त बहासा ही इंडोनेशियाच्या लोकांकडून बोलली जाणारी दुसरी भाषा आहे. ही भाषा मलेशियाच्या मलय भाषेसारखीच आहे.

७. मोशी मोशी – जॅपनीज

जपानमध्ये मोशी मोशी आणि कोन्निचिवा म्हणत लोकांना हॅलो म्हटलं जातं, यासाठी प्रथेप्रमाणे कमरेतून वाकून समोरच्याला मान दिला जातो.

काही हिंदी चित्रपटांमध्येही आपण हा शब्द नक्कीच ऐकला असेल.

८. होला – स्पॅनिश (HOLA – Spanish)

ही भाषा मुख्यत : स्पेनमध्ये बोलली जाते. तसेच, स्पेनबाहेर ब्राझील मध्य आणि दक्षिण अमेरिकी देशांमध्ये बोलली जाते. ही अमेरीकेत सर्वात जास्त बोलली जाणारी दुसरी भाषा आहे.

 

arts.ac.uk

 

९. CIAO – इटालियन

इटालियन भाषा ही इटलीमध्ये जास्त प्रमाणात बोलली जाते. इतर देशांमध्ये ही भाषा जास्त बोलली जात नाही.

१०. ओला – पोर्तुगीज (OLÀ – Portuguese)

पोर्तुगाल आणि ब्राझीलमध्ये ही भाषा बोली जाते. तसेच पहिल्याच्या पोर्तुगीज वसाहती असलेल्या अंगोला, मोजाम्बिक, केप व्हर्दे, साओ तोमे आणि मकाऊ येथे देखील ही भाषा बोलली जाते.

११. सलाम – पर्सिअन (फारसी) (SALAAM – Persian (Farsi))

इराण, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, तसेच उझबेकिस्तान, बहरैन येथे पर्सिअन भाषा बोलली जाते. पर्सिअनला काहीवेळा फारसी देखील बोलले जाते. इराणमध्ये बोलताना या भाषेला पर्सिअन म्हटले जाते.

१२. ZDRAS-TVUY-TE – रशियन

रशिया आणि पूर्व युरोपमध्ये ही पहिला किंवा दुसरी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. तसेच मध्य आशियातील देशांमध्ये देखील ही भाषा बोलली जाते.

 

licdn.com

 

१३. ओहायो / कननीचीवा / कोंबॅन वा – जापनीज (OHAYO / KONNICHIWA / KONBAN WA- Japanese)

जापनीज ही भाषा जास्तकरून जपानमधेच बोलली जाते. इतर देशांमध्ये तिचा जास्त वापर होत नाही. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी लोकांना शुभेच्छा देण्यासाठी वरील वाक्याचा वापर केला जातो.

१४. एहॉन-योंग-हा-से-यो – कोरियन (AHN-YOUNG-HA-SE-YO – Korean)

कोरियन भाषा ही उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये बोलली जाते.

१५. SAIN BAINUU – मंगोलियन

मंगोलियामध्ये मंगोलियन भाषा बोलली जाते, तसेच मंगोलियन बोलणारे बहुतांश लोक रशिया, चीन आणि किर्गिझस्तानच्या काही भागामध्ये राहतात.

अशा या आणि इतर काही भाषांमध्ये हॅलो बोलले जाते. जर तुम्ही कधी या देशांमध्ये गेलात आणि एखाद्याने हॅलो म्हटले, तर काही वेगळा गैरसमाज करून घेऊ नका. या माहितीवरून तुम्हाला त्या देशातील लोकांचा हॅलो तरी समजेल.

मग? तुम्हाला यातील कोणता हॅलो आवडला? की, आपला “राम राम” सर्वात चांगला आहे?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version