Site icon InMarathi

रॉबर्ट मुगाबे बद्दलच्या जगाला ठाऊक नसलेल्या या खास गोष्टी नक्की वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

प्रजासत्ताक झिम्बाब्वे हा देश १० प्रांतांमध्ये विभागलेला आहे. ही १० प्रांत जिल्ह्यांमध्ये विभागलेली आहेत आणि हे जिल्हे नगरपालिकांमध्ये विभागलेले आहेत. काही काळापूर्वी झालेल्या युद्धांमुळे झिम्बाब्वेचा अनेक दशकांचा काळ राजकीय गोंधळ आणि नागरी अशांततेमध्ये निघून गेला.

झिम्बाब्वेची राजकीय रचना प्रजासत्ताक आहे. पण त्यांच्याकडे अर्ध–राष्ट्रपती सरकारी व्यवस्था आहे. यामध्ये उप्पर सीनेट आणि लोवर हाउस ऑफ असेम्बली राष्ट्रपती ठरवतात, जो देशाचा प्रमुख असतो.

 

झिम्बाब्वेवर एक मोठा काळ व्यापून गेलेल्या मुगाबे ह्यांच्याबद्दल काही अज्ञात गोष्टी जाणून घेऊ या.

 

 

रॉबर्ट गॅब्रियेल मुगाबे यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९२४ रोजी झिम्बाब्वेमधील कुतामा येथे झाला आणि मृत्यू ६ सप्टेंबर २०१९ रोजी झाला. त्यांच्या पक्षाचे नाव ZANU–PF हे आहे.

हे झिम्बाब्वेचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. ते १९८० पासून झिम्बाब्वेच्या राष्ट्रप्रमूखपदी होते. १९८० पासून १९८७ पर्यंत ते झिम्बाब्वेचे पंतप्रधान होते.

१९८७ पासून ते झिम्बाब्वेचे पहिले कार्यकारी प्रमूख म्हणून नेतृत्व सांभाळत होते. २१ नोव्हेंबर २०१७ ला त्यांनी त्यांचा राजीनामा जाहीर केला.

 

पुढे आहेत रॉबर्ट मुगाबेबद्दल अशा काही गोष्टी  – ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.

१. रॉबर्ट मुगाबे यांचे आई-वडील खूप धार्मिक होते.  त्यांनी जेसुइट स्कूलमधून शिक्षण घेतले. तरुणपणी ते प्रभावशाली वक्ता म्हणून पुढे आले होते.

२. रॉबर्ट मुगाबे यांचे वडील गेब्रियल मॅटेबीली मालावीमध्ये कारपेंटरचे काम करत होते. त्यामुळे ते घरापासून लांब राहत असत.

 

 

३. १९८० मध्ये जेव्हा झिम्बाब्वेला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा हा आनंद साजरा करण्यासाठी सिंगर बॉब मार्ले याला बोलावण्यात येणार होते. पण रॉबर्ट मुगाबे त्याचे गाणे ऐकू इच्छित नव्हते, कारण ते त्याच्या गाण्याला भीतीदायक मानत होते.

४. २००० साली त्यांनी लॉटरीमध्ये १ लाख झिम्बाब्वे डॉलर जिंकले होते, जे त्यांनी त्यांच्या पार्टी फंडसाठी लावले होते.

५. २०१३ मध्ये रॉबर्ट मुगाबे यांची एकूण संपत्ती १० मिलियन डॉलर एवढी होती.

६. रॉबर्ट मुगाबे यांना एकदा नोबेल पुरस्कारासाठी मानांकन मिळाले होते आणि २०१५ मध्ये चीनी समीक्षकाकडून त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

 

 

७. रॉबर्ट मुगाबे हे क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. ते नेहमी क्रिकेटला पाठिंबा देतात, तसेच ते आपल्या शालेय जीवनामध्ये टेनिस देखील खेळत असत.

८. रॉबर्ट मुगाबे हे जगातील सर्वात वयस्कर नेते होते, जे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत होते. देशाचे प्रतिनिधित्व करणारा कोणताही नेता एवढा वयस्कर नाही.

 

 

९. रॉबर्ट मुगाबे हे ७३ वर्षाचे असताना त्यांचा सर्वात लहान मुलगा चतुंगा बेल्लारिन मुगाबे याचा जन्म झाला होता.

१०. १९६३ साली झिम्बाब्वेच्या आफ्रिकन नॅशनल युनियनची स्थापना व्हाईट वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी झाली. रॉबर्ट मुगाबे हे या संघटनेचे  प्रमुख होते.

१९८० मध्ये जेव्हा ते पंतप्रधान म्हणून निवडून आले, त्यावेळी ZANU हे ZANU – PF झाले आणि ही एक राजकीय पार्टी म्हणून समोर आली.

 

 

११. मुगाबे उच्च शिक्षित होते. त्यांच्या या शिक्षणामुळे त्यांना सर्व आफ्रिकन देशातील प्रवाक्त्यांमध्ये सर्वोच्च समजले जात असत.

आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी घानामध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर ते झिम्बाब्वेला ऱ्होडेशियाच्या पांढऱ्या सरकारविरोधाच्या क्रांतीमध्ये सामील झाले होते.

१२. रॉबर्ट मुगाबे यांनी एकूण सात विद्यापीठांच्या पदव्या घेतल्या होत्या. त्यातील सहा विद्यापीठांच्या पदव्या त्यांनी तुरुंगामध्ये असताना घेतल्या होत्या.

यामध्ये शिक्षण, अर्थशास्त्र, प्रशासन आणि कायदा यांसारख्या विषयांचा त्यांनी अभ्यास केला.

 

 

१३. रॉबर्ट मुगाबे हे समलैंगिक लोकांचा द्वेष करतात. ते म्हणतं की,

“जर तुम्ही दोन माणसांना एका रुममध्ये पाच वर्षासाठी बंद केले आणि त्यांना पाच वर्षानंतर २ मुले आणायला सांगितले आणि ते त्यात असमर्थ ठरले, तर आम्ही त्यांचे डोके उडवू.”

१९८७ साली त्यांनी समलैंगिकते विरुद्ध कायदा तयार केला आणि त्याची कठोर अंमलबजावणी देखील केली जाते.

 

 

१४. रॉबर्ट मुगाबे हे १० वर्षांचे असताना त्यांचे दोन मोठे भाऊ त्यांनी गमवले. त्यातील एका भावाचा मृत्यू विषबाधेमुळे झाला होता. त्यांचा दुसरा भाऊ मरण पावल्यानंतर त्यांच्या वडिलांनी कुटुंब सोडले.

असे हे रॉबर्ट मुगाबे आतापर्यंत सर्वात जास्त वेळा झिम्बाब्वेचे राष्ट्रप्रमुख राहिले आहेत. त्यांच्या झिम्बाब्वेतील एक मोठे पर्व संपले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version