' अख्ख्या जगावर गूढतेचं सावट आणणाऱ्या जॉन एफ केनेडींच्या मृत्यूचं कोडं अजूनही सुटलेलं नाही… – InMarathi

अख्ख्या जगावर गूढतेचं सावट आणणाऱ्या जॉन एफ केनेडींच्या मृत्यूचं कोडं अजूनही सुटलेलं नाही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

घोटाळे, भ्रष्टाचार, हत्याकांड हे आपल्याच देशात नाही इतर देशातही होत असतात. वयक्तिक स्वार्थापोटी म्हणा किंवा हव्यासापोटी या प्रकारच्या घटना घडत असतात.

या जगात असे अनेक हाय प्रोफाईल घोटाळे आणि घटना आहेत ज्यांना सोडविण्यात त्या त्या देशाच्या सुरक्षा यंत्रणांना अजूनही यश आलेलं दिसत नाही.

यासाठी कधी-कधी तपास यंत्रणा जबाबदार असतात, तर कधी पडद्या मागील काही लोकं असतात ज्यांना ते कोडं सुटू द्यायचं नसतं.

त्यामुळे वर्षानुवर्षे त्या घटनांमागील खरा आरोपीचा चेहरा समोर येत नाही. तर काही घटना अश्या देखील असतात ज्यांचा छडा लावतांना तपास यंत्रणाच कोड्यात पडते.. अशीच एक घटना १९६३ साली अमेरिकेत घडली होती, ज्याचा निकाल अद्यापही लागलेला नाही.

ती घटना म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ केनेडी हत्याकांड… ही एक अशी घटना आहे ज्याच गूढ अजूनही सुटलेलं नाही.

 

John-F-Kennedy-inmarathi00

 

जॉन एफ केनेडी हे अमेरिकेच्या त्या निवडक राष्ट्रपतींमधून एक आहेत ज्यांनी खूप कमी काळात राजनीतीवर महारत मिळविली. ते अमेरिकेच्या सर्वात आवडत्या राष्ट्रपतींपैकी एक होते.

पण त्यांची ही प्रसिद्धीच त्यांच्या मृत्यूच कारण ठरली. काही समाज कंटकांना त्यांची ही प्रसिद्धी काही पचली नाही आणि अखेर २२ नोव्हेंबर १९६३ रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

 

John-F-Kennedy-inmarathi

 

त्यावेळी ते अमेरिकेच्या टेक्सास येथील डलास येथे मतदानाच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नीसह आलेले होते. तेव्हा टेक्सासचे गव्हर्नर जॉन कॉनली आणि त्यांची पत्नी देखील केनेडी यांच्या सोबत लिमोजिनमध्ये होत्या.

केनेडी यांच्यावर निशाना साधत हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळ्या चालवल्या ज्यात केनेडी यांचा मृत्यू झाला तर जॉन कॉनली हे देखील गंभीररित्या जखमी झाले.

 

John-F-Kennedy-inmarathi02

 

ही घटना होऊन आज ५० पेक्षा जास्त वर्ष उलटली. पण तरी देखील या हत्याकांडाच कोडं अजूनही सुटलेलं नाही. जेव्हा की या वर्षांत या हत्याकांडामागील अनेक कथा सांगण्यात आल्या.

१९६४ मध्ये वॉरेन ने या हत्याकांडाची ८८८ पानांची एक रिपोर्ट तयार केली होती. ज्याच्या ७ पानांत केवळ शुटींग सिक्वेन्स बद्दलच सांगण्यात आले आहे.

या रिपोर्टमध्ये वारेन यांनी स्पष्ट केल आहे की, हल्लेखोरांनी Texas School Book Depository च्या ६ व्या माळ्यावरून राष्ट्रपती केनेडी यांच्यावर निशाना साधला.

पण १० महिन्यांच्या तपासानंतरही वॉरेन यांना या घटनेचा तपशीलवार अहवाल सादर करता आला नाही. यात केवळ शक्यताच व्यक्त करण्यात आल्या.

या बाबत Lee Harvey Oswald नावाच्या एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली. पण २४ नोव्हेंबर ला एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात नेत असताना काही हल्लेखोरांनी संशयितावर हल्ला करून त्याला देखील ठार केले.

 

John-F-Kennedy-inmarathi06

 

या हल्ल्याबाबत आणखी थेरी मांडण्यात आली आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, राष्ट्रपती केनेडी यांच्या हत्येमागे अमेरिकी सुरक्षा एजन्सी सीआयए चा हात आहे. तर दुसऱ्या एका थेरीनुसार या हत्याकांडामागे रशियाच्या गुप्त एजन्सी केबीजी असल्याच सांगितल्या गेलं आहे.

या घटने बाबत अनेक दावे ठेवण्यात आले, परंतु त्यातील एकही दावा अद्याप सिद्ध झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रपती केनेडी यांच्या हत्येचमागील गूढ अजूनही कायम आहे.

त्यावर आजही तपास सुरूच आहे. पण यात प्रश्न असा उपस्थित होतो की, महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची दिवसाढवळया गोळ्या झाडून हत्या केली जाते आणि त्यांच्या हत्येमागील कोडं ५० वर्ष उलटूनही अमेरिकेच्या तपास यंत्रणांना सोडवता आलेली नाही…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?