Site icon InMarathi

भारतात सुर्योदयापूर्वीच फाशी का दिली जाते?

hanged-till-death-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – विशाल दळवी

===

प्रत्येक देशाचे स्वतंत्र कायदे आहेत आणि  गुन्ह्यांच्या प्रकारानुसार निर्धारित केलेल्या शिक्षा आहेत.

भारतामध्ये मृत्यदंड किंवा फाशी ही शिक्षा सर्वात मोठी शिक्षा मानली जाते. या फाशीच्या शिक्षेचे देखील अनेक नियम आहेत.

मुख्य नियम असा आहे की, फाशी खुल्या जागेत देता येत नाही ती चार भिंतीच्या आतच दिली जावी. या वेळेस जल्लाद, डॉक्टर, न्यायाधीशांनी पाठवलेला प्रतिनिधी आणि काही प्रमुख पोलीस अधिकारीच उपस्थिती असायला हवेत.

दुसरा नियम मात्र थोडा विचित्र आहे आणि जो प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतो.

तो नियम म्हणजे

गुन्हेगाराला सुर्योदयापूर्वीच फाशी दिली जावी.

 

स्रोत

तर असे का?

गुन्हेगाराला सुर्योदयापूर्वीच फाशी देण्यामागे अनेक कारणे आहेत.

१) प्रशासकीय कारण

न्यायालयाने सुनावलेल्या दिवशी २४ तासांच्या आत जर जेल प्रशासन गुन्हेगाराची फाशी पूर्णत्वास नेण्यास अपयशी ठरले तर पुन्हा न्यायालयाकडे नवीन तारीख मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो.

तसेच हे कार्य वेळेत पूर्ण न करणे म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान समजला जातो. त्यामुळे ठरलेल्या दिवशी पहाटेच फाशी आटोपली जाण्याची प्रथा सुरु झाली.

दुसरी गोष्ट म्हणजे जेल मॅन्यूअलनुसार जेलची सर्व कार्ये सुर्योदयानंतरच सुरु केली जातात. जेल प्रशासनासाठी फाशी एक मोठे कार्य आहे. म्हणून अगदी पहाटेच हे कार्य आटोपले जाते. जेणेकरून इतर कामांमध्ये बाधा येऊ नये.

 

स्रोत

फाशीच्या आधी आणि नंतर अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. जसे की मेडिकल टेस्ट, रजिस्टरमध्ये एन्ट्री आणि अनेक ठिकाणी सूचना देणे.

त्यानंतर गुन्हेगाराचे मृत शरीर त्याच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडायची असते. त्यामुळे भल्या पहाटेच फाशी दिली जाते.

२) नैतिक कारण

असं मानलं जातं की, ज्याला फाशी होणार आहे त्याला पूर्ण दिवस वाट बघायला लावल्याने त्याचे मानसिक खच्चीकरण होतं. त्यामुळे भीतीने अथवा वेडाने गुन्हेगार स्वत:ला इजा करून घेऊ शकतो आणि फाशीच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.

आणखी एक कारण असेही आहे की, सकाळी फाशी दिल्याने सूर्यास्तापूर्वी गुन्हेगाराचे मृत शरीर त्याच्या कुटुंबीयांना  सोपवल्याने ते वेळेत त्याचे अंतिम संस्कार करु शकतात.

 

३) सामाजिक कारण

गुन्हेगाराचा जर सामाजिक प्रभाव अधिक असेल तर त्यामुळे सामाजिक जीवन अस्ताव्यस्त होण्याची शक्यता असते. भल्या पहाटे सामाजिक जीवन आणि खास करून मिडिया क्षेत्र देखील शांत असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नसते.

तर अशी आहे भारतातील सर्वात मोठी शिक्षा आणि त्या शिक्षेचे नियम.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version