Site icon InMarathi

भीक मागून जमवलेले अडीच लाख दिले त्याच मंदिरात दान : दानशूर महिलेची अशीही कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंदिर म्हटलं, की देव-धर्म आलेच, पण त्यासोबतच येतात मंदिरांसमोर बसणारे भिकारी. मंदिरात गेलं की आपण तिथल्या दानपेटीत दान टाकतो आणि बाहेर निघालो की मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या भिकाऱ्यांना देखील पैसे देतो. तुमच्या लक्षात आलं असेल, की जेव्हा मंदिरा समोरील त्या भिकाऱ्यांमध्ये जास्त करून वृद्ध माणस असतात.

 

 

तसेतर मंदिरात दान देणे काही नवीन नाही, रोज कोणी ना कोणी आपल्या ऐपतीप्रमाणे मंदिरात दान करतच असतात. पण असे खूप कमी लोकं असतात ज्यांच्या दान देण्याची चर्चा होते. अशीच एक घटना मैसूर येथील वोंटीकोप्पल (Vontikoppal) येथे घडली.

येथील प्रसन्ना अंजनेया स्वामी मंदिरात एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेने अडीच लाख रुपये दान म्हणून दिले आहेत.

 

 

आता तुम्ही विचार कराल की यात काय नवल.. तर आम्ही तुम्हला सांगू इच्छितो, की ही महिला कुठल्या श्रीमंत घराण्यातील नसून ती प्रसन्ना अंजनेया स्वामी मंदिराच्या गेटवर भिक मागते… चक्रावलात ना.

एक भिक मागणारी महिला मंदिरात अडीच लाखाच दान देते यावर विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे. एमवी सीतालक्ष्मी नावाच्या या या महिलेने हे दान दिले आहेत. अनेक वर्ष त्या या मंदिरासमोर भीक मागत असत.

 

 

दान हे हिंदू धर्मात सर्वात श्रेष्ठ मानल्या गेले आहे. पण एक भिकारीण जी रोज मंदिराच्या गेटवर भिक मागते तिने तिचे पैसे दान का केले असावे.. तर तिच्या या दानामागे एक खूप छान कारण आहे.

तिने हे पैसे मंदिरात येणाऱ्या भाविकांना आणखी चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच त्यांना प्रसाद देण्याकरिता दान केले आहेत.

ही बाब फारच कौतुकास्पद आहे. आजच्या जगात जिथे पैश्यांसाठी लोकं एकमेकांचा जीव देखील घ्यायला पुढे-मागे बघत नाही इथे या महिलेने भिक मागून जमवलेले अडीच लाख रुपये दान मध्ये दिले.

 

 

मंदिरातील भाविकांना जशी ही गोष्ट माहित झाली तशी ते या सीतालक्ष्मी यांना भेटायला गेलेत आणि त्यांचे अभिनंदन करून त्यांचा आशीर्वाद घेतला.

सीतालक्ष्मी या यादवगरी येथे त्यांचे भाऊ आणि वाहिनीसोबत राहतात. पण त्यांना कोणावर अवलंबून राहायचे नव्हते म्हणून त्या दिवसातून दोन वेळा या मंदिरात येऊन बसायच्या. जिथे मंदिर प्रशासन त्यांची देखभाल करायचा.

काही दिवसांआधी गणेशोत्सवा दरम्यान देखील या महिलेने ३० हजार रुपये या मंदिरात दान केले होते. त्यांनतर मंदिर ट्रस्टच्या चेअरमनला त्या बँकेत घेऊन गेल्या जिथे त्यांनी मंदिराच्या नावाने २ लाख रुपये दान केले.

 

 

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेलेल्या मुलाखतीत एमवी सीतालक्ष्मी यांनी सांगितले, की

‘लोकं जे काही पैसे द्यायचे ते मी बँकेत जाऊन जमा करायचे. माझ्यासाठी देवच सर्वकाही आहे. म्हणून मी हे पैसे त्या मंदिराला देण्याचा निर्णय घेतला, जिथे दिवसभर माझा सांभाळ केला जातो.’

मंदिराच्या एका उत्सवादरम्यान तेथील आमदार यांनी त्यांचा सन्मान देखील केला आहे.

ज्या परिस्थितीत सीतालक्ष्मींनी दान केलंय ते पहाता, त्यांच्या दानाच्या रकमेपेक्षा त्या दानामागचा हेतू लक्षात रहाण्यासारखा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version