Site icon InMarathi

जोक्सवर बंदी ते पॉर्नसाठी मृत्यूदंड, “उत्तर कोरियाचे” १४ विचित्र कायदे!

korea rules inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

उत्तर कोरिया या देशाबद्दल तुम्ही काही गोष्टी ऐकल्या असतीलच, हा देश कायदा आणि नियमांच्या बाबतीत इतर देशांपेक्षा खूप वेगळा आहे. या देशाचा हुकुमशाह किम जोंग उन हा खूपच निर्दयी आहे. येथे सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास मोठी शिक्षा केली जाते.

आज इंटरनेटच्या जगतात कोणतीही गोष्ट कोणापासून जास्त काळ लपून राहत नाही, पण उत्तर कोरियाच्या या देशात इंटरनेटचा जास्त वापर होत नसल्याने या देशातील गोष्टी बाहेरच्या जगापर्यंत पोहोचत नाहीत.

पण काही धाडसी पत्रकारांनी येथील लाईफस्टाईल आणि विचित्र असे कायदे समोर जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

या देशातील कायदे खूपच कठोर आणि अयोग्य आहेत. आज आपल्या भारतामध्ये लोकांकडे एवढे व्यक्ती स्वातंत्र्य असूनही, लोक आमच्यावर अन्याय होत आहे, असेच म्हणत असतात.

पण आज आम्ही तुम्हाला उत्तर कोरियाचे असे काही नियम आणि कायदे सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आपला भारत देश याच्यापेक्षा किती चांगला आहे, हे समजेल, चला तर मग जाणून घेऊया, या उत्तर कोरियाच्या काही कायद्यांविषयी!

१. सरकारी म्युझिकवर चालतोय देश

१९६७ मध्ये सुप्रीम लीडरचे अखंड अर्थपूर्ण व्यवस्था (Monolithic Ideological System) सुरू होण्याबरोबरच सरकारने पॉप, फोल्क, मिलिट्री आणि Orchestral म्युझिकवर आपला दबदबा बनवायला सुरुवात केली होती.

सुप्रीम लिडरच्या देखरेखीखाली कोणतेही म्युझिक येथे रिलीज होते आणि जास्तकरून विदेशी संगीतापासून उत्तर कोरियाच्या लोकांना लांब राहावे लागते.

त्यामुळे लोकांना सरकारच्या आवडीचे म्युझिकच ऐकावे लागते. बघा, मग आपल्याकडे त्यांच्यापेक्षा किती स्वातंत्र्य आहे, आपण आपल्या आवडीची गाणी स्वतः निवडू शकतो.

 

 

२. देशाचे संपूर्ण नावच घेतले पाहिजे

या देशाचे संपूर्ण नाव डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कोरिया हे आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही या देशामध्ये असाल, तेव्हा तुम्ही या देशाचे पूर्ण नाव घेतलात तर तुमच्यासाठी चांगले आहे, कारण हा देश स्वतःला खरा कोरिया समजतो.

 

 

३. सुप्रीम लीडरचं वय विचारल्यास होऊ शकते शिक्षा

उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचे वय विचारल्यास तुम्हाला येथे शिक्षा दिली जाऊ शकते. कारण या माणसाच्या वयाविषयी येथे खूप वाद आहेत आणि जर तुम्ही या वादांमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला खूप मोठी शिक्षा होऊ शकते.

४. पॉर्न पाहिल्यास मृत्युदंड दिला जातो

उत्तर कोरियामध्ये पॉर्न पाहण्यास सक्त मनाई आहे. येथे जर तुम्ही पॉर्न पाहताना दिसलात, तर तुम्हाला जीवानिशी मारण्यात येते, किम जोंग याने आपल्या पहिल्या प्रेयसीला तिच्या कुटुंबियांसमोरच मारले होते, कारण तिने एक सेक्सटेप बनवली होती.

 

५. हा देश नास्तिक आहे

उत्तर कोरिया हा देश नास्तिक आहे. जर या देशामध्ये तुम्ही धार्मिक बनायला गेलात, तर तुम्हाला ठार मारले जाते. २०१३ मध्ये ८० ईसाईंना लोकांसमोर एका स्टेडियममध्ये मारले होते, कारण त्यांच्याकडे बायबल मिळाले होते.

६. डेनिम जीन्स घालण्यास बंदी

 

 

उत्तर कोरियामध्ये जर तुम्ही डेनिम जीन्स घातली, तर तुम्हाला मृत्युदंड दिला जातो, कारण डेनिम हे उत्तर कोरियाचा शत्रू असलेल्या अमेरिकेचे प्रोडक्ट आहे. त्यामुळे येथे डेनिम जीन्स घालण्यास बंदी आहे.

७. तुरुंगातून पळाल्यासं कुटुंब भोगणार शिक्षा. 

जेल तोडून पळणे हा बहुतेक सर्व देशांमध्ये गुन्हा मानला जातो. पण उत्तर कोरियाचा कायदा काही वेगळाच आहे. येथे जर तुम्ही जेल तोडून पाळण्याचा प्रयत्न केलात, तर याची शिक्षा तुमच्याबरोबर तुमच्या तीन पिढ्यांना भोगावी लागते.

८. दक्षिण कोरियाचे टीव्ही चॅनेल पाहण्यास बंदी.

 

 

उत्तर कोरियामध्ये टीव्ही पाहण्यास देखील काही नियम आहेत. येथे शेकडो लोकांना ठार करण्यात आलेले आहे, कारण त्या लोकांनी दक्षिण कोरियाचे टीव्ही चॅनल्स पाहण्याची चूक केली होती.

९. पुस्तकांवर बंदी

 

 

पुस्तके हे सर्वांसाठीच माहितीचे उत्तम भंडार असतात. मोठमोठ्या लेखकांच्या भावना याच पुस्तकांमुळेच लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे उत्तर कोरियामध्ये परदेशी प्रचार बंदी असे सांगून खूप पुस्तकांवर बंदी घालण्यात आलेली आहे.

१०. एकच मत आणि एकच विचार.

या देशामध्ये फक्त सरकारचे मतच मानले जाते. लोकांना त्यांची मते आणि विचार मांडण्याची येथे कोणतीही व्यवस्था नाही. येथे जर तुम्ही क्रांतिकारी बनून आपले मत मांडण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला तात्काळ ठार मारले जाते.

 

 

११. अॅन्ड्रॉइड आणि आयफोनवर बंदी.

उत्तर कोरियामध्ये तुम्ही अॅन्ड्रॉइड फोन आणि आयफोन, तसेच पर्सनल कम्प्युटर विकत घेऊ शकत नाही. येथे लोकांना पश्चिममध्ये वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रोनिक सामानांपासून लांब ठेवले जाते.

१२. देशाच्या बाहेर पळू शकत नाही.

येथे देशाच्या बाहेर असलेल्या लोकांच्या संपर्कात येणाऱ्याला ठार मारले जाते. दक्षिण कोरियामध्ये असलेल्या आपल्या नातेवाईकांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना येथे मारून टाकले जाते.

१३. मस्करी करण्यास बंदी आहे.

जर तुम्ही एखाद्या व्यंगचित्राच्या मदतीने आपले मत लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला ठार मारले जाते. व्यंगचित्राच्या आधारे सरकारची किंवा इतर लोकांची मस्करी करणे, येथे खूप मोठा गुन्हा मानला जातो.

 

 

१४. कार च्या संख्यांवर सरकारी नियंत्रण.

या देशामध्ये तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहजासहजी पोहचू शकत नाही, कारण येथे १००० लोकांपैकी फक्त एकालाच कार घेण्याची परवानगी असते. त्यामुळे या देशात कुवत असूनही कधी – कधी लोकांना कार घेता येत नाही.

असे हे उत्तर कोरियाचे कायदे खूपच भयानक आहेत. या देशामध्ये राहणारी माणस कशी राहत असतील, याचा आपण विचार देखील करू शकत नाही. मग आपण आपल्या देशात त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सुखी आहोत, हे यावरून समजते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version