ह्या ८९ वर्षीय आजीबाईचे गमतीशीर फोटो तरूणांना लाजवतील असे आहेत
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
प्रत्येकाला स्वतःची आजी खूप आवडते. ती आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगते आणि आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवते. आजीला नेहमी तुम्ही एका ठिकाणी बसून देवपूजा करत असताना पाहिले असाल. तसेच, तिला पोथी वैगेरे वाचताना देखील तुम्ही पाहिले असाल. ती नेहमी शांततेत ध्यानात बसलेली दिसली असेल. पण त्याच आजीला तुम्ही काहीतरी रोमांचक करताना किंवा फोटोग्राफी करताना पाहिले आहे का? बहुतेक लोकांचे “नाही” हेच उत्तर असेल. पण आज आम्ही तुम्हाला एक अशा आजीबद्दल सांगणार आहोत, जिने आपल्या करमतीने आजकालच्या खोडकर मुलांना देखील मागे पाडले आहे.
जपानमध्ये राहणारी ८९ वर्षाची किमिको निशिमो हिला आजकाल आपले जुने फोटो सुंदर बनवण्याचा छंद जडला आहे. पण १७ वर्षापूर्वी असे काही करण्याचा ती विचार देखील करू शकत नाही.
७२ वर्ष वय असताना किमिकोने आपल्या मुलाकडून फोटोग्राफीविषयी बेसिक ज्ञान घेतले. त्यानंतर लोकांनी एका वेगळ्या किमिकोला बघितले. काही काळातच किमिकोने फोटोग्राफीबद्दलचे सर्व ज्ञान घेतले. किमिकोने पहिले फोटोग्राफीचे प्रदर्शन १० वर्षापूर्वी कुमामोटोच्या एका म्युझियममध्ये लावले होते. आता किमिको आपल्या दुसऱ्या फोटोग्राफीच्या प्रदर्शनाच्या तयारीला लागली आहे. ज्याचे नाव Asobokane आहे. Asobokane चा इंग्रजीमध्ये अर्थ “लेट्स प्ले” असा होतो.
त्यांचे हे प्रदर्शन डिसेंबरमध्ये सुरू होऊन जानेवारीच्या मध्यापर्यंत चालणार आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या या प्रदर्शानामधील काही फोटो घेऊन आलो आहोत, ज्यांना पाहून तुम्ही अचंबित होऊन जाल.
एखाद्या प्राणी संग्रहालयातील प्राण्याची नक्कल करताना आजीबाई.
सर्वात भारी पोझ..
मला कुणीतरी यातून सोडवा रे..
आम्ही पण कोणापेक्षा कमी नाही..
स्कूटीवर असा स्टंट मारताना पहिल्यांदाच कोणालातरी पहिले आहे.
पेन नाकात घालून नक्को काय करण्याचा प्रयत्न करत आहेत, आजीबाई..
सुपरहिरो आजी..
ड्रामेबाज आजी..
थांबा कोणीतरी आहे तिकडे..
सुपरफास्ट आजी, हवेपेक्षा जलद..
फ्रोगी आजी..
हे काही विचित्रच आहे… 😀
कुणी बघत तर नाही ना..
आजीचा सर्वात भारी सायकल स्टंट
उसेन बोल्टपेक्षा जलद धावणारी आजी..
आजीला आपले लहानपण आठवले..
हे सर्वच फोटो खूपच वेगळे आणि आपल्याला खूप हसवणारे आणि विचार करायला लावणारे आहेत. या आजीच्या फोटो प्रदर्शनाची सध्या खूप चर्चा चालू आहे आणि ह्या प्रदर्शनाला खूप लोक पाहण्यास येतील अशी तिची आशा आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.