आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
सोशल मीडिया म्हणजे रस्सीखेच! त्यात मेसेंजरच्या competitions भयानकच. आधी फेसबुकचा मेसेंजर होताच, मग hike आला त्यानंतर WhatsApp आलं. सगळ्यांची दुकानं बंद पडून WhatsApp टिकलं.
“साम दाम दंड भेद” पैकी दाम वापरून फेसबुक ने WhatsApp ला विकत घेतलं. बस्स competition खतम.
पण हे मार्केट आहे बॉस! इथे कशाचीच शाश्वती नसते.
आपलं Hangout बंद पडल्याच्या खुन्नस मध्ये Google ने नवीन मेसेंजर आणलाय – ‘Google Allo’.
काय आहे Allo?
जाणून घ्या Allo चे खास फिचर्स – ज्यांमुळे ते WhatsApp पेक्षा उजवं ठरतंय:
1. The Google Assistant
हो, नावाप्रमाणेच हा तुमचा एक असिस्टंट आहे. म्हणजे कसं? तर WhatsApp वरून आपण documents, फोटो, camera, contacts, audio आणि locations शेअर करू शकतो. पण ह्या फाईल्स आपल्या device वर सेव्ह असतात. आणि इथेच Allo वेगळा ठरतो.
तुम्हाला लोकेशन मिळालंय पण “कसं?” हा प्रश्न आहे? तुम्हाला फक्त Google Assistant ला प्रश्न विचारायचाय.
हा assistant तुम्हाला प्रवासाचा वेळ, हॉटेल्सचा discount, photos सोबत माहिती पुरवणार आहे.
2. In-message Searches
तुम्ही एखाद्या हॉटेल मध्ये जेवायचा प्लॅन करत असाल किंवा पार्टीमध्ये एखाद्या हिट गाण्याबद्दल चर्चा करत असाल. तर हॉटेल किंवा गाणं शेअर करण्यासाठी तुम्हाला आधी WhatsApp बंद करून सर्च करून त्याची link शेअर करावी लागते.
पण Allo मध्ये असं नाही. इथे तुम्ही गाण्याच्या लिंक सरळ सरळ शेअर करू शकता त्यासाठी तुम्हाला @google असं टाईप करून गाणं सर्च करायला मिळतं – थोडक्यात काय तर chat मध्येच तुम्ही Google-Search करू शकता.
3. Google auto response
बस मध्ये प्रवास करताय? घरात बसलाय पण आळसामुळे टायपींगचा कंटाळा आलाय? तुमच्यासाठी google ने auto response हे फिचर आणलंय. ह्यात समोरच्याने केलेला मेसेज वाचून त्याला योग्य अश्या replies चे options समोर Allo देतो. म्हणजे समोरून जर ‘hi’ आला तर त्याला ‘how are you?’ चा automated response चे options समोर असतात. त्यातून आपल्याला हवा तो मेसेज पाठवायचा.
4. Picture Recognition
Google ने हे एक नवीन फिचर Allo मध्ये टाकलंय. हे फिचर तुम्हाला आलेल्या फोटोला categorize करतं. आणि समजा तुम्हाला एखादा सुर्यास्ताचा फोटो कुणी पाठवला तर त्यांना “सुंदर”, “मस्त” असे तुमच्या वापरानुसार शब्द सुचवतं.
5. End to end encryption
आपली privacy नेहमीच आपल्याला प्रिय असते. WhatsApp आणि Allo दोन्हीही आपल्याला आपल्या chats च्या privacy साठी End to end encryption. पण परत Allo कसं वेगळं? तर ह्यात आहे selective End to end encryption म्हणजे एक chat mode आहे ज्यात आपण Incognito-chat करू शकतो. म्हणजे आपले मेसेजेस, गप्पा आपण ठरवलेल्या वेळेनंतर आपोआप delete होतात. पण जर आपण हे delete करायला विसरलो, तर ते तसंच सेव्ह राहतं.
6. Text formatting आणि अजून बरंच काही
आता Allo मध्ये आपण मेसेज मधला ठळक भाग बोल्ड, इटालिक करू शकतो. फॉन्ट साईझ जास्त वा कमी करू शकतो. एवढंच नाही तर ह्यात स्टिकर्सची एक नवीन रेंज आहे. आणि आपल्याला हवं तसं आपण त्या स्टिकर वर खाडाखोड, अजून काही लिहू शकतो. आहे ना भन्नाट?
7. सर पे Google नाम की टोपी – The Google brand name!
मान्य! WhatsApp हे आता फेसबुकचं आहे, पण आहे तर दुसऱ्याचंच ना? Allo हे completely Google चं आहे.
आणि काहीही म्हणा फेसबुकच्या login ची लिंक आपण ज्याच्याकडे सर्च करायला जातो, त्याचं स्वतःच Allo आहे!
आता तुम्ही म्हणाल की Allo मध्ये voice-calling आणि video-calling का नाहीये? बरोबर?
तर मित्रांनो त्यासाठी google ने Duo आणि Hangout हे स्पेशल Apps दिलेत की. वेगळे apps दिल्याने Quality मिळते आणि ते secure असतं असं Google चं म्हणणं आहे.
हे वाचून नक्कीच तुम्हाला Google चा Brand New Allo वापरायची घाई झाली असेल ना? वापरून पहा आणि तुमचा अनुभव आम्हाला कळवा!
अजून खोलवर माहिती हवी असेल तर व्हिडिओ बघण्यासाठी “इथे क्लिक करा“.
माहितीचा स्त्रोत: YourStory
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.