आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. तसा तर हिवाळा हा ऋतू सर्वांच्याच आवडीचा असतो, पण या थंडीच्या दिवसांत एक गोष्ट देखील जी कोणालाच आवडत नाही. अंघोळ करणे…प्रत्येकाला असंच वाटतं की अंघोळीची गोळी असायला हवी म्हणजे सगळे प्रॉब्लेमच संपले असते!
पण हा झाला गंमतीचा भाग, पण या थंडीत बऱ्याच जणांना हा आंघोळीचा कंटाळा का बरं येत असेल?? उलट आंघोळ केली तर कसं फ्रेश वाटतं, कोणतही काम करताना एक उत्साह येतो पण नेमकं थंडीतच असं का होतं की आंघोळ करूच नये असं वाटतं?
थंडीच्या दिवसांत आपल्याला त्या मऊ पांघरूणातून बाहेर निघायची देखील इच्छा नसते. तिथे मग कोण एवढ्या थंडीत अंघोळ करणार… बरोबर ना…?
आपण सगळेच हाच विचार करतो. पण तरी आपण रोज अंघोळ करतोच.
तसेही आपल्याला रोज अंघोळ करायची सवय झालेली असते. लहानपणी पासूनच आपल्याला रोज अंघोळ करण्याची सवय आपल्या घरच्यांकडून लावली जाते आणि आजही जर आपण एक दिवस अंघोळ नाही केली तर आपण आळशी लोकांमध्ये गणले जातो.
पण आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी माहिती घेऊन आलो आहोत ज्यामुळे यानंतर तुमच्याकडे अंघोळ न करण्याचं एक फुल प्रुफ निमित्त मिळेल…
जगभरातील डॉक्टरांच्या मते रोज अंघोळ केल्याने आपल्या त्वचेवर खूप गंभीर परिणाम होतात. त्यांच्यामते आपण “आवश्यकतेपेक्षा जास्त” अंघोळ करतो. तसेच हिवाळ्यात रोज अंघोळ करणे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असू शकते…
दि टाईम्स ऑफ इंडिया च्या एका रिपोर्ट नुसार त्वचा वैज्ञानिक डॉ. रनेला हिर्श या सांगतात की, आजकाल, लोक रोज शरीर घाण होतं आणि ती घाण काढून टाकणायसाठी म्हणून नाही, तर सामाजिक नियमांमुळे अंघोळ करतात.
परंतु रिसर्चनुसार आपल्या त्वचेला स्वच्छ करण्यासाठी आपल्या शरीरात अश्या अनेक यंत्रणा आहेत ज्या स्वतः शरीराला स्वच्छ ठेवण्याचं काम करतात.
या साठी तुम्हाला नेहेमी नेहेमी अंघोळ करण्याच गरज नाही…!
जर थंडीच्या दिवसात तुम्ही केवळ यासाठी गरम पाण्याने अंघोळ करत असाल की, यामुळे तुमच्या शरीराला गर्मी आणि आराम मिळेल, तर जाणून घ्या – यामुळे तुम्हाला खूप नुकसान होऊ शकते.
गरम पाणी आपल्या त्वचेवरील नैसर्गिक तेलाला नष्ट करतो त्यामुळे आपली त्वचा ड्राय होऊन जाते. रोज गरम पाण्याने अंघोळ केल्याने आपली नखे देखील खराब होऊ शकतात.
खरं वाटणार नाही – आपली नखे पाणी शोषतात. गरम पाण्याने ते त्यांच्यातील नैसर्गिक ओलावा आणि तेल नष्ट होतो, त्यामुळे ते ड्राय आणि निर्जीव होऊन जातात.
शिवाय हिवाळ्याच्या मोसमात जर तुम्ही रोज अंघोळ करत असाल आणि त्यानंतर लगेच गारठा लागला वा केस ओले रहाणे किंवा शरीर व्यवस्थित पुसल्या नं जाणे अश्या गोष्टी होत राहिल्या तर तुमच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होऊ शकतात.
पण रोज अंघोळ करायचीच असेल – अगदी हिवाळ्यातसुद्धा तर किमान पुढील खबरदारी बाळगा –
१) कितीही बरं वाटलं तरी अगदी कढत, गरम पाण्याने अंघोळ करू नका.
कोमट, आवश्यक तेवढंच गरम पाणी वापरा, कारण जास्त गरम पाणी अंगावर घेतल्याने त्वचेचे विकार होऊ शकतात जसे की उष्णतेचे फोड येणे किंवा त्वचा खूप संवेदनशील होणे असे प्रकार होतात!
त्यामुळे शक्य झाले तर थंडच किंवा थोडेसे कोमट पाणीच अंघोळीसाठी वापरावे, आणि त्यात सतत बदल करू नये! एकाच प्रकारचे पाणी कायम अंघोळीसाठी वापरावे!
२) शाम्पू-साबण आवश्यक तेवढेच आणि तेव्हाच वापर करा.
खूप जास्त फेस केलात किंवा अति वापर केलात तर त्वचा अधिक प्रमाणात शुष्क होऊ शकते! खरं बघायला गेलं तर शॅम्पू चा वापर नियमित करणे टाळावे, आठवड्यातून ३ वेळा किंवा २ दिवसातून एकदाच त्याचा वापर करावा!
त्यातही एक प्रकारची केमिकल्स असतात जी तुमच्या केसाच्या वाढीसाठी अपायकारक ठरू शकतात!
३) डोक्यावरून अंघोळ टाळा – केस ओले करू नका. केस स्वच्छ करायचेच असतील तर ड्राय शॅम्पूचा पर्याय वापरून पहा.
४) अंघोळीनंतर लगेच थंडीत बाहेर पडू नका. अंग व्यवस्थित पुसून, शरीर काहीवेळ उबदार ठेवून मगच घराबाहेर पडा.
असो – हे वाचून अंघोळीसाठी कंटाळा करणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच आनंद झाला असेल. म्हणजे आता यानंतर अंघोळ न करण्याची कुठलीही वायफळ करणे देण्यापेक्षा आता तुमच्याकडे एक वैज्ञानिक कारण आहे ना…!
तर रोज अंघोळ करणे टाळा आणि निरोगी राहा… 😉
===
सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.