Site icon InMarathi

दुर्योधन तर कुठे रावण, भारतात होते या राक्षसी वृत्तींची पूजा

rakshasa im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंदिरं ही आपल्या हिंदू संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे.

 

 

धर्म कोणताही असो, मात्र आपआपल्या श्रद्धास्थानात जाऊन प्रार्थना करणं हा प्रत्येकासाठी आनंदाचा भाग असतो.

आजही जगात आस्तिक लोकांची संख्या मोठी असल्याने मंदिर असो वा चर्च, प्रत्येक श्रद्धास्थानात जाऊन देवाप्रती आपला भाव व्यक्त करणं हे प्रत्येकासाठी गरजेचं असतं.

मात्र पुराणापासून एक बाब लक्षात येते, की देऊळ म्हटलं की तिकडचे नियम, रिती, परंपरा यांचा पालन करणं गरजेचं असतं.

 

 

देवळात केवळ देवाच्या नामाचा जप करणं, अंगोळीनंतर दर्शन घेणं, पावित्र्य राखणं हे प्रत्येकाला बंधनकारक असतं.

देवळात जाऊन तुम्ही देवाऐवजी एखाद्या राक्षसाचा जप सुरु केला तर? देवळातले सगळेच तुम्हाला चांगलाच चोप देतील, हो ना?

इतर मंदिरात असं घडलं, तरी एक मंदिर असंही आहे, जिथे रोजच देवाची नव्हे तर राक्षसाची पुजा केली जाते.

सर्वसाधारण मंदिरात आपण नेहमी देवांच्या मुर्ती बघितल्या असतील. तसेच दुर्गा देवीच्या मंदिरात तिच्या पायाशी राक्षस देखील बघितला असणार.

 

 

पण तुम्ही कधी असं मंदिर बघितलं आहे जिथे राक्षसांची पूजा केली जाते? नाही ना..

म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी काही अश्या आश्चर्यकारक मंदिरांची माहिती घेऊन आलो आहोत जिथे राक्षसांची पूजा केली जाते… आणि तेही अगदी देवांप्रमाणे…

अहिरावण मंदिर, उत्तरप्रदेश 

 

 

रावणाचा भाऊ अहिरावण हा देखील एक राक्षसच होता. अहिरावण यानेच भगवान राम आणि लक्ष्मणच अपहरण केलं होतं.

पण रावणाच्या या भावाचं उतरप्रदेशच्या झांसी येथे एक मंदिर आहे.

झांसीच्या पचकुइंया येथे एक असे मंदिर आहे जेथे हनुमानासोबत अहिरावणची देखील पूजा केली जाते. एवढचं नाही तर तेथे अहिरावणचा भाऊ महिरावण याची देखील पूजा केली जाते. हे मंदिर ३०० वर्ष जुने असल्याचं सांगितलं जाते.

 

दुर्योधन मंदिर, उत्तराखंड 

 

 

दुर्योधन म्हणजे महाभारतातील खलनायकच. याच्यामुळे महाभारतात अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला.

त्यामुळे दुर्योधन हा देखील राक्षसांच्या श्रेणीत येतो. पण उत्तराखंड येथील नेटवार परिसरात दुर्योधनाचं एक मोठं मंदिर आहे.

इथे येणारे भाविक दुर्योधनालाच देव मानतात आणि त्याची नित्यनेमाने पूजा करतात. या मंदिराजवळच दुर्योधनाचा प्रिय मित्र सूर्य पुत्र कर्ण याचं देखील मंदिर आहे.

 

पूतनाचं मंदिर, उत्तरप्रदेश 

 

 

कृष्णाला आपले दुध पाजून मारण्याचा कट रचलेल्या पुतना राक्षसीला तर आपण सर्वच जाणतो.

पण उत्तर प्रदेशातील गोकुळ येथे पुतना राक्षसीचं मंदिर आहे.

या मंदिरात पुतनाची झोपलेली मूर्ती आहे. ज्यावर कृष्ण तिचं दुध पिताना दाखविण्यात आले आहे.

या मंदिराला बनविण्यामागे एक मान्यता आहे की, श्रीकृष्णाला मारण्याच्या उद्धेश्याने का असे ना, पण पुतनाने कृष्णाला एका मातेप्रमाणे स्वतःच दुध पाजलं होतं.

 दशानन मंदिर, उत्तरप्रदेश

 

 

दशानन म्हणजेच रावण.

रावण हा देखील एक राक्षसच होता. पण उत्तर प्रदेशातील कानपूर येथील शिवाला परिसरात एक दशानन मंदिर आहे.

या मंदिराची निर्मिती १८९० साली करण्यात आली होती.

या मंदिराचे दारं वर्षभर बंद असतात ते केवळ एकाच दिवशी उघडले जातात आणि ते म्हणजे दसऱ्याला.

यादिवशी मोठ्या संख्येने लोकं रावणाचे दर्शन घेण्याकरिता येथे येतात. येथे रावणाला सर्वज्ञानी मानून त्याची पूजा करण्यात येते.

या सगळ्या ठिकाणी ज्यांची पुजा केली जाते, त्यांना पुराणातील कथांमध्ये राक्षस मानलं जात असलं, तरी मंदिरात मात्र त्यांची पूजा अत्यंत भक्तीभावाने केली जाते.

ज्याप्रमाणे आपण सगळे आपआपल्या आराध्य दैवताची पुजा करतो, त्याच प्रमाणे त्यांचीही पूजा केली जाते.

 

 

या मंदिरात मात्र त्यांना राक्षस किंवा नकारात्मक व्यक्ती असा दर्जा दिला जात नाही.

रामायण असो वा महाभारत, प्रत्येक घटनेत त्यांच असलेलं स्थान, महत्वाचा दर्जा या सर्वांमुळे त्यांचीही पुजा होणं गरजेचं आहे, काही अंशी त्यांच्या भुमिका नकारात्मक असल्या तरी त्यांच्यातील चांगल्या बाजु लक्षात घेत त्यांची पूजा केली जाते.

वरकरणी ही बाब काहींना मान्य नसली, तरी प्रत्यक्षात या मंदिरात येणा-या भाविकांची संख्या मोठी आहे.

इतर मंदिरांप्रमाणे इथेही उत्सव साजरे केले जातात, आरती होते, नैवेद्य दाखवला जातो, त्यामुळे हा उत्सव पाहण्यासाठीही अनेकांची इथे गर्दी असते.

तर अशी आहेत ही भारतातील विचित्र मंदिर जिथे देव नाही तर राक्षस पूजले जातात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version