Site icon InMarathi

अंबानींच्या घरातला कचरा कचरापेटीत जात नाही, मग जातो कुठे? वाचून थक्क व्हाल!

mukesh-ambani-inmarathi02

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण नेहेमी बघत आलो आहोत की, प्रसिद्ध लोकांच्या लहान-सहान गोष्टींच्या देखील बातम्या होतात, त्यांच्या लहान-लहान गोष्टी देखील चर्चेचा विषय बनतात. तिथेच एका सामान्य माणसाला चर्चेत यायला खूप काही करावं लागतं.

सेलिब्रिटींची कुटुंब हा तर कायमच सर्वांच्या आवडीचा विषय असो. बच्चन, कपूर, खान या कुटुंबियांबाबत ठाऊक नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. मग या गर्दीत ‘अंबानी’ परिवार तरी मागे कसा राहणार.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

धिरुभाईंचा वारसा चालणारं हे कुटुंब कधी जिओमुळे चर्चेत येत तर कधी कर्जबाजारी अनिल आणि अब्जावधींची सहज उलाढाल करणारे मुकेश यांच्यातील तुलनेमुळे. कधी मुंबई इंडियन्सची मालकी तर कधी त्यांच्या शाही विवाहसोहळ्यामुळे.

काही दिवसांपासून हे कुटुंब एका नव्या मुद्द्यामुळे चर्चेत आले आहे. अंबानींच्या घरात जन्मलेल्या नव्या पाहुण्याच्या आगमानाची वार्ता नेहमीप्रमाणे ट्रेन्डिंग ठरली. आजोबा मुकेश अंबानी यांचा नातवासोबतचा फोटो तुम्हीही पाहिला असेल.

आता पुढचे काही दिवस हाच विषय प्रत्येकाच्या चर्चेत असणार हे नक्की. मोठ्या लोकांची तर गोष्टच वेगळी असते. आता तुम्ही म्हणालं की आम्ही हे सर्व का सांगत आहोत… कारण आम्ही मुकेश अंबानी यांच्या घरच्या कचऱ्या बद्दल बोलत आहोत.

 

 

हो… कचराच.

तसं तर मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाच्या लाइफस्टाइल बद्दल तर आपण कुठे ना कुठे वाचल असेलच. पण त्यांच्या घरच्या कचऱ्याचं काय होतं माहिती आहे का?

 

 

याआधी आपण मुकेश अंबानीच्या ड्रायव्हरची सॅलरी उघड करणारी न्यूज बघितली असेल, तसेच नीता अंबानीच्या शाही राहणीमानाचा देखील आढावा घेतलाच असेल.

पण  काही महिन्यांपुर्वी मुकेश अंबानीच्या घरच्या कचऱ्याची गोष्ट वायरल झाली होती. असे सांगण्यात येत आहे की, मुकेश अंबानीच्या घरचा कचरा हा आपल्या घरच्या कचऱ्याप्रमाणे फेकला जात नसून तो एका विशिष्ट प्रकारे उपयोगात आणला जातो.

 

 

मुकेश अंबानी हे आपल्या देशातीलच नाही तर जगातील श्रीमंत लोकांमध्ये येतात. ते त्यांच्या शाही राहणीमानासाठी खूप प्रसिद्ध देखील आहेत. याचं घर एंटीलिया जे भारतातील सर्वात आलिशान घरांपैकी एक आहे.

२७ माळ्याच्या या घरात एकूण ६०० नोकरचाकर आहेत, जे घराला सांभाळतात. अंबानीच्या घरात प्रत्येक लहान-सहान गोष्टीकडे लक्ष दिल्या जातं. प्रत्येक गोष्ट प्रॉपर ठेवण्याची जबाबदारी या नोकरांवर असते. अश्यातच सध्या सोशल मिडीयावर त्यांच्या घरचा कचरा चर्चेचा विषय बनला आहे.

असं सांगण्यात येते की, त्यांच्या घरचा कचरा हा वाया जातं नाही तर त्यापासून वीजनिर्मिती करण्यात येते जी त्यांच्याच घरासाठी वापरली जाते.

 

 

त्यांच्या घरात एका विशिष्ट पद्धतीने कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यात येते. यासाठी सर्वात आधी सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करण्यात येतो आणि मग त्यापासून वीज तयार केली जाते. त्यांच्या एवढ्या मोठ्या घरात सर्वात जास्त वीजेचा वापर होतो म्हणून त्यांनी कचऱ्यापासून वीज तयार करण्याची शक्कल लढवली.

 

 

तसं पाहता कचऱ्याचा हा सर्वात उत्तम वापर आहे. जो मुकेश अंबानी यांच्या एंटीलिया मध्ये करण्यात येतं आहे. यावरून दिसून येतं की मुकेश अंबानी हे एक खरे व्यावसायिक आहेत. त्यांना कुठल्या गोष्टीचा कसा वापस करावा हे माहिती आहे.

तसेच मुकेश अंबानीची ही गोष्ट शिकण्यासारखी देखील आहे. जर आपल्या घरचासुद्धा अश्या कामात आणल्या गेला तर देशात सुरु असलेल्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.

===

हे ही वाचा – समुद्रातून हजारो टन प्लास्टिकचा कचरा बाहेर काढणारा असामान्य कोळी!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version