आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आपला देश रुढी व परंपरावादी देश आहे. इथे मुलींना जिवनदान देणं हे पालकांच्या जिवावर येतं. त्यातूनच स्त्रीभ्रूण हत्येच्या बातम्या आपण रोजच वाचतो. तसंच मुलगी झाल्यास पत्नीला होणारा जाच, एक दिवसाची, दोन महिन्यांची मुलगी कोणी उकिरड्यावर, रस्त्यावर सोडलेली आपण पाहिले किंवा वाचले असते. तसंच सुशिक्षित पालक सोनोग्राफीद्वारे मुलगा आहे की मुलगी हे माहित करतात. ते का असं करतात कारण त्यांना मुलगा हवा असतो. मुलगी असल्यास ते गर्भातच मुलीची हत्या करतात. असे पढतमुर्थ भारतात कमी नाहीत. तेव्हा सरकारला सोनोग्राफीद्वारे पोटातील बाळाचे लिंग निदान करण्यावर कडक प्रतिबंध करावे लागले आहेत.
अशातच केरऴातील थमीम नावाच्या एका अँबुलन्स चालकाने आपले ड्रायव्हींगचे सारे कौशल्य पणाला लावून एका लहानगीचे प्राण वाचवण्यास मोठे योगदान दिले आहे.
थमीम हा एक सर्वसामान्य ड्रायव्हर, वय वर्ष एक महिना इतक्या लहानमुलीचे हृदय व्यवस्थित काम करत नव्हते. तसंच तिला श्वसनाला देखील त्रास होत होता म्हणून थमीमने राज्याच्या उत्तर विभागातून दक्षिण भागापर्यंत गाडी चालवली. फक्त एका ठिकाणी त्याने पेट्रोल भरण्यासाठी त्याला गाडी थांबवावी लागली.
पर्रिअम मेडिकल कॉलेज कुन्नुर ते सिरी चित्रा थिरुअनंतपुरम मिशन हॉस्पिटल हे अंतर कापायला सर्वसाधारणपणे 14 तास लागतात. पण थमीमने हे अंतर फक्त सहा तास 45 मिनिटांत पार केले. तेही एकदा पेट्रोल भरायला थांबून. थमीमच्या या मोहिमेला केरळा पोलीस आणि चाइल्ड प्रोटेक्शन टीम केरळा यांनी मोलाचे सहकार्य केले.
कुन्नुर पासून थिरुअनंतपुरम येथे हवाईमार्गाने या लहानगीला पोहचवणे शक्य नव्हते. त्यासाठी 5 तास वाट पहावी लागणार होती. तेव्हा थेट कन्नुर हॉस्पिटल ते थिरुअनंतपुरम इथपर्यंत अँबुलन्सने जावे लागले. त्यासाठी पोलिसांनी ट्राफिक कंट्रोल करण्यासाठी एक विशेष पथक नेेमले होते. तसंच चाइल्ड प्रोटेक्शन टीम नेही पोलिसांना या कामात मदत केली.
अनपेक्षित वेळेत थमीमने अँबुलन्स गंतव्यस्थानी पोहचवल्याने सर्वांना त्याचा अभिमान वाटला. ही घटना स्वप्नवत वाटली. इंडिया टुडेच्या पत्रकारांनी थमीम ला या बाबत विचारले असता त्याने सांगितले की, “मी इतके कष्ट फक्त या चिमुकलीचा जीव वाचावा याकरता घेतले. आता यापुढील काम डॉक्टरांचे आहे. तिचे प्राण वाचावे अशी आम्ही प्रार्थना करतो.”
थमीमच्या या ड्रायव्हींग कौशल्याची चर्चा केरळातील प्रसारमाध्यमं आणि सोशलमीडियावर होत आहे. अद्याप एक महिन्याच्या फातिमावर उपचार सुरू आहेत. तिच्याकरताही थमीम व त्याचे सहकारी प्रार्थना करत आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.