आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आजकाल पॉर्न साईट्स खूप वाढल्या आहेत आणि त्याच्या जाहिराती देखील एखाद्या व्हायरससारख्या इंटरनेटवर पसरत आहेत. कधी-कधी इंटरनेटवर काही ब्राउज करत असताना मधेच या पॉर्न साईट्स ओपन होतात. सोशल मिडीयावर जरी आपण काही करत असलो, तरी देखील आपल्याला या पॉर्न साईट्सच्या जाहिराती मध्ये दिसतात. अचानक स्क्रीनवर आलेल्या या अश्लील सामग्रीमुळे, आपल्या आसपास असलेली माणसे आपल्याबद्दल काय विचार करत असतील, हेच सारखे आपल्याला सतावत असते आणि आपण गडबडून सर्व बंद करण्याचे प्रयत्न करतो.
पण आता असे होणार नाही. त्यावर एक उपाय सापडला आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा एका अॅपबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही अशा परिस्थितीपासून वाचू शकता आणि इतर लोकांना होणारे गैरसमज टाळू शकता. हे अॅप तुम्हाला अश्लील आणि आपत्तीजनक साईट्सपासून वाचवेल. चला तर मग जाणून घेऊया, या परिस्थितीत तुमचे संरक्षण करणाऱ्या अॅपबद्दल..
अॅडल्ट साइट्सपासून वाचवणारं अॅप…
हे अॅप तुम्हाला अचानक स्क्रीनवर येणाऱ्या पोर्नोग्राफी, हिंसा, वाईट संदेश यांपासून वाचवेल. या अॅपला वाराणसीच्या हिंदू विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या न्यूरॉलजिस्ट आणि त्यांच्या टीमने बनवले आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही त्या साईट्सना बंद करू शकता, ज्या तुम्ही क्लिक न करता देखील तुमच्या स्क्रीनवर चालू होतात. ज्या साईट्स तुम्हाला आवडत नाहीत आणि ज्या अश्लील सामग्री दाखवतात, या साईट्सपासून तुम्ही वाचू शकता.
हर-हर महादेव अॅप
या अॅपला हर-हर महादेव अॅप असे नाव देण्यात आले आहे. हे असे नाव देण्यामागचे कारण देखील सांगितले आहे. या अॅपच्या मदतीने कोणतीही अवांछित साईट चालू होताच, भक्ती गीते वाजू लागतात. त्यामुळे या अॅपला असे देण्यात आले आहे. या अॅपविषयी लोकांना माहिती देण्यास सुरुवात झाली आहे आणि लोकांना या अॅपच्या फायद्याविषयी सांगितले जात आहे.
अॅपमुळे भक्तिगीते वाजू लागतील
या अॅपची खास गोष्ट म्हणजे तुम्ही हा अॅप डाऊनलोड केल्यानंतर, जेव्हा तुमच्या स्क्रीनवर काही अवांछित साईट्स चालू होतील, त्याचबरोबर हे अॅपमधून भक्ती संगीत वाजण्यास सुरुवात होईल. या अॅपवर काम करणारे न्यूरॉलजी विभागाचे डॉक्टर विजयनाथ मिश्रा यांनी माहिती देताना सांगितले की, या अॅपच्या मदतीने वेबसाईट ब्लॉक करता येऊ शकतात. हे अॅप एकाप्रकारे इंटरनेट फिल्टरिंगचे काम करेल. या अॅपला बनवण्यासाठी जवळपास ६ महिने एवढा वेळ लागला. या अॅपच्या मदतीने जवळपास ३८०० साइट्स ब्लॉक करता येऊ शकतात.
अशा या अॅपमुळे आपल्याला खूप फायदा होणार आहे. आपण या अश्लील आणि नको असलेल्या साईट्सला आपल्या स्क्रीनपासून दूर ठेवू शकतो. त्यामुळे कोणासमोरही आपल्याला ऑक्वर्ड वाटणार नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.