Site icon InMarathi

‘कॉपी कॅट’ टिव्ही शोज, हे गाजलेले कार्यक्रम चक्क चोरलेले आहेत

crorepati im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूड चित्रपट तसे आपल्या आवडीचे, पण आपण काही रोजचं चित्रपट बघत नाहीत ना.. मग अश्यावेळी आपल्या करमणुकीचे साधन म्हणजे टीव्हीवर येणाऱ्या मालिका आणि रिअॅलिटी शोज.

आपण आपल्या आवडीच्या मालिका रोज आवर्जून बघतो, पण जर तुम्हाला कळाले, की तुमच्या आवडत्या मालिका आणि टीव्हीशोज हे चक्क चोरलेले आहेत तर…

आजपर्यंत आपण हॉलीवूडचे चित्रपट चोरल्याच्या बातम्या अनेकवेळा एकल्या असतील, पण तुम्हाला हे एकूण आश्चर्य वाटेल, की तुमच्या आवडत्या मालिका देखील हॉलीवूडच्या थीमवर बनत आहेत.

अशा कित्येक मालिका आहेत, ज्या हॉलीवूडमधील मालिकांच्या कॉपी आहेत तर अनेक रिअॅलिटी शोज देखील हॉलीवूड शोजच्या थीमवर बनविण्यात आले आहेत.

अशाच काही मालिका आणि टीव्ही शोज ची यादी आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत ज्या हॉलीवूडच्या कॉपी आहे.

१. कुमकुम भाग्य 

 

 

‘कुमकुम भाग्य’ ही झी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका. ही मालिका बघणाऱ्या प्रत्येकाला वाटायचं की आपली सून-मुलगी ही अगदी प्रग्या सारखीच असावी. पण ही मालिका देखील ‘सेंस एंड सेंसिबिलिटी’ या अमेरिकी शोची कॉपी आहे.

२. झलक दिखला जा

 

 

डांसिंग रियलिटी शो ‘झलक दिखला जा’ हा अमेरिकी डांसिंग रियलिटी शोच्या ‘डांसिंग विद द स्टार्स’ याच्या ठीम्वरून बनविण्यात आला आहे.

३. बडी दूर से आए हैं

 

 

सब टीव्हीवरील ‘बड़ी दूर से आए हैं’ ही मालिका प्रेक्षकांना हसविण्यात यशस्वी ठरली. त्यातील कॅरेक्टर्स हे तर लोकांच्या मनात घर करून बसले. ही मालिका अमेरिकी शो ‘थर्ड रॉक फ्रॉम सन’ची कॉपी असल्याचं सांगितल्या जातं.

४. करिश्मा का करिश्मा

 

 

तुम्हाला करिश्मा तर आठवतच असेल. पांढऱ्या आणि लाल रंगाचा फरोग घातलेली ती मुलगी जिला एक रोबॉट दाखविण्यात आले होते. या शोने देखील प्रेक्षांकांना खूप हसवले, पण ही मालिका अमेरिकी टीव्ही शो ‘Small Wonder’ ची कॉपी आहे.

५. इंडियाज गॉट टैलेंट

 

 

‘इंडियाज गॉट टैलेंट’ हा एक रियालिटी शो आहे, जो देशातील वेगवेगळ्या टॅलेंटला शोधून त्यांना त्यांची कला जगासमोर सादर करण्यासाठी एक मंच देतो. या शोची संपूर्ण कॉन्सेप्ट ही विदेशी टीवी शो ‘ब्रिटेन गॉट टैलेंट’ मधून घेण्यात आली आहे.

६. कॉमेडी नाइट्स विद कपिल

 

 

‘कॉमेसर्वांचा डी नाइट विद कपिल’ या शोने कपिल शर्माला यशाच्या नव्या शिखरावर नेऊन बसवले. हा शो खूप कमी वेळातच लोकांच्या पसंतीस उतरला. पण या शोची आयडिया ही अमेरिकी शो ‘द कुमार्स एट नं 42’ यापासून घेण्यात आली आहे.

७. कौन बनेगा करोड़पति 

 

 

‘कौन बनेगा करोड़पति’  या शोद्वारे आजवर अनेक सामान्य माणसं लखपती झाली. आपली स्वप्न पूर्ण करण्याची एक नवी संधी या शो मुळे लोकांना मिळाली. हा शो विदेशी शो ‘हू वांट्स टू बी ए मिलेनियर’  याच्या थीमवर बनविण्यात आला आहे.

८. मेरी आशिकी तुमसे ही

 

 

प्रेमावर आधारित ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकलीत. पण ही मालिका विदेशी टीव्ही शो ‘Wuthering Heights’ याची कॉपी असल्याचं मानल्या जातं.

९. खतरों के खिलाड़ी

 

दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करणारा ‘खतरों के खिलाड़ी’ हा शो देखील खूप लोकप्रिय आहे. यात सेलिब्रिटी कलाकार अशे काही स्टंट करतात जे बघून चांगले चांगले तोंडात बोटं घालतील. हा टीव्ही रियालिटी शो विदेशी टीव्ही शो ‘फियर फैक्टर’ वरून बनविण्यात आला आहे.

१०. 24

 

अनिल कपूरचा पॉपुलर थ्रिलर टीवी शो ’24’ हा  विदेशी शो ’24’ ची कॉपी आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version