' हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो – प्रत्यक्षात फोटो नाहीतच… – InMarathi

हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो – प्रत्यक्षात फोटो नाहीतच…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कला ही माणसाला खूप काही मिळवून देते. एखाद्याचे जीवन ह्याच कलेमुळे बदलते. प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला काही न काही कला पाहण्यास मिळते. प्रत्येकजण आपल्या कलेमध्ये निपुण असतो.

पण काही कला ह्या खूप आश्चर्यात टाकणाऱ्या असतात आणि त्या समजण्याच्या पलीकडे असतात. कोणतीही कला माणसाला अवगत करून घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तसेच, त्या कलेबद्दल संपूर्ण माहिती असणे देखील तेवढेच आवश्यक असते.

आजकाल पेन्सिलवर तयार करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कलाकृती खूपच आकर्षक असतात. ही कला खूपच वेगळी आणि अद्भूत आहे.

ही कला आत्मसात करणं आणि त्यात नैपुण्य मिळवणं हे सोपं काम नाही.

आपल्याला आश्चर्य वाटेल, अशा अविश्वसनीय गोष्टी केवळ पेन्सिल आणि कागदाच्या सहाय्याने तयार करता येतात. २२ वर्षीय जपानी कलाकार कोहेई ओमोरीने बनवलेली ही चित्तथरारक रेखाचित्रे तुम्हाला भारावून सोडतील.

 

Pencil drawings.Inmarathi10
twimg.com

 

कोहेई ओमोरी हा प्रत्येक प्रकल्पावर २०० तासांपेक्षा जास्त वेळ घालवतो. तो यामधील प्रत्येक गोष्ट तो एकदम बारकाईने करतो. या रेखाचित्रांच्या शेडींग, अल्ट्रा – थिन लाईन्स आणि अप्रतिम स्थिर हातांची हालचाल हे सर्व खूप तो साहजिकतेने करतो.

ट्विटरवरील त्याचे प्रेक्षक त्याच्या या एकाग्रतेमुळे ‘मॅड जिनियस’ असे संबोधतात.

त्याने एक रेखाचित्र तयार केले आहे, जे नट आणि बोल्टचे वर्णन करते.  ब्रिटीश मॉडेल सोफिया ब्लॅकब्रो हिचे काढलेले रेखाचित्र हे त्याचे ‘सिग्निचर पिस’ आहे.

आज आम्ही तुम्हाला कोहेई ओमोरी याची काही रेखाचित्रे दाखवणार आहोत, जी खूपच अप्रतिम आहेत. तीक्ष्ण पेन्सिलच्या सहाय्याने अद्यापही काय साधता येते, याचे आणखी काही नमुने पाहण्यासाठी नायजेरियन आर्टिस्ट अरीन्झे स्टॅनले याची चित्रे पहावीत.
चला तर पाहूयात ओमोरी याने काढलेली काही रेखाचित्रे…

जपानी कलाकार कोहई ओमेरी एका छोट्या पेन्सिलने रेखाचित्रांवर काम करत आहेत. 

 

Pencil drawings.Inmarathi

 

Pencil drawings.Inmarathi1

 

तो आपल्या धक्कादायक खऱ्याखुऱ्या पोट्रेटसाठी हिट झाला आहे आणि तो प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी जवळपास २०० पेक्षा जास्त तास लागतात.

 

Pencil drawings.Inmarathi2

 

Pencil drawings.Inmarathi3

Pencil drawings.Inmarathi4

Pencil drawings.Inmarathi5

Pencil drawings.Inmarathi6

Pencil drawings.Inmarathi7

Pencil drawings.Inmarathi8

 

Pencil drawings.Inmarathi9

 

अशी ही रेखाचित्रे खूप अप्रतिम आणि रेखीव आहेत. ती पाहिल्यावर ती खरी असल्याचाच भास होतो. अशा ह्या चित्रामध्ये जीव टाकणाऱ्या रेखाचित्रकाराला मनापासून वंदन..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?