' खुद्द भारतात बॅन झालेले पण जगभरात नावाजलेले १० भारतीय चित्रपट – InMarathi

खुद्द भारतात बॅन झालेले पण जगभरात नावाजलेले १० भारतीय चित्रपट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या देशात कुठल्याही चित्रपट रिलीज होण्याआधी त्याला ‘सेंसर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ यांच्या परीक्षेत पास व्हावं लागत. सेंसर बोर्ड तो चित्रपट बघितल्यावर निर्णय देते की, तो भारतात प्रदर्शित करायचा की नाही. जर प्रदर्शित होणार असेल तर त्यातला कुठला भाग दाखवला जाणार कुठला भाग दाखविण्यात नाही हे देखील ‘सेंसर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ ठरवत असत.

म्हणजे मुळकथेसह तयार झालेला चित्रपट हा आपल्यापर्यंत यायच्याआधी त्यावर ‘सेंसर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ ची कात्री लागलेली असते. एवढचं काय तर ‘A’ सर्टिफिकेट दिल्यावर देखील त्यावर कात्री लागतेच.

पण सेन्सर बोर्ड फक्त सिन्सवरच नाही तर कधी कधी संपूर्ण चित्रपटावरच बॅन लावते. आपल्या देशात वेगवेगळ्या भाषांमध्ये कित्येक चित्रपट बनत असतात. त्यापैकी काही चित्रपट असे देखील असतात ज्या चित्रपटांनी कित्येक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत. पण असे चित्रपट आपल्याच देशात रिलीज होण्याकरिता खूप वाट पहावी लागते.

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा ‘

 

Lipstick-Under-My-Burkha-inmarathi
thecommonmanspeaks.com

 

महिलांच्या जीवनावर आधारित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट रिलीज करण्यासाठी फिल्म मेकर्स ना खूप मेहनत करावी लागली होती. जानेवारी २०१७ मध्ये या चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर वादाच्या भोवऱ्यातून निघून जुलाई २०१७ मध्ये प्रदर्शित झाला.

ब्लॅक फ्रायडे

 

black-friday-inmarathi

 

फिल्ममेकर अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट १९९३ सालच्या मुंबई बॉम्ब ब्लास्टवर आधारित होता. या चित्रपटाच्या रिलीजवर तीन वर्षांपर्यंत बॅन लावण्यात आला होता. त्यानंतर हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित करण्यात आला.

पेड्लर्स

 

pedllers-inmarathi
youtube.com

 

Peddlers एक क्राईम थ्रिलर आहे. जो २०१३ साली रिलीज होणार होता, पण हा चित्रपट अजूनही रिलीज झालेला नाही. पण या चित्रपटाची स्क्रीनिंग दक्षिणी फ्रांसच्या ‘International Critics Week’मध्ये दाखविण्यात आली होती. या फिल्मला फेस्टिवल्समध्ये जरा जास्तच महत्व दिलं गेलं.

‘फायर’

 

fire-inmarathi
movie.com

 

शबाना आझमी आणि नंदिता दास यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला खूप वाहवाह ही मिळाली. या चित्रपटाला सेन्सर बोर्डाने कात्री न लावता प्रदर्शित देखील केले होते. पण या चित्रपटाला करण्यात आलेल्या विरोधानंतर या चित्रपटावर काही काळाकरिता बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर कोर्टाने मान्यता दिल्यावर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.

बांग्ला चित्रपट

 

movie-inmarathi
aambar.wordpress.com

 

ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपट ‘गांडू’ हा सुरवाती पासूनच वादाच्या भोवऱ्यात होता. या चित्रपटात अनेक आपत्तीजनक सिन्स होते. तर या चित्रपटाला न्यूयॉर्क येथे आयोजित ‘South Asian International Film Festival’ मध्ये तसेच इतरही आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये दाखविण्यात आले आहे.

‘अनफ्रीडम’

 

UNFREEDOM-inmarathi
nytimes.com

 

या चित्रपटात समलिंगी संबंधांचा मुद्दा उठविण्यात आला आहे. सेन्सर बोर्डाने मान्यता दिली नाही. त्यामुळे या चित्रपटाला आपल्या देशात नेहेमीकारिता बॅन करण्यात आला आहे. पण याचं चित्रपटाला ‘Golden Reel Awards’मध्ये नॉमिनेट करण्यात आले होते.

‘इंशाअल्लाह फुटबॉल’

 

movie-inmarathi01
cultureunplugged.com

 

‘इंशाअल्लाह फुटबॉल’ ही एक डॉक्यूमेंट्री आहे. हा चित्रपट एका आतंकवाद्याच्या मुलाच्या फुटबॉल प्लेअर बनण्याच्या स्वप्नाच्या अवतीभवती फिरताना दिसतो. या चित्रपटाला भारतात रिलीज होण्यापूर्वी अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं होतं.

‘हवा आने दे’

 

movie-inmarathi02
viralsection.com

 

‘हवा आने दे’ हा एक इंडो-फ्रेंच को-प्रोडक्शन चित्रपट आहे. सेन्सर बोर्डाने या चित्रपटावर कात्री चालविण्याचा प्रयत्न केला पण हा चित्रपट बनविणाऱ्यांनी त्यासाठी मान्यता दिली नाही. त्यामुळे हा चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झालेला नाही. पण याच चित्रपटाने कित्येक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावे केले.

‘जय भीम कॉम्रेड’

 

jai-bheem-comrade-inmarathi
thequint.com

 

हा चित्रपट १९९७ च्या ‘रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडा’वर आधारित असून या चित्रपटाच्या निर्मितीसाठी १४ वर्षांचा कालावधी लागला होता. २०११ मध्ये कोर्ट ट्रायल्सनंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

‘The Pink Mirror’

 

the_pink_mirror-inmarathi
insider.in

 

भारतात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नावं ‘गुलाबी आइना’ हे होतं. सेन्सर बोर्डाने २००३ साली या चित्रपटाला अश्लील असल्याचं सांगत त्याला भारतात बॅन करण्यात आले. हा चित्रपट ट्रान्ससेक्शुअलवर आधारित होता. हा चित्रपट ७० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये दाखविण्यात आला होता.

भारत हा लोकशाही प्रधान देश असला तरीही तिथे लोकांना आपले मत व्यक्त करण्यास असलेली बंदी या बॅन चित्रपटांच्या माध्यमातून दिसून येते. काही चित्रपट कोर्टाच्या आदेशानंतर प्रदर्शित होतात. तर काही अद्याप झालेच नाहीत. याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा.

स्त्रोत : wittyfeed.com

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?